शेतकऱ्यांची 'तिसरी नजर' पडली भारी; चितळीत डीपी चोरट्यांचा प्रयत्न फसला, चेहरा सीसीटीव्हीत कैद! आतातरी पोलिस विभाग लागेल का कामाला? मायणी दि.9:- प्रतिनिधी वारंवार होणारी वीज रोहित्र (डीपी) चोरी आणि त्यामुळे अंधारात जाणारी शेती यावर अखेर चितळीच्या शेतकऱ्यांनी स्वतःच 'इलाज' शोधला आहे. टेंभू कॅनॉल जलसेतू परिसरातील जंगल डीपीवर पुन्हा एकदा दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि बसवलेल्या सीसीटीव्ही सायरनमुळे फसला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून आता 'मायणी पोलीस' त्यांना कधी गजाआड करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चितळी येथील टेंभू कॅनॉल नजीक असलेला 'जंगल डीपी' चोरट्यांचे सॉफ्ट टार्गेट बनला होता. यापूर्वी दोन वेळा या ठिकाणची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते आणि पिकांना पाणी देणेही कठीण झाले होते. सततच्या या त्रासाला कंटाळून येथील लाभार्थी शेतकऱ्यांनी एकत्र येत एक अनोखा निर्णय घेतला. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नवीन डीपी बसवताना शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वर्गणी गोळा केली आणि या परिसरात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे व हाय-डेसिबल सायरन बसवला. तंत्रज्ञानाचा हा वापर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला. सायरन वाजला अन् चोरट्यांनी पळ काढला! ५ मार्च २०२६ च्या रात्री चोरट्यांनी पुन्हा एकदा या डीपीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, डीपीला हात लावताच कार्यान्वित झालेल्या सायरनने परिसरात एकच खळबळ उडवून दिली. सायरनच्या आवाजाने धास्तावलेल्या चोरट्यांनी सामानासह तिथून पोबारा केला. या धावपळीत चोरट्यांचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे टिपला गेला आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे चितळीकर शेतकरी हैराण आहेत. आतापर्यंत या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते. मात्र, आता शेतकऱ्यांनी चोरट्याचा थेट 'फोटो'च उपलब्ध करून दिल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी याठिकाणचे शेतकरी राजू पाटील,लालासो पाटील, दादासो पवार , विश्वजित पवार,लक्ष्मण कदम,गणेश मदने,सचिन पाटील,प्रशांत पवार,सुरेश सूर्यवशी,इंद्रजीत पवार,विकास पवार व ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. चौकट - "शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांच्या प्रश्नाकडे पोलिस विभागाने आजवर दुर्लक्ष केल्यानेच चोरट्याचे धाडस वाढले आहे. आता स्थानिक शेतकऱ्यांनी पैसे जमवून स्वतःच सुरक्षा यंत्रणा बसवली. आता चोरट्याचा पुरावाही त्यांनी पोलिसांकडे दिला आहे. पोलिस प्रशासनाने आता तरी कडक पावले उचलून या टोळीचा बंदोबस्त करावा, जेणेकरून शेतकरी सुखाची झोप घेऊ शकेल." - सौ,अनिता संभाजी कोळी, सदस्या,पंचायत समिती. (चितळी) चौकट - चितळीत वाळू चोरी, शेतकऱ्यांच्या विहिरीच्या मोटारी, डिपी , केबल चोरी,अवैध दारू विक्री,शालेय वस्तूंची चोरी ,अवैध धंदे असा लहान मोठ्या चोऱ्यां आणि प्रकरणाचा सिलसिला सुरूच आहे. याची पोलिस प्रशासनात दफ्तरी नोंद होते आणि प्रकरण विसरून टाकले जाते. काही बाबांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षही केले जाते . लोकांनी आता आपल्या चोऱ्यांची माहितीही पोलिसांना देणेही टाळले आहे. सातत्याने होणाऱ्या या चोऱ्यांच्या घटनांचा बीमोड करण्यासाठी मायणी पोलिसांना आपल्या धडक मोहिमेच्या कारभारातून आपली प्रतिमा उंचावून जनतेत आपली विश्वासार्हता वाढवण्याची गरज आहे. फोटो ओळी - १) चितळी येथील डीपी चोरीच्या प्रकरणात शेतकऱ्यांनी बसवलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेला चोर. २) डिपी चोरी आणि हतबल शेतकरी यांचे काल्पनिक चित्र
शेतकऱ्यांची 'तिसरी नजर' पडली भारी; चितळीत डीपी चोरट्यांचा प्रयत्न फसला, चेहरा सीसीटीव्हीत कैद! आतातरी पोलिस विभाग लागेल का कामाला? मायणी दि.9:- प्रतिनिधी वारंवार होणारी वीज रोहित्र (डीपी) चोरी आणि त्यामुळे अंधारात जाणारी शेती यावर अखेर चितळीच्या शेतकऱ्यांनी स्वतःच 'इलाज' शोधला आहे. टेंभू कॅनॉल जलसेतू परिसरातील जंगल डीपीवर पुन्हा एकदा दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि बसवलेल्या सीसीटीव्ही सायरनमुळे फसला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून आता 'मायणी पोलीस' त्यांना कधी गजाआड करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चितळी येथील टेंभू कॅनॉल नजीक असलेला 'जंगल डीपी' चोरट्यांचे सॉफ्ट टार्गेट बनला होता. यापूर्वी दोन वेळा या ठिकाणची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते आणि पिकांना पाणी देणेही कठीण झाले होते. सततच्या या त्रासाला कंटाळून येथील लाभार्थी शेतकऱ्यांनी एकत्र येत एक अनोखा निर्णय घेतला. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नवीन डीपी बसवताना शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वर्गणी गोळा केली आणि या परिसरात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे व हाय-डेसिबल सायरन बसवला. तंत्रज्ञानाचा हा वापर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला. सायरन वाजला अन् चोरट्यांनी पळ काढला! ५ मार्च २०२६ च्या रात्री चोरट्यांनी पुन्हा एकदा या डीपीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, डीपीला हात लावताच कार्यान्वित झालेल्या सायरनने परिसरात एकच खळबळ उडवून दिली. सायरनच्या आवाजाने धास्तावलेल्या चोरट्यांनी सामानासह तिथून पोबारा केला. या धावपळीत चोरट्यांचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे टिपला गेला आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे
चितळीकर शेतकरी हैराण आहेत. आतापर्यंत या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते. मात्र, आता शेतकऱ्यांनी चोरट्याचा थेट 'फोटो'च उपलब्ध करून दिल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी याठिकाणचे शेतकरी राजू पाटील,लालासो पाटील, दादासो पवार , विश्वजित पवार,लक्ष्मण कदम,गणेश मदने,सचिन पाटील,प्रशांत पवार,सुरेश सूर्यवशी,इंद्रजीत पवार,विकास पवार व ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. चौकट - "शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांच्या प्रश्नाकडे पोलिस विभागाने आजवर दुर्लक्ष केल्यानेच चोरट्याचे धाडस वाढले आहे. आता स्थानिक शेतकऱ्यांनी पैसे जमवून स्वतःच सुरक्षा यंत्रणा बसवली. आता चोरट्याचा पुरावाही त्यांनी पोलिसांकडे दिला आहे. पोलिस प्रशासनाने आता तरी कडक पावले उचलून या टोळीचा बंदोबस्त करावा, जेणेकरून शेतकरी सुखाची झोप घेऊ शकेल." - सौ,अनिता संभाजी कोळी, सदस्या,पंचायत समिती. (चितळी) चौकट - चितळीत वाळू चोरी, शेतकऱ्यांच्या विहिरीच्या मोटारी, डिपी , केबल चोरी,अवैध दारू विक्री,शालेय वस्तूंची चोरी ,अवैध धंदे असा लहान मोठ्या चोऱ्यां आणि प्रकरणाचा सिलसिला सुरूच आहे. याची पोलिस प्रशासनात दफ्तरी नोंद होते आणि प्रकरण विसरून टाकले जाते. काही बाबांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षही केले जाते . लोकांनी आता आपल्या चोऱ्यांची माहितीही पोलिसांना देणेही टाळले आहे. सातत्याने होणाऱ्या या चोऱ्यांच्या घटनांचा बीमोड करण्यासाठी मायणी पोलिसांना आपल्या धडक मोहिमेच्या कारभारातून आपली प्रतिमा उंचावून जनतेत आपली विश्वासार्हता वाढवण्याची गरज आहे. फोटो ओळी - १) चितळी येथील डीपी चोरीच्या प्रकरणात शेतकऱ्यांनी बसवलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेला चोर. २) डिपी चोरी आणि हतबल शेतकरी यांचे काल्पनिक चित्र
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- कोल्हापूर ०८ सिटी न्यूज नेटवर्क जागतिक महिला दिनानिमित्त मुस्लिम प्रोग्रेसिव महासंघाच्या वतीने महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. गीता पिल्लई उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य आहार, नियमित तपासणी आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतल्यास महिलांचे आयुष्य अधिक निरोगी आणि सक्षम होऊ शकते. महिलांनी स्वयंपूर्ण होऊन कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलावा, असेही त्यांनी सांगितले1
- Post by Deepak Sagar1
- भारताचा दणदणीत विजय; कोल्हापुरात क्रिकेटप्रेमींचा फटाक्यांची आतिषबाजी व ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष भारताचा दणदणीत विजय; कोल्हापुरात रंगपंचमीसारखा जल्लोष भारताने ICC Men's T20 World Cup स्पर्धेच्या अंतिम सामन्यात New Zealand national cricket team वर दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयाचा आनंद संपूर्ण देशभर साजरा करण्यात आला असून कोल्हापुरातही क्रिकेटप्रेमींनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला. अंतिम सामन्यात India national cricket team ने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 256 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. न्यूझीलंडचा डाव 19 षटकांत 159 धावांवर आटोपला आणि भारताने तब्बल 96 धावांनी शानदार विजय मिळवला. भारताच्या या विजयाची बातमी समजताच कोल्हापूर शहरात आनंदाची लाट उसळली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शेकडो तरुण आणि नागरिक एकत्र जमले. हातात तिरंगा घेऊन “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.यावेळी पारंपरिक हलगीच्या तालावर तरुणांनी नृत्य करत आनंद व्यक्त केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर घोषणांमुळे वातावरण पूर्णपणे उत्साहाने भारावून गेले होते.अनेकांनी हातात तिरंगा फडकावत भारताच्या विजयाचा अभिमान व्यक्त केला. काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करूनही विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल Sanju Samson याला मालिकावीराचा किताब मिळाला. त्याच्या शानदार खेळामुळे भारताच्या विजयात मोठा वाटा असल्याचे क्रिकेटप्रेमींनी सांगितले.क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जातो.त्यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याचा हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा ठरला आहे. कोल्हापुरातील क्रिकेटप्रेमींनीही हा आनंद रंगपंचमीसारख्या जल्लोषात साजरा करत भारताच्या ऐतिहासिक विजयाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.भारताच्या या यशामुळे देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे.1
- ठीक आहे. **“मयूर एक्सप्रेस न्यूज”** साठी न्यूज स्टाईलमध्ये हेडलाईन आणि छोटा रिपोर्ट असा तयार करून देतो. --- **हेडलाईन :** **बांधकाम कामगारांवर प्रायव्हेट भांडे किट वाटप करणारारे ठेकेदारांची हुकूमशाही; मूलभूत सुविधांचा अभाव** **सोलापूर | प्रतिनिधी – मयूर एक्सप्रेस न्यूज** सोलापूर येथे बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांड्यांच्या किटचे वितरण करताना गोडाउनवर काही प्रायव्हेट ठेकेदारांकडून हुकूमशाही पद्धतीने वागणूक दिली जात असल्याची तक्रार कामगारांकडून करण्यात येत आहे. कामगारांना बसण्यासाठी जागा नाही, उभे राहण्यासाठीही योग्य व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठीही कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कामगारांशी अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक केली जात असून त्यांचा सन्मान राखला जात नसल्याची नाराजी कामगारांनी व्यक्त केली आहे. भारत हा कामगारांचा देश आहे आणि सोलापूर ही चार हुतात्म्यांची भूमी आहे, जे गिरणी कामगार होते. त्यामुळे कामगारांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र काही प्रायव्हेट ठेकेदारांना कामगारांची काळजी नसून फक्त टेंडर घेण्याचीच घाई दिसून येत असल्याची टीका कामगारांनी केली आहे. याशिवाय गोडाउन परिसरात व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात येत असून व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांशी आक्रमक पद्धतीने वागण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कामगारांना योग्य सन्मान देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनावर राहील, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत1
- चिमुकलीच्या खुनाचा छडा लावणाऱ्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या तपासाला राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी'चा मान1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- जुन्नरचा 'दहशतदूत' जेरबंद! वनविभागाच्या जाळ्यात अडकला बिबट्या; गावकऱ्यांचा सुटकेचा नि:श्वास.1
- -अजित पवारां नंतर माझा प्रवास सोप्पं नव्हता,मात्र महिला शक्ती माझ्यामागे थांबली,हीच ताकद मला ऊर्जा देते -आजच्या काळात महिला एका क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत,अनेक ठिकाणी नेतृत्व करत आहे -आजपर्यंत सिम्बॉयसेस मधून 5 हजार पेक्षा अधिक मुलं-मुली यांनी शिक्षण घेत पुढे गेल्या आहेत -सिम्बॉयसेस सारखी संकल्पना सर्व ठिकाणी राबवण्यात आला पाहिजे, जेणेकरून तेथील महिलांना फायदा होईल -महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा,तुम्ही सक्षम झाल्या की आपला देश सक्षम म्हणून ओळखला जाईल1