logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे शुक्रवारी, १९ तारखेला शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी दर्जेदार पीक उत्पादनासाठी योग्य बियाणे निवड, बीज प्रक्रिया आणि हवामान अनुकूल शेती पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीत करायच्या विविध उपाययोजनांवर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन हवामान अनुकूल धान लागवड पद्धतीचा वापर करावा, तसेच जमिनीच्या सुपीकता निर्देशांकानुसारच योग्य ती खतमात्रा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक निविष्ठांचा वापर वाढवण्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत महत्त्वपूर्ण तांत्रिक माहिती दिली. या कार्यक्रमात राजुरा येथील उपविभागीय कृषी अधिकारी जाधव यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनवर सविस्तर मार्गदर्शन केले. शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी हिरवळीच्या खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच बाजारपेठेतून बियाणे, खते आणि कृषी औषधे खरेदी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी सतर्क केले. राजुरा तालुका कृषी अधिकारी विनायक पायघन साहेब यांनी कापूस उत्पादकता अभियान म्हणजेच 'कपास क्रांती' योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. कापसाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी अति घन लागवड पद्धत (एचडीपीएस) आणि जवळच्या अंतरावरील लागवड (सीएस) किती फायदेशीर आहे, हे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले. एकात्मिक पीक व्यवस्थापन (आयसीएम) पद्धतीचे महत्त्व आणि त्याचे होणारे आर्थिक फायदे सांगून शेतकऱ्यांना आधुनिक कापूस लागवडीचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तत्पूर्वी, उप-कृषी अधिकारी गांदगीवार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाची पार्श्वभूमी, मुख्य उद्देश आणि आयोजनाची कारणे स्पष्ट केली. या महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन पाचगाव येथील संस्कृती महिला बचत गट आणि सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी भूमीपुत्र शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तिरुपती नंदुरकर, आत्मा प्रकल्पाचे तालुका अध्यक्ष रुपेश गडेकर, अंबुजा फाउंडेशनचे प्रक्षेत्र अधिकारी गोपाल जंबुलवार आणि मंडळ कृषी अधिकारी वाघमारे यांच्यासह गावातील प्रगतशील शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक कृषी अधिकारी शिवाजी सोनकांबळे, जयपालसिंग जे. परमार, कृष्णा ठोंबरे आणि स्वप्निल वाव्हळ यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

6 hrs ago
user_Disha News
Disha News
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
6 hrs ago
3e9191eb-c1ff-4182-8df4-5b38ca6bd33f

More news from Yavatmal and nearby areas
  • दिल्लीच्या जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला वणीमधून जोरदार पाठिंबा मिळाला आहे.
    1
    दिल्लीच्या जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला वणीमधून जोरदार पाठिंबा मिळाला आहे.
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    5 hrs ago
  • गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही अवैधरीत्या दारूची वाहतूक आणि विक्री करण्याच्या प्रयत्नांवर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेंढरी उपपोस्टे हद्दीत सापळा रचून देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनासह एकूण ११ लाख ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, बेडगाव (ता. कोरची) येथील लखन जोहारी भैसा हा आपल्या साथीदारांसह स्कॉर्पिओतून पेंढरी परिसरातील चिल्लर विक्रेत्यांना अवैध मद्याचा पुरवठा करण्यासाठी येत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगेवाडा-पेंढरी मार्गावर दोन पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. संशयित स्कॉर्पिओ वाहन दिसताच पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, वाहन रस्त्याच्या कडेला थांबताच, चालकाच्या बाजूला बसलेले दोन जण अंधाराचा आणि शेतशिवाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी वाहनचालक लखन जोहारी भैसा (वय ४०, रा. बेडगाव, ता. कोरची) याला ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात रॉयल स्टॅग व्हिस्की, माऊंट ६००० बिअर, लेमाऊंट बिअर, मॅकडॉवेल्स नंबर वन रिझर्व्ह व्हिस्की आणि गोवा व्हिस्कीच्या बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला. या मद्यसाठ्याची किंमत सुमारे ४ लाख ५ हजार ८०० रुपये असून, जप्त करण्यात आलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनाची किंमत ७ लाख रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ११.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पेंढरी उपपोस्टे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लखन जोहारी भैसा याच्यासह निर्मल धमगाये आणि तरुण धमगाये (दोघे रा. कोरची) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोउपनि. शुभम जाधव करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. भगतसिंग दुलत, पोअं. प्रशांत गरफडे, सचिन घुबडे आणि चापोअं. दीपक लोणारे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
    1
    गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही अवैधरीत्या दारूची वाहतूक आणि विक्री करण्याच्या प्रयत्नांवर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेंढरी उपपोस्टे हद्दीत सापळा रचून देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनासह एकूण ११ लाख ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, बेडगाव (ता. कोरची) येथील लखन जोहारी भैसा हा आपल्या साथीदारांसह स्कॉर्पिओतून पेंढरी परिसरातील चिल्लर विक्रेत्यांना अवैध मद्याचा पुरवठा करण्यासाठी येत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगेवाडा-पेंढरी मार्गावर दोन पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. संशयित स्कॉर्पिओ वाहन दिसताच पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, वाहन रस्त्याच्या कडेला थांबताच, चालकाच्या बाजूला बसलेले दोन जण अंधाराचा आणि शेतशिवाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी वाहनचालक लखन जोहारी भैसा (वय ४०, रा. बेडगाव, ता. कोरची) याला ताब्यात घेतले.

वाहनाची तपासणी केली असता, त्यात रॉयल स्टॅग व्हिस्की, माऊंट ६००० बिअर, लेमाऊंट बिअर, मॅकडॉवेल्स नंबर वन रिझर्व्ह व्हिस्की आणि गोवा व्हिस्कीच्या बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला. या मद्यसाठ्याची किंमत सुमारे ४ लाख ५ हजार ८०० रुपये असून, जप्त करण्यात आलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनाची किंमत ७ लाख रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ११.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पेंढरी उपपोस्टे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लखन जोहारी भैसा याच्यासह निर्मल धमगाये आणि तरुण धमगाये (दोघे रा. कोरची) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोउपनि. शुभम जाधव करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. भगतसिंग दुलत, पोअं. प्रशांत गरफडे, सचिन घुबडे आणि चापोअं. दीपक लोणारे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
    user_Vinod
    Vinod
    गडचिरोली, गडचिरोली, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • ठाणे जिल्ह्यातील शीलफाटा आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, प्रशासन हट्टे-कट्टे फेरीवाले आणि मोठ्या व्यावसायिकांवर नरमाईने वागत आहे, तर दुसरीकडे दिव्यांग वैद्य, छोटे टपरीधारक आणि गरीब रोजगार करणाऱ्यांवर मात्र कठोर कारवाई करत आहे. यामुळे, या कारवाईत खरोखरच समानता राखली जात आहे की दुर्बळ घटकांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
    1
    ठाणे जिल्ह्यातील शीलफाटा आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, प्रशासन हट्टे-कट्टे फेरीवाले आणि मोठ्या व्यावसायिकांवर नरमाईने वागत आहे, तर दुसरीकडे दिव्यांग वैद्य, छोटे टपरीधारक आणि गरीब रोजगार करणाऱ्यांवर मात्र कठोर कारवाई करत आहे. यामुळे, या कारवाईत खरोखरच समानता राखली जात आहे की दुर्बळ घटकांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • संजय जाधवांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. या जल्लोषामुळे विकासाच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
    1
    संजय जाधवांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. या जल्लोषामुळे विकासाच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
    user_Live maharashtra digital
    Live maharashtra digital
    Video Creator वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • नागपूर डिजिटल पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनुसार, विजय ठाकूर यांची अध्यक्षपदी निवड झाली असून, मुकेश हेडाऊ यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
    1
    नागपूर डिजिटल पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनुसार, विजय ठाकूर यांची अध्यक्षपदी निवड झाली असून, मुकेश हेडाऊ यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • डॉ. राजिव पोतदार यांनी आपला विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. त्यांना विश्वास आहे की ते निवडणुकीत सहाशे पन्नास पेक्षा जास्त मतांनी विजयी होतील.
    1
    डॉ. राजिव पोतदार यांनी आपला विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. त्यांना विश्वास आहे की ते निवडणुकीत सहाशे पन्नास पेक्षा जास्त मतांनी विजयी होतील.
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • राज्य शासनाने डीजी लोन योजनेसाठी १,७६८.०८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले ५,४५९ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे गृहकर्ज प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. या मंजुरीमुळे हजारो पोलीस कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे पोलिसांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत न्याय मिळवून देणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.
    1
    राज्य शासनाने डीजी लोन योजनेसाठी १,७६८.०८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले ५,४५९ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे गृहकर्ज प्रस्ताव मार्गी लागणार आहेत.

या मंजुरीमुळे हजारो पोलीस कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे पोलिसांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत न्याय मिळवून देणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • वन विभागाच्या आवारात कुत्र्याचा सडलेला मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे वन विभागाच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    1
    वन विभागाच्या आवारात कुत्र्याचा सडलेला मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे वन विभागाच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.