सुशिक्षित बेरोजगारांसाठी सेलू व पाथरी येथे रोजगार मेळावे परभणी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्या वतीने रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दि. १३ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री साईबाबा मंदिर, महेश नगर, सेलू येथे तर दि. १७ मार्च २०२६ रोजी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांताबाई नखाते विद्यालय, शिवाजीनगर, पाथरी येथे “पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज्यातील विविध नामांकित उद्योजक व कंपन्या सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी इत्यादी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांची ट्रेनी ऑपरेटर, विमा सल्लागार, क्षेत्र अधिकारी, विमा सखी आदी पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. या पदांसाठी प्रारंभी १० ते २५ हजार रुपयांपर्यंत वेतन देण्यात येणार असून अनुभवावर आधारित वेतनवाढीची संधीही उपलब्ध राहणार आहे. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये प्रशिक्षण, आर्थिक लाभ व अनुभव प्रमाणपत्र मिळण्याची संधीही उपलब्ध आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी Mahaswayam Portal या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीची सुविधा मेळाव्याच्या ठिकाणीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे दि. १३ मार्च रोजी श्री साईबाबा मंदिर, महेश नगर, सेलू येथे आणि दि. १७ मार्च रोजी शांताबाई नखाते विद्यालय, शिवाजीनगर, पाथरी येथे उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीतजास्त बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. ०२४५२-२२००७४ वर संपर्क साधावा, असे आवाहन प्र.सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग यांनी केले आहे.

- वडवणी प्रतिनिधी वडवणी शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी1
- उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील रहदारी झाली कमी..1
- छत्रपती संभाजीनगरात मोबाईल चोरीतून एका तरुणाला चाकूने मारले! काल मधरात्री छत्रपती संभाजीनगर येथे मोबाईल चोरीतून एका तरुणाला चाकूने मारून जखमी केल्याची घटना घडली असून ती CCTV मध्ये कैद झाली आहे1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- mumbai malad infinity mall1
- छत्रपती संभाजीनगरात उच्च न्यायालयातील वकिलाची निर्घृण हत्या ! छत्रपती संभाजीनगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीड बायपास रोडवरील गांधेली फाट्याजवळ बुधवारी (दि. १५ एप्रिल) रात्री उशिरा उच्च न्यायालयातील वकील अॅड. मिथुन पुंडलिक भास्कर (वय ४९) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या मृत्यूमुळे विधी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.1
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- Post by Today One Live1