नाटंबी येथे पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्याचा बांध फोडला ; तहसीलदारांकडे तक्रार पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्याचा बांध फोडला; तहसीलदारांकडे तक्रार विक्रम शिंदे /भोर दि.13 पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नांटबी येथील शेतकरी लक्ष्मण भैरू खोपडे यांच्या गट नं. ३८५ मधील बांध पोलीस बळाचा वापर करून बेकायदेशीरपणे फोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत खोपडे यांनी १३ मार्च रोजी भोर तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, गट नं. ३८० मधील पाणंद रस्ता खुला करण्यासाठी ११ मार्च २०२६ रोजी मंडलाधिकारी आंबवडे आणि नायब तहसीलदार मॅडम पोलीस फौजफाटा आणि जेसीबी घेऊन आले. खोपडे यांनी सांगितले की, सदर पाणंद रस्ता आधीच २६ फेब्रुवारी २०२६ रोजी खुला करण्यात आला असून शासकीय मोजणीनुसार १२ फुटाचा रस्ता मान्य झाला होता. तरीही ओढ्यापासून १०० ते ११० फूट लांब बांध पोलीस बळाने फोडण्यात आला. या कारवाईत शेतजमीन, जनावरांचा चारा, जळाऊ लाकूड आणि गवऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गावातील जमीन विकत घेतलेल्या बाहेरील व्यक्तींच्या सांगण्यावरून ही बेकायदेशीर कारवाई झाल्याचा आरोप खोपडे यांनी केला आहे. नुकसानभरपाई, बांध पूर्ववत करणे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून हा अर्ज जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी भोर, आमदार शंकर मांडेकर आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही पाठवण्यात आला आहे.
नाटंबी येथे पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्याचा बांध फोडला ; तहसीलदारांकडे तक्रार पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्याचा बांध फोडला; तहसीलदारांकडे तक्रार विक्रम शिंदे /भोर दि.13 पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नांटबी येथील शेतकरी लक्ष्मण भैरू खोपडे यांच्या गट नं. ३८५ मधील बांध पोलीस बळाचा वापर करून बेकायदेशीरपणे फोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत खोपडे यांनी १३ मार्च रोजी भोर तहसीलदारांकडे लेखी
तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, गट नं. ३८० मधील पाणंद रस्ता खुला करण्यासाठी ११ मार्च २०२६ रोजी मंडलाधिकारी आंबवडे आणि नायब तहसीलदार मॅडम पोलीस फौजफाटा आणि जेसीबी घेऊन आले. खोपडे यांनी सांगितले की, सदर पाणंद रस्ता आधीच २६ फेब्रुवारी २०२६ रोजी खुला करण्यात आला असून शासकीय मोजणीनुसार १२ फुटाचा रस्ता मान्य झाला होता. तरीही ओढ्यापासून १०० ते ११० फूट लांब बांध पोलीस बळाने
फोडण्यात आला. या कारवाईत शेतजमीन, जनावरांचा चारा, जळाऊ लाकूड आणि गवऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गावातील जमीन विकत घेतलेल्या बाहेरील व्यक्तींच्या सांगण्यावरून ही बेकायदेशीर कारवाई झाल्याचा आरोप खोपडे यांनी केला आहे. नुकसानभरपाई, बांध पूर्ववत करणे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून हा अर्ज जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी भोर, आमदार शंकर मांडेकर आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही पाठवण्यात आला आहे.
- ग्लोबल ब्रॅंड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूंनी दाखविला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विक्रम शिंदे /भोर दि.16 नव्या काळांच्या आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखविला आहे. ग्लोबल ब्रँड असेल्या राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.16) पुणे जिह्यातील भोर येथील रांजे येथे दिली. त्यांच्या हस्ते रांजे इथं उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, यांच्यासह इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते. स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली, नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर असलेली दर्जेदार यंत्रणा या पार्कमध्ये उभारण्यात आली आहे.2
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात काल रात्री रत्यावरून जाणाऱ्या एका महिलेच्या अंगावर भलमोठ झाड कोसळल्याची घटना घडली,... सुदैवानं या घटनेत ही महिला किरकोळ जखमी झाली आहे, वर्दळीच्या रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेची वर्दी मिळताच आपल्या कडे असलेल्या साधन सामग्रीच्या साहाय्याने झाड कापून रस्ता मोकळा केला....1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- सर्वात आधी मी पोलिसांचा आभार मानतो की त्याच्या मुळे अनेक लोकांचे जीव वाचला नाही तर खूप मोठा अपघात झाला असता. आता त्याच्या मध्ये असा झाला त्याने सिग्नल तोडला मग पोलिसांनी त्याला गाडी साईडला घेयला सांगितले होती. मग पोलिसांनी पकडलं म्हणून त्याला राग आला तो पळून जायचं प्रयत्न करत होता त्याचा राग एवढा भयंकर होता त्याने रागाच्या भरात बाईक चा भुर भुर असा फुल रेस केला होता. आणि त्याच्या रागाच्या भरात मध्ये त्यांना लोकांना उडवला असता रिक्षा साठी लोक थांबले होते म्हणून पोलिसांनी चावी काढली म्हणून पोलिसांचा आभार मानतो कारण आज पोलिसांनी चावी काढली नसती तर आज मोठा अपघात झाला असता त्याने शांतपणे गाडी बाजूला घेऊन गाडीतून उतरून भले रागाने बोलले तरी चाललेल रागाने कोणतीच गाडी चालवून नका. त्याने अपघात होण्याची शक्यता आहे.1
- चार महिन्यांपूर्वी लग्न, हुंड्यासाठी नवऱ्याने आणि सासूने नवविवाहित सोनाली ला संपविले, पतीला अन् सासूला मोहोळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या!1
- पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : शहरातील अनैतिक मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत गुन्हेगारी विश्वाला जोरदार धक्का दिला आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने चिखली परिसरात मध्यरात्री छापा टाकून एक मोठे रॅकेट उघडकीस आणले. १३ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास देहू-आळंदी रोडवरील लक्ष्मी चौकातील ‘आदित्य लॉज’वर अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईत ९ महिलांची सुटका करण्यात आली. यातील एक महिला बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या तस्करी करून आणण्यात आल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. संबंधित महिलेच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असून तिला मायदेशी पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक तपासात ‘आदित्य लॉज’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी लॉज चालक, मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने २०२६ या वर्षात आतापर्यंत ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये ७ मसाज पार्लर आणि ४ हॉटेल्सचा समावेश आहे. या कारवायांमध्ये एकूण ३१ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांची ही कारवाई केवळ गुन्हेगारीवर प्रहार नसून, पीडित महिलांना नवजीवन देणारी ठरत आहे.1
- आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद घेतला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त साहेबांनी आशीर्वाद दिला आणि मी कायम राहुल तुझ्यासोबत आहे हे शब्द साहेबांचे ऊर्जा देतात एवढ्या व्यस्त वेळेतून राहुलला भेटायचे हे साहेबांच्या लक्षात राहतं हीच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे साहेब महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेवटच्या पोलिसांची मदत करेल आणि प्रामाणिक काम करेल तुमची साथ आणि आशीर्वाद असाच माझ्या डोक्यावर राहू द्या ही विनंती महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व त्या परिवाराला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य1
- पिंपरी चिंचवड :- बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याला शस्त्र पुरवणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पिंपरी स्मशानभूमीसमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली... मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित वाघमारे हे गस्तीवर असताना त्यांना एका अल्पवयीन मुलाकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता, त्या मुलाकडे ५० हजार ५०० रुपये किमतीची देशी बनावटीची पिस्तूल मिळून आली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलासह त्याला शस्त्र पुरवणारा प्रतापसिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत....1