logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बाभुळगावच्या संतोष विद्यालयाच्या आयोजित टॅलेंट सर्च परीक्षेत ५५० विद्यार्थ्यांचा सहभाग येवला - सध्याच्या स्पर्धेच्या युगात बालवयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी या हेतूने जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित बाभुळगाव येथील एस.एस.एम. विद्यालय व ज्युनीयर कॉलेजच्या वतीने रोजी संतोष टॅलेंट सर्च परीक्षा पार पडली. तालुक्यातील इयत्ता 4थी च्या तब्बल 550 विद्यार्थ्यांनी या परीक्षेतून आपले टॅलेंट आजमावले आहे. परीक्षेचा निकाल लगेच लावण्यात येऊन गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कमचे बक्षीस, ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन संस्थेचे युवा संचालक संकेतभाऊ दराडे, प्राचार्य जी. एस. येवले सर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक 3001 रुपये रोख व ट्रॉफी राजापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी पार्थ रामकृष्ण घुगे याने पटकावला.द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 2001 रुपये रोख व ट्रॉफी मुरमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी श्रद्धा कृष्णा शिंदे हिने मिळवले तर तृतीय क्रमांक 1001 रुपये रोख व ट्रॉफी देखील मुरमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी ईश्वरी लक्ष्मण शिंदे हिने मिळवले. उत्तेजनार्थ बक्षीस 501 रुपये रोख व ट्रॉफी आडगाव चोथवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी समृद्धी प्रविण खोकले या विद्यार्थिनीने मिळविले. टॅलेंट सर्च परीक्षेमुळे विद्यार्थी वेळेचे नियोजन करणे, आपली प्रज्ञा योग्य पद्धतीने वापरणे शिकतात, विद्यार्थी हितासाठी संस्था नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असते व यापुढेही नेहमी राबवत राहील अशी ग्वाही जगदंबा, मातोश्री एज्युकेशन सोसायटी चे युवा संचालक संकेतभाऊ दराडे यांनी यावेळी बोलताना दिली. सध्याच्या स्पर्धा परीक्षांच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी माहिती असणे गरजेचे आहे, या हेतूने संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या वतीने टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित केली. पालकांनी विद्यार्थ्यांना लहानपणापासूनचा विविध स्पर्धेत उतरवणे गरजचे आहे. पालक व शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नांने नक्कीच विद्यार्थी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन प्राचार्य जी. एस. येवले सर यांनी प्रास्तविक करताना केले. पालक प्रतिनिधी रामकृष्ण घुगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या परीक्षा फार उपयुक्त असून खुप छान उपक्रम राबविल्याबद्दल शाळा, संस्था व दराडे परिवाराचे आभार मानले. पालक पुजाताई वाघ यांनी, या परीक्षेमुळे लहानग्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर झाली, त्यांना तर्क-वितर्क विचार करण्याची क्षमता वाढते, त्यामुळे सर्वच पालकांनी मुलांना अशा स्पर्धा परीक्षानां बसविले पाहिजे असे मत व्यक्त केले. मराठी, इंग्रजी भाषा, गणित, विज्ञान व सामान्यज्ञानावर आधारित १०० गुणांची ही परीक्षा घेण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार जीवनाभियोग शिक्षण देणारे पहिले पाऊल म्हणून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ व्हावी यासाठी ही परीक्षा प्रत्येक वर्षी परीक्षा घेण्यात येणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष नरेंद्रभाऊ दराडे, माननीय शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे, संचालक रुपेशभाऊ दराडे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

4 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
4 hrs ago
ec588b0c-2b1b-438b-b2e5-3b350fbeb1a0

बाभुळगावच्या संतोष विद्यालयाच्या आयोजित टॅलेंट सर्च परीक्षेत ५५० विद्यार्थ्यांचा सहभाग येवला - सध्याच्या स्पर्धेच्या युगात बालवयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी या हेतूने जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित बाभुळगाव येथील एस.एस.एम. विद्यालय व ज्युनीयर कॉलेजच्या वतीने रोजी संतोष टॅलेंट सर्च परीक्षा पार पडली. तालुक्यातील इयत्ता 4थी च्या तब्बल 550 विद्यार्थ्यांनी या परीक्षेतून आपले टॅलेंट आजमावले आहे. परीक्षेचा निकाल लगेच लावण्यात येऊन गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कमचे बक्षीस, ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन संस्थेचे युवा संचालक संकेतभाऊ दराडे, प्राचार्य जी. एस. येवले सर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक 3001 रुपये रोख व ट्रॉफी राजापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी पार्थ रामकृष्ण घुगे याने पटकावला.द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 2001 रुपये रोख व ट्रॉफी मुरमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी श्रद्धा कृष्णा शिंदे हिने मिळवले तर तृतीय क्रमांक 1001 रुपये रोख व ट्रॉफी देखील मुरमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी ईश्वरी लक्ष्मण शिंदे हिने मिळवले. उत्तेजनार्थ बक्षीस 501 रुपये रोख व ट्रॉफी आडगाव चोथवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी समृद्धी प्रविण खोकले या विद्यार्थिनीने मिळविले. टॅलेंट सर्च परीक्षेमुळे विद्यार्थी वेळेचे नियोजन करणे, आपली प्रज्ञा योग्य पद्धतीने वापरणे शिकतात, विद्यार्थी हितासाठी संस्था नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असते व यापुढेही

72b0ee28-24eb-49f8-8d43-61278e0a347b

नेहमी राबवत राहील अशी ग्वाही जगदंबा, मातोश्री एज्युकेशन सोसायटी चे युवा संचालक संकेतभाऊ दराडे यांनी यावेळी बोलताना दिली. सध्याच्या स्पर्धा परीक्षांच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी माहिती असणे गरजेचे आहे, या हेतूने संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या वतीने टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित केली. पालकांनी विद्यार्थ्यांना लहानपणापासूनचा विविध स्पर्धेत उतरवणे गरजचे आहे. पालक व शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नांने नक्कीच विद्यार्थी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन प्राचार्य जी. एस. येवले सर यांनी प्रास्तविक करताना केले. पालक प्रतिनिधी रामकृष्ण घुगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या परीक्षा फार उपयुक्त असून खुप छान उपक्रम राबविल्याबद्दल शाळा, संस्था व दराडे परिवाराचे आभार मानले. पालक पुजाताई वाघ यांनी, या परीक्षेमुळे लहानग्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर झाली, त्यांना तर्क-वितर्क विचार करण्याची क्षमता वाढते, त्यामुळे सर्वच पालकांनी मुलांना अशा स्पर्धा परीक्षानां बसविले पाहिजे असे मत व्यक्त केले. मराठी, इंग्रजी भाषा, गणित, विज्ञान व सामान्यज्ञानावर आधारित १०० गुणांची ही परीक्षा घेण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार जीवनाभियोग शिक्षण देणारे पहिले पाऊल म्हणून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ व्हावी यासाठी ही परीक्षा प्रत्येक वर्षी परीक्षा घेण्यात येणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष नरेंद्रभाऊ दराडे, माननीय शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे, संचालक रुपेशभाऊ दराडे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नगर-मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी असलेल्या गतिरोधकावर आयशर ट्रकने मालवाहू ट्रकला पाठीमागून धडक दिली या धडकेमुळे आयशर ट्रकचा चक्काचूर झाला या भीषण अपघातात आयशर ट्रक मधील चालक गंभीर जखमी होऊन केबिनमध्ये अडकून पडला होता यावेळी संभाजी पवार मित्र मंडळाने वेळीच मदत करून चालकाला केबिन तोडून बाहेर काढले पुढील उपचारासाठी येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे
    4
    नगर-मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी असलेल्या गतिरोधकावर आयशर ट्रकने मालवाहू ट्रकला पाठीमागून धडक दिली या धडकेमुळे आयशर ट्रकचा चक्काचूर झाला या भीषण अपघातात आयशर ट्रक मधील चालक गंभीर जखमी होऊन केबिनमध्ये अडकून पडला होता यावेळी संभाजी पवार मित्र मंडळाने वेळीच मदत करून चालकाला केबिन तोडून बाहेर काढले पुढील उपचारासाठी येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात वन विभागाला नवजात बिबट्याची पिले आढळली असून त्यात एक पिल्लू पांढऱ्या रंगाचे असल्याने विशेष लक्ष वेधून घेत आहे. हे दुर्मिळ पिल्लू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वन विभागाने पिलांना ताब्यात घेऊन उपचार सुरू केले असून त्यांच्या संगोपनाची काळजी घेतली जात आहे. या घटनेमुळे परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.
    1
    नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात वन विभागाला नवजात बिबट्याची पिले आढळली असून त्यात एक पिल्लू पांढऱ्या रंगाचे असल्याने विशेष लक्ष वेधून घेत आहे. हे दुर्मिळ पिल्लू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वन विभागाने पिलांना ताब्यात घेऊन उपचार सुरू केले असून त्यांच्या संगोपनाची काळजी घेतली जात आहे. या घटनेमुळे परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • #बिहार के #नालंदा जिला के #नुरसराय थाना क्षेत्र का बच्चा #चोरी के आरोप में एक #महिला के साथ इस तरह दुर्व्यवहार और #छेड़खानी करना बहुत ही ग़लत है। इस तरह छेड़खानी करने वाले को प्रशासन जल्द गिरफ्तार करें। इंसानियत मर चुकी है, किसी का मां बहन बेटियों के साथ बीच रोड पर इस तरह छेड़खानी करना एक अपराधी जैसा व्यवहार किया जा रहा है। #अशोक_यादव महिला का इज्जत लुट रहा हुआ गिरफ्तार लेकिन ये सब को फांसी हो 🤬
    1
    #बिहार के #नालंदा जिला के #नुरसराय थाना क्षेत्र का बच्चा #चोरी के आरोप में एक #महिला  के साथ इस तरह दुर्व्यवहार  और #छेड़खानी करना बहुत ही ग़लत है। इस तरह छेड़खानी करने वाले को प्रशासन जल्द गिरफ्तार करें। इंसानियत मर चुकी है, किसी का मां बहन बेटियों के साथ बीच रोड पर इस तरह छेड़खानी करना एक अपराधी जैसा व्यवहार किया जा रहा है। #अशोक_यादव महिला का इज्जत लुट रहा हुआ गिरफ्तार लेकिन ये सब को फांसी हो 🤬
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • सिल्लोड : पालोद येथील माणिकराव पालोदकर महाविद्यालयातील प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न, आजी-माजी शिक्षक विद्यार्थी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
    1
    सिल्लोड : पालोद येथील माणिकराव पालोदकर महाविद्यालयातील प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न, आजी-माजी शिक्षक विद्यार्थी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सर्व धर्मीय सद्भावना ईद मिलन: Bk Dr Donika & Maulana ने दिया शांति का संदेश
    1
    सर्व धर्मीय सद्भावना ईद मिलन: Bk Dr Donika & Maulana ने दिया शांति का संदेश
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    11 hrs ago
  • मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा जवळ एक भीषण अपघात घडला असून डंपरने दोन दुचाकींना चिरडल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
    1
    मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा जवळ एक भीषण अपघात घडला असून डंपरने दोन दुचाकींना चिरडल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पत्रकार रामेश्वर दरेकर साहेब यांच्यावरील कारवाई आणि त्याविरोधात 'ऑल इंडिया पँथर सेने'ने घेतलेली आक्रमक भूमिका हा विषय सध्या लोकशाहीतील 'चौथ्या स्तंभा'च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ​प्रश्नांची भीती वाटते का? एखाद्या पत्रकाराने शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर ते 'गुन्हा' कसे ठरतात? सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबणे सोपे वाटते का? ​लोकशाही की हुकूमशाही? संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करण्याऐवजी, कायद्याचा धाक दाखवून पत्रकारांना गप्प करणे ही अघोषित आणीबाणी नाही का? ​कारवाईचा निकष काय? ज्या वेगाने पत्रकारांवर गुन्हे दाखल होतात, त्याच वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कष्टकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही? कारवाईचा रोख नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांकडेच का असतो? ​दडपशाहीने प्रश्न सुटतील का? रामेश्वर दरेकर यांच्यासारख्या पत्रकाराला कायदेशीर कचाट्यात अडकवून तुम्ही प्रश्न संपवू पाहत आहात की ते अधिक प्रखर करू पाहत आहात? ही दडपशाही जनतेचा असंतोष वाढवणारी ठरणार नाही का? ​पोलिस प्रशासनाचा राजकीय वापर? सामान्यांचा आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध पोलिस यंत्रणेचा वापर करणे हा सत्तेचा दुरुपयोग नाही का? ऑल इंडिया पँथर सेनेने उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ एका संघटनेचे नसून संपूर्ण लोकशाही प्रेमी जनतेचे आहेत, त्याचे उत्तर सरकार कधी देणार? ​ लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता हा सत्तेचा दागिना असतो. जेव्हा लेखणीवर निर्बंध येतात, तेव्हा समाज अधोगतीकडे जातो. रामेश्वर दरेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध करणे हा केवळ एका व्यक्तीचा बचाव नसून, तो 'बोलण्याच्या स्वातंत्र्याचा' बचाव आहे. ​या प्रकरणात सरकारने केवळ कारवाई मागे न घेता, पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ​
    1
    पत्रकार रामेश्वर दरेकर साहेब यांच्यावरील कारवाई आणि त्याविरोधात 'ऑल इंडिया पँथर सेने'ने घेतलेली आक्रमक भूमिका हा विषय सध्या लोकशाहीतील 'चौथ्या स्तंभा'च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी 
​प्रश्नांची भीती वाटते का?
एखाद्या पत्रकाराने शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर ते 'गुन्हा' कसे ठरतात? सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबणे सोपे वाटते का?
​लोकशाही की हुकूमशाही?
संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करण्याऐवजी, कायद्याचा धाक दाखवून पत्रकारांना गप्प करणे ही अघोषित आणीबाणी नाही का?
​कारवाईचा निकष काय?
ज्या वेगाने पत्रकारांवर गुन्हे दाखल होतात, त्याच वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कष्टकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही? कारवाईचा रोख नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांकडेच का असतो?
​दडपशाहीने प्रश्न सुटतील का?
रामेश्वर दरेकर यांच्यासारख्या पत्रकाराला कायदेशीर कचाट्यात अडकवून तुम्ही प्रश्न संपवू पाहत आहात की ते अधिक प्रखर करू पाहत आहात? ही दडपशाही जनतेचा असंतोष वाढवणारी ठरणार नाही का?
​पोलिस प्रशासनाचा राजकीय वापर?
सामान्यांचा आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध पोलिस यंत्रणेचा वापर करणे हा सत्तेचा दुरुपयोग नाही का? ऑल इंडिया पँथर सेनेने उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ एका संघटनेचे नसून संपूर्ण लोकशाही प्रेमी जनतेचे आहेत, त्याचे उत्तर सरकार कधी देणार?
​
लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता हा सत्तेचा दागिना असतो. जेव्हा लेखणीवर निर्बंध येतात, तेव्हा समाज अधोगतीकडे जातो. रामेश्वर दरेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध करणे हा केवळ एका व्यक्तीचा बचाव नसून, तो 'बोलण्याच्या स्वातंत्र्याचा' बचाव आहे.
​या प्रकरणात सरकारने केवळ कारवाई मागे न घेता, पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची  कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नाशिक–निफाड रस्त्यावर स्कॉर्पिओ व कंटेनर ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने स्कॉर्पिओवर चढताच गाडीचा समोरील भाग चकनाचूर झाला. हा थरार CCTV मध्ये कैद झाला असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्कॉर्पिओमध्ये असलेले पोलीस कर्मचारी कयूम सय्यद हे या अपघातातून थोडक्यात बचावले. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
    1
    नाशिक–निफाड रस्त्यावर स्कॉर्पिओ व कंटेनर ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने स्कॉर्पिओवर चढताच गाडीचा समोरील भाग चकनाचूर झाला. हा थरार CCTV मध्ये कैद झाला असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्कॉर्पिओमध्ये असलेले पोलीस कर्मचारी कयूम सय्यद हे या अपघातातून थोडक्यात बचावले. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.