कुरखेडा तालुक्यातील नुकसानग्रस्त घरांचे तातडीने सर्वेक्षण करून भरपाई द्या *कुरखेडा तालुक्यातील नुकसानग्रस्त घरांचे तातडीने सर्वेक्षण करून भरपाई द्या* – भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांची प्रशासनाकडे मागणी कुरखेडा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्त घरांचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे पूर्ण करावेत तसेच पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी प्रशासनाकडे केली आहे. कुरखेडा शहरातील ज्येष्ठ नागरिक नरेश हडप यांचे पावसामुळे कोसळल्याची माहिती मिळताच चांगदेव फाये यांनी कुरखेडा नगरपंचायत नगरसेवक भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ पदाधिकारी रामभाऊ वैद्य, माजी पंचायत समिती सदस्य महादेव पुंगळे तसेच भरत भट्टड यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. हडप दाम्पत्य दोघेच घरात वास्तव्यास असून घर कोसळल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यावेळी चांगदेव फाये यांनी तहसीलदार शशिकांत जाधव तसेच संबंधित तलाठी ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून तातडीने घटनास्थळी भेट देऊन सर्वेक्षण व पंचनामा पूर्ण करण्याची तसेच नुकसानभरपाईचा प्रस्ताव त्वरीत मंजूर करण्याची मागणी केली. याशिवाय, कुरखेडा तालुक्यात विविध गावांमध्येही पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाल्याची बाब निदर्शनास आली असून सर्व नुकसानग्रस्त कुटुंबांचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ज्या कुटुंबांची घरे पूर्णपणे पडली आहेत, अशा कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर शासकीय घरकुल योजनांतून प्राधान्याने लाभ देऊन त्यांची कायमस्वरूपी निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी चांगदेव फाये यांनी केली. यासंदर्भात त्यांनी कुरखेडा तहसीलदार शशिकांत जाधव, गटविकास अधिकारी धीरज पाटील तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे मागणी केली आहे.

- SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट) नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की। अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी। BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की। (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)1
- क्या आपका Liver अंदर से स्वस्थ है? 20 सेकंड में करें ये 4 Home Tests ! | 💡 🌸 आज ही अपनी सेहत का ध्यान रखें 🌸हर स्वास्थ्य समस्या का सही और सुरक्षित समाधान ✨ Heart Diseases ✨ Diabetes ✨ Kidney Diseases ✨ Liver Diseases ✨ Lung(Asthma & TB) 📍 स्वस्थ जीवन की शुरुआत सही सलाह से 📞 Appointment Book करें: +91 9125734374 #DrMeherAbbas #LiverFunctionTest #LiverHealth #FattyLiver&NAFLD #Fibrousscan @TopFan2
- जि.प. भोजापूर शाळेत शैक्षणिक साहित्याचा नियमित वापराने विद्यार्थी आनंदी जि.प. भोजापूर शाळेत शैक्षणिक साहित्याचा नियमित वापराने विद्यार्थी आनंदी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांचे उपक्रमातून प्रयत्न1
- ऑरेंज अलर्टमध्येही प्रशिक्षणाची सक्ती? हिंगणघाट हायवेवरील भीषण अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू वर्धा. हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असतानाही प्रशिक्षणासाठी प्रवास करावा लागल्याने एका शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ घडली. या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शिक्षकांमध्ये व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. जोशना खेमनाद रामटेके (नारायणजे), रा. हिंगणघाट या शाळेचे काम पूर्ण करून चिंचोली येथे आयोजित प्रशिक्षणासाठी आपल्या मोपेडने निघाल्या होत्या. हिंगणघाट–चिंचोली मार्गावर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तरीही शिक्षकांना नियमित शाळा पूर्ण करून दुपारी आयोजित शिक्षण परिषद/प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रशिक्षण शहराऐवजी चिंचोलीसारख्या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आल्याने शिक्षकांना प्रतिकूल हवामानात प्रवास करावा लागल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सौ. रामटेके (नारायणजे) यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शिक्षकांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांच्या ताणाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत शिक्षिकेच्या नातेवाईकांनी तसेच काही शिक्षकांनी प्रतिकूल हवामानात प्रशिक्षणासाठी सक्तीने प्रवास करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ यापूर्वीही अनेक अपघात घडले असून या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याची तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.1
- साकोली तालुक्यातील विर्सी येथे चक्रिवादळ, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, वीजेचे पोल व झाडे पडली1
- *शंकरपुरच्या शेतशिवारात चक्रीवादळाचा थैमान !* _शेतकरी अनिल पात्रिकर यांच्या शेतीचे नुकसान !_ _तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी !_ साकोली तालुका प्रतिनिधी ३० जुलै २०२६ साकोली/भंडारा साकोली शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या शंकरपुर/वडेगांव येथे बुधवार, २९ जुलै रोजी, दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास शेतशिवाराच्या परिसरातून अचानक वादळी वाऱ्यांचे प्रवाह वाहत आले. प्रवाहाचा वेग इतका सुसाट होता की, शेतशिवारातील सुमारे १० विजेचे खांब कोसळून असंख्य झाडे उन्मळून पडली आहेत तर स्थानिक शेतकरी अनिल पात्रिकर यांच्या शेतातील सोलर पॅनल, बोरवेल्स पंप व नुकतीच झालेल्या भात रोवणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे परिसरातील सर्वचं शेतकऱ्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र; चक्रीवादळाचा प्रवाह येथील स्थानिक शेतकरी अनिल पात्रिकर यांच्या शेतशिवारातून थेट वाहून गेल्याने त्यांच्या शेतात बसविलेले सोलर पॅनल बसविलेल्या जागेवरून उखडून दूर जाऊन पडले तर बोरवेल्स पंप जागीच वाकले असून नुकतीच झालेल्या भात रोवणीमधे झाडे उन्मळून पडल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शंकरपुर/वडेगांव या मुख्य मार्गांवर झाडे उन्मळून पडल्याने मानवी रहदारी ठप्प पडली आहे तर शेतशिवारात विजेचे खांब कोसळून पडल्याने वीजसेवा पुरवठा खंडित झाला आहे. या सेवा पूर्णवत: सुरू करण्यासाठी तारमार्ग तंत्री व संबंधित शेतकऱ्यांच्या हालचाली सुरु आहेत तर येत्या ७२ तासांत शेतशिवारातील झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत व नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. “चक्रीवादळामुळे माझ्या शेतातील सोलर पॅनेल, बोरवेल्स पंप व भात रोवणीचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करतो आहे.” - श्री. अनिल पात्रिकर (स्थानिक शेतकरी, शंकरपुर/वडेगांव) “या पूर्वीही गावात बरेचं चक्रीवादळ आले, मात्र; असा चक्रीवादळ हा गावात पहिल्यांदाचं आला आहे, या वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून आर्थिक फटका बसलेला आहे.” - श्री. रेखराम मडावी (स्थानिक शेतकरी, शंकरपुर) “चक्रीवादळाच्या दिवशी गुरुपौर्णिमा असल्याने विद्यार्थ्यांना सकाळ पाळीत शाळा व शेतकऱ्यांचे शेतीतील कामे बंद होते. त्यामुळे कुठलीही जीवितहाणी झाली नाही, यासाठी प्रथम देवाचे आभार मानतो.” - श्री. रमेश सोनवाने (स्थानिक शेतकरी, शंकरपुर)1