विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका महत्त्वाची... गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे देगलूर.. देशाच्या विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची असून या युवकांच्या जडणघडणीमध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे प्रतिपादन गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे यांनी केले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि देगलूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे मौजे लख्खा येथे दि 30 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित केलेल्या सात दिवसीय विशेष वार्षिक शिबीराच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मा. विलास तोटावार हे होते .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ सुंदरबाई रुक्माजी बोयावार, अडत व्यापारी शिक्षण संस्था कार्यकारी मंडळाचे सदस्य रवींद्र द्याडे, चंद्रकांत नारलावार , संस्थेचे सदस्य गुरुराज चिद्रावार ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम एम चमकुडे , उपप्रचार्य डॉ.व्ही. जी. शेरीकर, पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , उपसरपंच सूर्यकांत मुंडकर ग्रामसेवक राजेश्वर नुच्चे, शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र नवेकर, कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय देबडे , शालेय व्यवस्थापन समितीचे दिगंबर बोयावार हे मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा गांधी आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय देबडे यांनी केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम एम चमकुडे यांनी स्वागतपर आपले विचार मांडले. संस्थेचे सदस्य गुरुराज चिद्रावार यानी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक देगलूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जडणघडण कशी होते यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांनी इतरांच्या अनुभवाचा ज्ञानातून आपले जीवन समृद्ध करावे असे प्रतिपादन करून देगलूर महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. अध्यक्षीय समारोपात संस्थेचे कोषाध्यक्ष विलास तोटावार यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापनेच्या इतिहासावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना घडविण्यामध्ये विशेष वार्षिक शिबीर महत्त्वाची भूमिका बजावते असे सांगून शिबिरामध्ये राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची प्रशंसा करून शिबीर यशस्वी केल्याबद्दल विद्यार्थी, गावकरी, प्राध्यापक या सर्वांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष येरा वार यांनी केले तर आभार कार्यक्रमाधिकारी डॉ व्यंकट खंदकुरे यांनी मानले. या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर व्यंकटेश शेरीकर, कार्यक्रमाधिकारी प्रा. गणेश क्यादारे , प्रा. शिवचरण गुरुडे ,ग्रामपंचायतचे सदस्य ,राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीचे सदस्य , शिक्षकेत्तर कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आली.

- CM ने कहा था बेटी से छेड़छाड़ की तो यमराज आरोपी का इंतजार करेंगे! क्या अभी यमराज सो रहे हैं? एक सांसद कपसाढ़ नहीं जा सकता, क्या कपसाढ़ पाकिस्तान में है"1
- 💥कृष्णा नगर परिसरात सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती धक्के कशाचे? प्रशासनाकडून तपास सुरू 💥भूकंपाचे सौम्य धक्के, बांधकामाशी संबंधित हालचाल किंवा अन्य कोणते कारण असू शकते का, याचा प्रशासनाकडून सखोल तपास 💥कृष्णा नगर परिसरातील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना हे धक्के अधिक जाणवले 💥नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन ✍️सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- *जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; जागोजागी शेकोट्या पेटल्या...* https://youtu.be/i9vKF9vj0QU?si=nj18YTwPBzvhX0tS1
- Post by Peoples News 241
- जाफ्राबाद भारज येथे मांस पकडले1
- mkrskrnte ke ladu 😍🙏 good night freind shubh ratri dosto🙏दोस्तो देने के लिए दान , लेने के लिए ज्ञान, और त्यागने के लिए अभीमान सर्वश्रेष्ठ है...✍️🥀🌹🤩💫🌟⭐✨⚡ 🌹शुभ संध्या फ्रेंड्स 🌃🌹🤩💫7
- धर्माबाद मध्ये कंटनेरची मालवाहू ऑटोला धडक दिघे गंभीर दोन शेळ्या ठार1
- प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे1
- Post by Peoples News 241