logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तहसील कार्यालयात शासकीय सेवांचे डिजिटल शुल्क फलक बसवावा नागरिकांना सेवा, कागदपत्रे, प्रक्रिया व अधिकृत शुल्काची स्पष्ट माहिती मिळण्याची मागणी संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी चंदगड : चंदगड तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना संबंधित सेवेसाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, अपेक्षित कालावधी तसेच शासनाने निश्चित केलेले अधिकृत शुल्क याची स्पष्ट माहिती मिळावी, यासाठी तहसील कार्यालयाच्या परिसरात डिजिटल माहिती व शुल्क फलक बसवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मजरे शिरगाव येथील एकनाथ वाके यांनी याबाबत तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तालुक्यातील नागरिक विविध महसूल व शासकीय कामांसाठी मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात येतात. शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी अनेक सेवा ऑनलाइन तसेच सेवा केंद्रांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना काही सेवांसाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया, सेवा मिळण्याचा कालावधी आणि शासनाने निश्चित केलेले शुल्क याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध होत नसल्याने गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. तहसील कार्यालयाच्या परिसरात डिजिटल फलकावर विविध शासकीय सेवांची अद्ययावत माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची प्रक्रिया, अपेक्षित कालावधी आणि अधिकृत शुल्क ठळकपणे दर्शविल्यास नागरिकांना मोठी सुविधा मिळू शकते. तसेच कोणत्याही सेवेसाठी अनधिकृत शुल्क आकारले जात आहे का, याबाबत नागरिकांना अधिक जागरूक राहण्यास मदत होईल. नागरिकांना शासकीय कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व सुलभता मिळावी, तसेच अनावश्यक गैरसमज व गैरसोय टाळता यावी, यासाठी चंदगड तहसील कार्यालयासह संबंधित शासकीय कार्यालयांच्या परिसरात डिजिटल माहिती फलक बसविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

1 hr ago
user_Sanjay Aagashe
Sanjay Aagashe
Accountant चांदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र•
1 hr ago

तहसील कार्यालयात शासकीय सेवांचे डिजिटल शुल्क फलक बसवावा नागरिकांना सेवा, कागदपत्रे, प्रक्रिया व अधिकृत शुल्काची स्पष्ट माहिती मिळण्याची मागणी संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी चंदगड : चंदगड तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना संबंधित सेवेसाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, अपेक्षित कालावधी तसेच शासनाने निश्चित केलेले अधिकृत शुल्क याची स्पष्ट माहिती मिळावी, यासाठी तहसील कार्यालयाच्या परिसरात डिजिटल माहिती व शुल्क फलक बसवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मजरे शिरगाव येथील एकनाथ वाके यांनी याबाबत तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तालुक्यातील नागरिक विविध महसूल व शासकीय कामांसाठी मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात येतात. शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी अनेक सेवा ऑनलाइन तसेच सेवा केंद्रांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना काही सेवांसाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया, सेवा मिळण्याचा कालावधी आणि शासनाने निश्चित केलेले शुल्क याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध होत नसल्याने गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. तहसील कार्यालयाच्या परिसरात डिजिटल फलकावर विविध शासकीय सेवांची अद्ययावत माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची प्रक्रिया, अपेक्षित कालावधी आणि अधिकृत शुल्क ठळकपणे दर्शविल्यास नागरिकांना मोठी सुविधा मिळू शकते. तसेच कोणत्याही सेवेसाठी अनधिकृत शुल्क आकारले जात आहे का, याबाबत नागरिकांना अधिक जागरूक राहण्यास मदत होईल. नागरिकांना शासकीय कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व सुलभता मिळावी, तसेच अनावश्यक गैरसमज व गैरसोय टाळता यावी, यासाठी चंदगड तहसील कार्यालयासह संबंधित शासकीय कार्यालयांच्या परिसरात डिजिटल माहिती फलक बसविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Mahadoot news
    1
    Post by Mahadoot news
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by E city news network
    1
    Post by E city news network
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • लाखो भाविक हजर असताना तासगाव गणपती रथाजवळ रूग्णवाहिका आली असता सर्वानी वाट करून दिली,व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
    1
    लाखो भाविक हजर असताना तासगाव गणपती रथाजवळ रूग्णवाहिका आली असता सर्वानी वाट करून दिली,व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • मराठ्यांच्या लेकराचे भविष्य घडवण्यासाठी जरांगे पाटील मुंबईकडे रवाना महाराष्ट्रातील मराठ्यांच्या लेकरा बाळांचे भविष्य चांगलं घडावं या अनुषंगाने जरागे पाटील यांनी आंदोलन उपोषण करून शासनाला जागा केलं व मुंबई मराठ्यांचा मोर्चा धडकणार होता पण शासनाने त्यांच्या बंदी घातली मग जरांगे पाटील स्वतः मुंबईला रवाना झाले यावेळी ठिकठिकाणी गावातून त्यांचे पुष्पवृष्टी करून महिलांनी स्वागत केले
    1
    मराठ्यांच्या लेकराचे भविष्य घडवण्यासाठी जरांगे पाटील मुंबईकडे रवाना
महाराष्ट्रातील मराठ्यांच्या लेकरा बाळांचे भविष्य चांगलं घडावं या अनुषंगाने जरागे पाटील यांनी आंदोलन उपोषण करून शासनाला जागा केलं व मुंबई मराठ्यांचा मोर्चा धडकणार होता पण शासनाने त्यांच्या बंदी घातली मग जरांगे पाटील स्वतः मुंबईला रवाना झाले यावेळी ठिकठिकाणी गावातून त्यांचे पुष्पवृष्टी करून महिलांनी स्वागत केले
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!
    1
    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया....  जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    17 hrs ago
  • १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.
    4
    १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात
१९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात
वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते.
यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली.
युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ
युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे.
सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे.
गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.
    user_हणमंत बिराप्पा कोळी
    हणमंत बिराप्पा कोळी
    News Anchor जत, सांगली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज
    1
    निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास!
संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात
विशेष प्रतिनिधी :
परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे.
संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे.
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत.
त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे.
रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा.
🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या.
पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज
    user_पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
    पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
    News Anchor सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • मंत्री शंभुराजे देसाई हे तासगाव गणपती रथोत्सवला होते,त्यानी सोशल मिडियावर व्हिडीओ केला व्हायरल
    1
    मंत्री शंभुराजे देसाई हे तासगाव गणपती रथोत्सवला होते,त्यानी सोशल मिडियावर व्हिडीओ केला व्हायरल
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.