logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

स साळवापरिसरात वाघाची दहशत; टाकळी येथील शेतकरी हल्ल्यात जखमी साळवापरिसरात वाघाची दहशत; टाकळी येथील शेतकरी हल्ल्यात जखमी कुही : कुही तालुक्यातील साळवा परिसरातील टाकळी येथे शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने अचानक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. राधेशाम मारोती खांडेकर (वय ४८, रा. टाकळी) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राधेशाम खांडेकर हे आपल्या शेतात उरलेला कापूस वेचण्याचे काम करत होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर मागून झडप घातली. वाघ अंगावर येत असल्याचे लक्षात येताच खांडेकर यांनी तत्काळ खाली वाकून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तरीही वाघाच्या हल्ल्यात त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला आणि दोन्ही खांद्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ला झाल्यानंतर खांडेकर यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारील शेतात काम करणारे नाना भोयर आणि ईश्वर डहारे हे मदतीसाठी धावून आले. नागरिकांचा वाढता आरडाओरडा पाहून वाघाने तिथून जंगलाच्या दिशेने पळ काढला. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच टाकळीचे सरपंच राजहंस रामटेके यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी राधेशाम खांडेकर यांना स्वतःच्या मोटारसायकलने तातडीने साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच माजी जि.प.सदस्य अरुण हटवार, माजी जिल्हा नियोजन समीती नागपुर सदस्य भागेश्वर फेडंर, दिलीप कुकडे,नामदेव बुराडे,अतुल भोयल,पुरुषोत्तम खराबे,वनरक्षक सीमा भोयर आणि वनमजूर सुरेश भोयर यांनी आरोग्य केंद्रात जाऊन जखमीची विचारपूस केली. "या घटनेमुळे साळवा आणि राजोला परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा आणि जखमी शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई द्यावी." ~ राजहंस रामटेके, सरपंच टाकळी देवळीखुर्द.

on 11 March
user_Sharad shahare
Sharad shahare
कुही, नागपूर, महाराष्ट्र•
on 11 March
a48be09f-2e3c-4fcf-a83f-11dbe4f70690

स साळवापरिसरात वाघाची दहशत; टाकळी येथील शेतकरी हल्ल्यात जखमी साळवापरिसरात वाघाची दहशत; टाकळी येथील शेतकरी हल्ल्यात जखमी कुही : कुही तालुक्यातील साळवा परिसरातील टाकळी येथे शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने अचानक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. राधेशाम मारोती खांडेकर (वय ४८, रा. टाकळी) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राधेशाम खांडेकर हे आपल्या शेतात उरलेला कापूस वेचण्याचे काम करत होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर मागून

c9cfbb5a-c251-4f5b-b619-4003afdcd777

झडप घातली. वाघ अंगावर येत असल्याचे लक्षात येताच खांडेकर यांनी तत्काळ खाली वाकून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तरीही वाघाच्या हल्ल्यात त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला आणि दोन्ही खांद्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ला झाल्यानंतर खांडेकर यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारील शेतात काम करणारे नाना भोयर आणि ईश्वर डहारे हे मदतीसाठी धावून आले. नागरिकांचा वाढता आरडाओरडा पाहून वाघाने तिथून जंगलाच्या दिशेने पळ काढला. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच टाकळीचे सरपंच राजहंस रामटेके यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी राधेशाम खांडेकर

5ef0067e-cb43-4dde-a95d-35fbe9527c4d

यांना स्वतःच्या मोटारसायकलने तातडीने साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच माजी जि.प.सदस्य अरुण हटवार, माजी जिल्हा नियोजन समीती नागपुर सदस्य भागेश्वर फेडंर, दिलीप कुकडे,नामदेव बुराडे,अतुल भोयल,पुरुषोत्तम खराबे,वनरक्षक सीमा भोयर आणि वनमजूर सुरेश भोयर यांनी आरोग्य केंद्रात जाऊन जखमीची विचारपूस केली. "या घटनेमुळे साळवा आणि राजोला परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा आणि जखमी शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई द्यावी." ~ राजहंस रामटेके, सरपंच टाकळी देवळीखुर्द.

View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.