आयुक्त तुकाराम* *मुंढेंच्या स्वच्छ* *आणि* *भेसळमुक्त* *महाराष्ट्राच्या* *क्रांतिकारी* *मोहिमेला* *तासगावातून* *कोलदांडा* *घातला जातोय* *का*? साप्ता.माणदेश दर्शन प्रतिनिधी तासगाव गेल्या आठवड्यातील तासगाव शहरातील गोष्ट आहे.संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या नावाचा दरारा आहे, असे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि कोणाचाही दबाव न मानणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त मा.तुकाराम मुंढे साहेब यांच्या आदेशाने सांगली विभागाचे भरारी पथक तासगाव शहरात दाखल झाले. तासगाव बस स्टँड परिसर, बाजारपेठेतील हॉटेल,बेकरी,दूध डेअरी,पानपट्टीवर अचानक धाडी पडल्या.7 आस्थापनांचे परवाने थेट रद्द झाले.दुधात भेसळ,पनीरमध्ये पावडर,स्वच्छता नाही,एक्सपायरी डेटचा माल.फोटो काढले गेले,पेपरमध्ये मोठ्या बातम्या झळकल्या. जनता खूश झाली.आता तरी पोरांच्या ताटात विष येणार नाही असे वाटले. *पण 24* *तासातच खेळ* *बदलला* ज्यांचे परवाने रद्द झाले तीच सर्व दुकाने दुसऱ्या दिवशी सकाळी जैसे थे सुरू.फक्त बोर्ड 2 फूट आत गेला.आतमध्ये तोच शिळा माल,तोच भेसळयुक्त मावा,तीच घाण. आणि ज्या मावा-गुटख्यावर महाराष्ट्रात पूर्ण बंदी आहे,तो मावा-गुटखा या हॉटेल आणि पानपट्टीवर दिवसाढवळ्या खालून विकला जात आहे. शाळेची मुले सुद्धा घेत आहेत. म्हणजे मा.मुंढे साहेबांच्या भेसळमुक्त महाराष्ट्राच्या पवित्र मोहिमेला तासगावातून कोलदांडाच घातला गेला का? हा प्रश्न प्रत्येक तासगावकर विचारतोय. *तासगावकरांनो* , *आपण रोज पैसे देऊन विष* *खातोय का*? सकाळी दुधात पाणी आणि युरिया,दुपारी हॉटेलात शिळ्या भाजीला ताजी फोडणी,संध्याकाळी कॅन्सरला कारणीभूत मावा-गुटखा.याचे परिणाम पोटदुखी, उलटी, जुलाब,अतिसार पासून किडनी आणि लिव्हर डॅमेज. बेकरीतील घातक केमिकलमुळे कॅन्सरचा धोका 10 पटीने वाढतो.सर्वात जास्त धोका 5 ते 15 वर्षाच्या मुलांना आणि 60 वर्षावरील वृद्धांना. या महाराष्ट्राने तुकाराम मुंढे साहेबांचे काम पाहिले आहे.ते कधीच तडजोड करत नाहीत.त्यांच्या नावानेच भल्याभल्या डेअरी आणि हॉटेल मालकांच्या पायाखालची वाळू सरकते.मग तासगावात काय अडचण आली? याचा अर्थ सरळ आहे. वर आयुक्त साहेब 100% प्रामाणिक आहेत,पण जिल्ह्यातील सर्वच अधिकारी इतके चांगले आहेत पण त्यांच्या नावाखाली काही एजंटगिरी करणारे लोक त्यांची बदनामी करीत आहेत,हे निश्चित. खालची यंत्रणा कमकुवत आहे की इथली सेटलमेंट लॉबी जास्त मजबूत आहे? जनतेत चर्चा आहे की धाड पडल्यानंतर रातोरात तडजोडी होतात.कारवाईचा फोटो पुरता आणि परवाना रद्द झालेला माणूस दुसऱ्या दिवशी मोकळा. आणि सर्वात महत्त्वाचे स्थानिक प्रशासन व राजकीय नेते मंडळींनी याकामी सुद्धा मन लावून काम केले पाहिजे.ज्या पद्धतीने निवडणुकीच्या वेळी गोड बोलून जनतेच्या हृदयाला पाझर फोडतात,त्याच पद्धतीने या कामात सुद्धा चांगल्याप्रकारे काम केले तर भेसळमुक्त शहर होण्यास एक मिनिटही विलंब लागणार नाही. कारवाई करून सोडून देऊ नये.दर 15 दिवसांनी अचानक तपासणी झाली पाहिजे.ज्यांचा परवाना रद्द झाला त्यांनी परत धंदा सुरू केल्यास त्यांच्यावर आणि डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल व्हावा.प्रत्येक पानपट्टी, हॉटेल,बेकरीवर सीसीटीव्ही लावून मावा-गुटखा विक्री करणाऱ्यावर MPDA सारखी कडक कारवाई व्हावी. आम्हाला मोठे बोर्ड नकोत,मोठ्या जाहिराती नकोत. आम्हाला फक्त सुरक्षित,स्वच्छ आणि विषमुक्त अन्न हवे आहे.जर प्रशासन आता जागे झाले नाही तर ही कारवाई म्हणजे वरातीमागून घोडे आहे.
आयुक्त तुकाराम* *मुंढेंच्या स्वच्छ* *आणि* *भेसळमुक्त* *महाराष्ट्राच्या* *क्रांतिकारी* *मोहिमेला* *तासगावातून* *कोलदांडा* *घातला जातोय* *का*? साप्ता.माणदेश दर्शन प्रतिनिधी तासगाव गेल्या आठवड्यातील तासगाव शहरातील गोष्ट आहे.संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या नावाचा दरारा आहे, असे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि कोणाचाही दबाव न मानणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त मा.तुकाराम मुंढे साहेब यांच्या आदेशाने सांगली विभागाचे भरारी पथक तासगाव शहरात दाखल झाले. तासगाव बस स्टँड परिसर, बाजारपेठेतील हॉटेल,बेकरी,दूध डेअरी,पानपट्टीवर अचानक धाडी पडल्या.7 आस्थापनांचे परवाने थेट रद्द झाले.दुधात भेसळ,पनीरमध्ये पावडर,स्वच्छता नाही,एक्सपायरी डेटचा माल.फोटो काढले गेले,पेपरमध्ये मोठ्या बातम्या झळकल्या. जनता खूश झाली.आता तरी पोरांच्या ताटात विष येणार नाही असे वाटले. *पण 24* *तासातच खेळ* *बदलला* ज्यांचे परवाने रद्द झाले तीच सर्व दुकाने दुसऱ्या दिवशी सकाळी जैसे थे सुरू.फक्त बोर्ड 2 फूट आत गेला.आतमध्ये तोच शिळा माल,तोच भेसळयुक्त मावा,तीच घाण. आणि ज्या मावा-गुटख्यावर महाराष्ट्रात पूर्ण बंदी आहे,तो मावा-गुटखा या हॉटेल आणि पानपट्टीवर दिवसाढवळ्या खालून विकला जात आहे. शाळेची मुले सुद्धा घेत आहेत. म्हणजे मा.मुंढे साहेबांच्या भेसळमुक्त महाराष्ट्राच्या पवित्र मोहिमेला तासगावातून कोलदांडाच घातला गेला का? हा प्रश्न प्रत्येक तासगावकर विचारतोय. *तासगावकरांनो* , *आपण रोज पैसे देऊन विष* *खातोय का*? सकाळी दुधात पाणी आणि युरिया,दुपारी हॉटेलात शिळ्या भाजीला ताजी फोडणी,संध्याकाळी कॅन्सरला कारणीभूत मावा-गुटखा.याचे परिणाम पोटदुखी, उलटी, जुलाब,अतिसार पासून किडनी आणि लिव्हर डॅमेज. बेकरीतील घातक केमिकलमुळे कॅन्सरचा धोका 10 पटीने वाढतो.सर्वात जास्त धोका 5
ते 15 वर्षाच्या मुलांना आणि 60 वर्षावरील वृद्धांना. या महाराष्ट्राने तुकाराम मुंढे साहेबांचे काम पाहिले आहे.ते कधीच तडजोड करत नाहीत.त्यांच्या नावानेच भल्याभल्या डेअरी आणि हॉटेल मालकांच्या पायाखालची वाळू सरकते.मग तासगावात काय अडचण आली? याचा अर्थ सरळ आहे. वर आयुक्त साहेब 100% प्रामाणिक आहेत,पण जिल्ह्यातील सर्वच अधिकारी इतके चांगले आहेत पण त्यांच्या नावाखाली काही एजंटगिरी करणारे लोक त्यांची बदनामी करीत आहेत,हे निश्चित. खालची यंत्रणा कमकुवत आहे की इथली सेटलमेंट लॉबी जास्त मजबूत आहे? जनतेत चर्चा आहे की धाड पडल्यानंतर रातोरात तडजोडी होतात.कारवाईचा फोटो पुरता आणि परवाना रद्द झालेला माणूस दुसऱ्या दिवशी मोकळा. आणि सर्वात महत्त्वाचे स्थानिक प्रशासन व राजकीय नेते मंडळींनी याकामी सुद्धा मन लावून काम केले पाहिजे.ज्या पद्धतीने निवडणुकीच्या वेळी गोड बोलून जनतेच्या हृदयाला पाझर फोडतात,त्याच पद्धतीने या कामात सुद्धा चांगल्याप्रकारे काम केले तर भेसळमुक्त शहर होण्यास एक मिनिटही विलंब लागणार नाही. कारवाई करून सोडून देऊ नये.दर 15 दिवसांनी अचानक तपासणी झाली पाहिजे.ज्यांचा परवाना रद्द झाला त्यांनी परत धंदा सुरू केल्यास त्यांच्यावर आणि डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल व्हावा.प्रत्येक पानपट्टी, हॉटेल,बेकरीवर सीसीटीव्ही लावून मावा-गुटखा विक्री करणाऱ्यावर MPDA सारखी कडक कारवाई व्हावी. आम्हाला मोठे बोर्ड नकोत,मोठ्या जाहिराती नकोत. आम्हाला फक्त सुरक्षित,स्वच्छ आणि विषमुक्त अन्न हवे आहे.जर प्रशासन आता जागे झाले नाही तर ही कारवाई म्हणजे वरातीमागून घोडे आहे.
- राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न! 🚩 वर्धापन दिन सोहळा २०२६! 🚩 राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा पुणे येथे संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती! 🔹 दिनांक: शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ 🔹 वेळ: सकाळी ठीक ११:०० वाजता 🔹 स्थळ: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ (महात्मा फुले वाडा जवळ), पुणे. चला, एकत्र येऊया आणि पक्षाच्या विचारसरणीला अधिक बळ देऊया! तुमच्या उपस्थितीची आणि शुभेच्छांची आम्हाला प्रतीक्षा राहील. राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य1
- विषय फक्त असा आहे की बालाजी चौक शहापूर रोड गायबान पंपाजवळ जे रस्त्याचे खोदकाम चालू होते त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्यात प्रॉब्लेम होत आहे इचलकरंजी बालाजी चौक शहापूर रोड गायबान पेट्रोल पंप जवळ चार दिवस झाले रस्त्याचे खोदकाम चालू आहे त्या खोदकामासाठी रस्त्यात रस्त्याला येण्या-जाण्यासाठी जनतेला अडथळा होतो फक्त म्हणणं एवढंच आहे की जनतेचा प्रश्न मिटवायला पाहिजे प्रशासनाची लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे.1
- बारामती तालुक्यातील खांडज गावामध्ये बिबट्याचा वावर असल्याने वन विभागा विरुद्ध प्रशासकीय भवन समोर आंदोलन1
- भोर शहरातील नागोबा आळी येथे मध्यरात्री वाहनातून पेट्रोल चोरी ;घटना सिसिटीव्हीत कैद विक्रम शिंदे /भोर दि. 26 भोर शहरात दुचाकीमधून मध्यरात्री पेट्रोल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून चोरटे सिसिटीव्हीत कैद झाले आहेत. शहरातील नागोबा आळी येतील घटना समोर आली आहे.1
- अग्निसुरक्षेची यंत्रणा २४ तास सज्ज; ICU-SNCU मात्र अजूनही कागदावर..! मावळ, पुणे : अमरावती रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मावळच्या वडगाव उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आढावा समोर आला आहे. रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर रोहित काळे यांनी दिली.सध्या रुग्णालयात ५० बेड आणि ट्रॉमा केअर सेंटरचे २० बेड, अशी एकूण ७० बेडची क्षमता आहे. मात्र अतिगंभीर रुग्णांसाठी ICU आणि नवजात बालकांसाठी SNCU सुविधा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.या दोन्ही सुविधांना तात्पुरती मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा सज्ज असल्याचा दावा होत असला, तरी ICU आणि SNCU कधी कार्यान्वित होणार, याकडे आता मावळकरांचे लक्ष लागले आहे... : डॉक्टर रोहित काळे #Maval #Vadgaon #SubDistrictHospital #FireSafety #HospitalSafety #ICU #SNCU #Healthcare #PuneNews #MaharashtraNews #FireSafetyAudit #TheNayakNews1
- पुण्यामध्ये सध्या तात्या विंचू गोरिला यांचे क्रेज पाहायला मिळत आहे1
- लोहा, जि. नांदेड येथे संतापजनक प्रकार ! शेतकऱ्याच्या कॉलरला हात घालून दमदाटी करणाऱ्या नायब तहसीलदार राजेश पाठक 📌📌लोहा, जि. नांदेड येथे संतापजनक प्रकार ! शेतकऱ्याच्या कॉलरला हात घालून दमदाटी करणाऱ्या नायब तहसीलदार राजेश पाठक यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अन्नदात्या शेतकऱ्याशी अरेरावीची भाषा करणाऱ्या या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. एका शेतकऱ्यावर दादागिरी करणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तीचा जाहीर निषेध !⚫⚫⚫ शेतकरी एकजुटीने आवाज उठवूय1
- पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम योग्य पद्धतीने करण्यात आले आहे का, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षितपणे खुला करण्यात आला होता का, याबाबत नागरिकांकडून चर्चा सुरू आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची पाहणी करून रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.1