देशसेवेतील भावांना सखींच्या प्रेमाचा धागा: रोटरी क्लब भिगवणतर्फे पुलवामा येथील जवानांना राख्या व मिठाई रवाना.... देशसेवेतील भावांना सखींच्या प्रेमाचा धागा: रोटरी क्लब भिगवणतर्फे पुलवामा येथील जवानांना राख्या व मिठाई रवाना भिगवण (समर्थ न्यूज नेटवर्क): देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देऊन देशवासियांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लब सखी, भिगवण यांच्या वतीने एक भावूक आणि देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात आला आहे. आपल्या कुटुंबापासून दूर सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना सणांच्या काळात बहिणीच्या प्रेमाची उणीव भासू नये, या उद्देशाने सखींच्या वतीने १०० पेक्षा जास्त हस्तनिर्मित राख्या, मिठाई आणि प्रेमाचा संदेश जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे तैनात असलेल्या जवानांसाठी पाठवण्यात आला. हे सर्व साहित्य भिगवण येथील मुख्य पोस्ट ऑफिसचे अधिकारी राजुरे साहेब यांच्या माध्यमातून अत्यंत सुरक्षितपणे सीमेवर पाठवण्यात आले होते. पुलवामा येथे या राख्या सुखरूप पोहोचल्यानंतर जवानांनीही रोटरी क्लब सखीच्या या उपक्रमाबद्दल मनस्वी आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. "सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांमुळेच आपण सण-उत्सव शांततेत साजरे करू शकतो. त्यांच्याबद्दल आदर आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लब सखीने घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे," अशा भावना याप्रसंगी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आल्या. या सामाजिक आणि देशभक्तीपर कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या मेघना बंडगर, सुषमा वाघ, नीलिमा बोगावत, दीपिका क्षीरसागर, संगीता शेलार, नाझिया शेख, सारिका सवाने, मीना बंडगर, प्रतीक्षा माडगे, संगीता थोरात, डॉ. अस्मिता भरणे, ललिता वाकसे, सीमा धुमाळ, तेहमीन शेख, शांता बंडगर, सोनाली वाकसे, प्रतिभा जाधव आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रोटरी क्लब सखीच्या या उपक्रमाचे भिगवण परिसर आणि सामाजिक वर्तुळातून विशेष कौतुक होत आहे.

- बारामती गुन्हेगारी वाढलेली आहे या प्रश्नावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा उत्तर1
- कर्जत तालुक्यात अंगणवाडी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे धान्य निकृष्ट1
- लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न.4
- इन्स्टाग्राम रीलसाठी पिस्तूलचा धाक; बाबुर्डी येथील तरुणावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा इन्स्टाग्रामवरील ‘आभासी भाईगिरी’ पडली महागात; सुपा पोलिसांची तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये कारवाई सुपा, बारामती | इन्स्टाग्रामवर रील बनवताना पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन प्रक्षोभक आणि धमकीवजा मजकूर पोस्ट करणाऱ्या तरुणावर सुपा पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. सुपा पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास २४ ऑगस्ट रोजी "prem_jagtap_0295" या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित झाल्याचे आढळले. या व्हिडिओमध्ये बाबुर्डी, ता. बारामती येथील प्रेम प्रताप जगताप याने पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या व्हिडिओवर “आलीशान युवा प्रतिष्ठान” असा मजकूर तसेच “शांत है इसका मतलब ये नही की हम संत है..! जंगल अपना है, और कानुन भी अपना है” अशा स्वरूपाचा प्रक्षोभक मजकूर वापरण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करून संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५), तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या पथकाने केली. पोलिसांनी सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांना स्पष्ट इशारा दिला आहे—रीलच्या माध्यमातून शस्त्रांचे प्रदर्शन करून किंवा दहशत निर्माण करणारा आशय प्रसारित करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ‘रीलसाठी रिअल लाईफ धोक्यात घालू नका’, असा संदेश सुपा पोलिसांनी दिला आहे. AP CRIME NEWS LIVE — जनहितासाठी निर्भीड बातमी, लोकजागृतीसाठी सदैव पुढे.1
- 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..1
- DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं? धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा. DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं? धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा. या व्हिडिओमध्ये धाराशिव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, गुन्हेगारी, विकासकामे, स्थानिक समस्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे. 📍 धाराशिव | उस्मानाबाद व परिसर 🗓️ दिनांक : २७ ऑगस्ट २०२६ अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी झुंजार SC 37 NEWS OSMANABAD चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबा. 📞 संपर्क : 08805974164 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share ↗️ करा आणि तुमचे मत Comment मध्ये नक्की कळवा.1
- * ऑัगस्टला शिरूरमध्े मोफत महाआरोग्य शिबिर; हजरतमोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचा उपक्रम;मोतीबिंद्ू तपासणी व शस्रक्रियेसह विविध आरोग्य तपासणयांचीसुविधा.. शिरूर, संपूर्ण जगाला शांती, एकता आणि बंधुभावाचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशन, शिरूर यांच्या वतीने वर्ष ६ वे मोफत महाआरोग्य शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात हे शिबिर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन दानशूर उद्योगपती तथा चेअरमन, माणिकचंद उद्योग समूह, प्रकाशशेठ रसिकलालजी धारीवाल (मा. सभागृह नेते, शिरूर नगरपालिका) यांच्या हस्ते होणार आहे. शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, त्वचारोग, गर्भधारणा व प्रसूतीसंबंधी मार्गदर्शन, शरीरावरील गाठींची तपासणी, बालरोग, दंतरोग, जनरल हेल्थ चेकअप, कान-नाक-घसा, मुळव्याध, हाडांची तपासणी, स्त्रीरोग, पंचकर्म तसेच पक्षाघात (पॅरॅलिसिस) आदी विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी दर्शा फ्रीडम फाउंडेशन, राजगुरुनगर यांचे सौजन्य लाभले आहे. तसेच डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. शिरूरमधील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग या शिबिरात राहणार आहे. मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल, सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, श्री गणेशा हॉस्पिटल, वेदांता क्रिटीकेअर हॉस्पिटल, मिरा नर्सिंग होम, सुखायु हॉस्पिटल, डॉ. नीरज शहा संचालित रुबी हॉल क्लिनिक, शिरूर यांच्यासह विविध वैद्यकीय संस्थांचा सहभाग राहणार आहे. मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील, ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके, अशोकबापू रावसाहेबदादा पवार, ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे, स्वातीताई विठ्ठलशेठ घावटे, राजेंद्र गावडे, प्रितम पाटील, बाळासाहेब म्हस्के, मितेश गादिया, विनोद पाटील, राहुलदादा पाचर्णे, नितीनदादा पाचर्णे, जाकिरखान पठाण, रविंद्रजी धनक, धर्मेंद्र खांडरे, नसीम खान यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. “गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न” — अध्यक्ष: हाजी आसिफभाई शेख खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान) म्हणाले, “हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण मानवजातीला शांती, एकता, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश दिला. त्याच विचारांना अनुसरून जयंतीनिमित्त समाजातील गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक नागरिक आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.” “एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्यांची सुविधा” — सचिव: हाजी मुस्ताकभाई शेख फाउंडेशनचे सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख म्हणाले, “या शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रियेसह विविध आजारांची तपासणी, ई.सी.जी., रक्तदाब, शुगर, डोळे, दात, हाडे, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा आणि इतर आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरजू रुग्णांना मोफत चष्मेही देण्यात येणार आहेत. शिरूर शहर व परिसरातील नागरिकांसाठी ही आरोग्यसेवेची मोठी संधी असून, कोणत्याही नागरिकाने ही संधी दवडू नये. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे.” खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख, उपाध्यक्ष हाजी फारुक रज्जाकभाई बागवान, सदस्य हाजी फिरोज अब्दुल गफुर बागवान, सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख तसेच मतिन शेख, हुसैन पठाण, शोऐब बागवान, हाजी मुन्नाभाई शेख, अलि पठाण, मन्सुर खान, आवेज शेख, जैद शेख, जैद बागवान, फिरोज शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. विनोद प्रकाश भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले असून, रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शिरूर शहर व परिसरातील नागरिकांनी शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात उपस्थित राहून मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खिदमत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. > *विशेष चौकट* > > *खिदमत फाउंडेशन, शिरूर* > > *अध्यक्ष : हाजी आसिफ हाजी अ. हमिद शेख (साई पान)*1
- पालखी महामार्गाचे अपूर्ण काम दाखवून कोट्यवधींची बिले काढली; मंत्र्यांच्या नावाने धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे...1