logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर येथे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार अजित पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लातूरमध्ये अभिवादन लातूर | प्रतिनिधि भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकर पार्क येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास युवा नेते तथा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करून समाजात समता, बंधुता आणि न्याय यांचा संदेश दिला. कार्यक्रमास भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, विरोधी पक्षनेते देविदासराव काळे, भाजपा सरचिटणीस प्रविण कस्तूरे, संजय गिर, निखिल गायकवाड, नगरसेवक प्रदीप मोरे, विनय जाकते, ऋषिकेश राजे, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष पवन आल्टे, शहर जिल्हा सचिव विजय अवचारे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा शितल मालू, तसेच शैलेश भडीकर, राजेश पवार, अर्चनाताई आल्टे, सागर घोडके यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, विविध आघाड्यांचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

on 14 April
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
on 14 April

लातूर येथे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार अजित पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लातूरमध्ये अभिवादन लातूर | प्रतिनिधि भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकर पार्क येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास युवा नेते तथा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करून समाजात समता, बंधुता आणि न्याय यांचा संदेश दिला. कार्यक्रमास भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, विरोधी पक्षनेते देविदासराव काळे, भाजपा सरचिटणीस प्रविण कस्तूरे, संजय गिर, निखिल गायकवाड, नगरसेवक प्रदीप मोरे, विनय जाकते, ऋषिकेश राजे, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष पवन आल्टे, शहर जिल्हा सचिव विजय अवचारे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा शितल मालू, तसेच शैलेश भडीकर, राजेश पवार, अर्चनाताई आल्टे, सागर घोडके यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, विविध आघाड्यांचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from Maharashtra and nearby areas
  • लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
    1
    लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Latur, Maharashtra•
    5 hrs ago
  • Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    1
    Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार
    1
    महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by Mushtaq Shaikh
    1
    Post by Mushtaq Shaikh
    user_Mushtaq Shaikh
    Mushtaq Shaikh
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सर्व शक्तीपीठग्रस्त शेतकरी बांधवांना विनंती आपल्या हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नरहरी झिरवाळ हे जिल्हा दौऱ्यावर येत असून आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना 1 मे रोजी त्यांना शक्तीपीठ रद्द करा या मागणीचे निवेदन द्यायचे आहे. त्याप्रमाणे नियोजन करावे व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हिंगोली शासकीय विश्रामगृहावर सकाळी 9 वाजता अगदी वेळेवर उपस्थित राहावे.
    1
    सर्व शक्तीपीठग्रस्त शेतकरी बांधवांना विनंती आपल्या हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नरहरी झिरवाळ हे जिल्हा दौऱ्यावर येत असून आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना 1 मे रोजी त्यांना शक्तीपीठ रद्द करा या मागणीचे निवेदन द्यायचे आहे. 
त्याप्रमाणे नियोजन करावे व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हिंगोली शासकीय विश्रामगृहावर  सकाळी 9 वाजता अगदी वेळेवर उपस्थित राहावे.
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • लातूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याची गरज आहे त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सर्व उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी दिल्या.लातूर शहर महानगरपालीकेत सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,निधीचा विनियोग योग्य होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने करावीत.एकूण कारभार पारदर्शकआणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बुधवारी आ.अमित देशमुख यांनी खा. डॉ.शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत महापौर सौ.जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲड.स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेसचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परिवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना,अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विकास योजना, प्रस्तावित योजना,नियमित कामकाजाबाबत आढावा घेतला.सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न समारंभांचे दिवस असल्याने शहरात वाहतूक कोंडीच्या तक्रारी येत आहेत.यावर तातडीने कार्यवाही करून शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी.सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करावी.हा प्रश्नकायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रभावीपणे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवावी.शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, रुग्णालये, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच रहिवासी संकुलांत पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी. शासनमान्य सल्लागाराची नियुक्ती करून भविष्यातील नियोजनकरावे. प्रदूषणाचा स्तर कमी राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी सुचना त्यांनी दिली शहरातील कचरा व्यवस्थापनात सुधारणा झाली असली तरी त्यात आणखी दुरुस्त्या करा. कचऱ्यावर प्रक्रिया करून ढीग लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. या कामकाजात महिलांचा सहभाग वाढवावा, असे आ.देशमुख म्हणाले. शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य-दिव्य पुतळा उभारणीचे काम सुरू झाले आहे.या कामाचा दर्जा आणि पारदर्शकतेबाबत तक्रारी आहेत. या प्रकल्पाचे पुनरावलोकन करावे. हैदराबादच्या धरतीवर हे काम व्हावे, अशी लोकभावना असल्याने तेथे अभ्यास गट पाठवून सूचना घ्याव्यात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून स्मारकाची उभारणी करावी असे त्यांनी सांगीतले. शहरात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. पिवळे किंवा दूषित पाणी वितरित होणार नाही याची काळजी घ्यावी. ठिकठिकाणी होणारी गळती थांबवावी. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. शहरातील पथदिव्यांची देखभाल नियमित व्हावी.घर तिथे पथदिवा अशी योजना तयार करून विस्तार करावा. मंजूर सोलर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून वीज वापराच्या बाबतीत महापालिका स्वयंपूर्ण करावी. नागरिकांना बांधकाम परवाना मिळण्यात होणारी दिरंगाई टाळावी. नागरिकांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दिलेल्या परवान्याप्रमाणेच बांधकामे होतील याची दक्षता घ्यावी. शहरातील प्रलंबित कबाले वाटपाचा आढावा घेऊन, नियमानुसार असलेले कबाले वाटप ताबडतोब करावेत, यासाठी शासनाच्या नवीन धोरणाचा आधार घ्यावा असे यावेळी सांगीतले. लातूर शहरात मागच्या काळात उभारण्यात आलेल्या युनिपोल संदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून घ्यावी, हे युनिपोल नियमानुसार नसतील तर ते काढून टाकावेत. आगामी काळात जाहिरात फलक परवानगी देताना नियमाचे उल्लंघन होणार नाही, शहराचे सौंदर्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आमदार देशमुख यांनी सांगीतले. नागरिकांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी कामकाजात सुधारणा करावी. फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, गंजगोलाई तसेच शहरातील इतर ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असे सांगीतले. एकूणच प्रशासकीय कामकाज पारदर्शक, सुलभ आणि गतिमान होण्यासाठी एआय व इतर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासह अनेक महत्त्वाच्या सूचना याप्रसंगी केल्या असून अधिकारी, कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेऊन, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येइल व आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपूरावा करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. या प्रसंगी नगरसेवक फारुक शेख, विकास कांबळे, युनुस मोमीन, इसरार सगरे, डॉ. बालाजी सांळुके, अतिश चिकटे, मुक्तार शेख, अमोल लांडगे,सचिन गायकवाड यांच्यासह मनपाचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
    1
    लातूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याची गरज आहे त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सर्व उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी दिल्या.लातूर शहर महानगरपालीकेत सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,निधीचा विनियोग योग्य होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने  करावीत.एकूण कारभार पारदर्शकआणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा सूचनाही त्यांनी  दिल्या. बुधवारी आ.अमित देशमुख यांनी खा. डॉ.शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत महापौर सौ.जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲड.स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेसचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परिवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना,अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विकास योजना, प्रस्तावित योजना,नियमित कामकाजाबाबत आढावा घेतला.सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न समारंभांचे दिवस असल्याने शहरात वाहतूक कोंडीच्या तक्रारी  येत आहेत.यावर तातडीने कार्यवाही करून शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी.सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करावी.हा प्रश्नकायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रभावीपणे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवावी.शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, रुग्णालये, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच रहिवासी संकुलांत पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी. शासनमान्य सल्लागाराची नियुक्ती करून भविष्यातील नियोजनकरावे. प्रदूषणाचा स्तर कमी राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी सुचना त्यांनी  दिली शहरातील कचरा व्यवस्थापनात सुधारणा झाली असली तरी त्यात आणखी दुरुस्त्या करा. कचऱ्यावर प्रक्रिया करून ढीग लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. या कामकाजात महिलांचा सहभाग वाढवावा, असे आ.देशमुख म्हणाले.  शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य-दिव्य पुतळा उभारणीचे काम सुरू झाले आहे.या कामाचा दर्जा आणि पारदर्शकतेबाबत तक्रारी आहेत. या प्रकल्पाचे पुनरावलोकन करावे. हैदराबादच्या धरतीवर हे काम व्हावे, अशी लोकभावना असल्याने तेथे अभ्यास गट पाठवून सूचना घ्याव्यात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून स्मारकाची उभारणी करावी असे त्यांनी सांगीतले. शहरात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. पिवळे किंवा दूषित पाणी वितरित होणार नाही याची काळजी घ्यावी. ठिकठिकाणी होणारी गळती थांबवावी. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. शहरातील पथदिव्यांची देखभाल नियमित व्हावी.घर तिथे पथदिवा अशी योजना तयार करून विस्तार करावा. मंजूर सोलर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून वीज वापराच्या बाबतीत महापालिका स्वयंपूर्ण करावी. नागरिकांना बांधकाम परवाना मिळण्यात होणारी दिरंगाई टाळावी. नागरिकांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दिलेल्या परवान्याप्रमाणेच बांधकामे होतील याची दक्षता घ्यावी. शहरातील प्रलंबित कबाले वाटपाचा आढावा घेऊन, नियमानुसार असलेले कबाले वाटप ताबडतोब करावेत, यासाठी शासनाच्या नवीन धोरणाचा आधार घ्यावा असे यावेळी सांगीतले. लातूर शहरात मागच्या काळात उभारण्यात आलेल्या युनिपोल संदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून घ्यावी, हे युनिपोल नियमानुसार नसतील तर ते काढून टाकावेत. आगामी काळात जाहिरात फलक परवानगी देताना नियमाचे उल्लंघन होणार नाही, शहराचे सौंदर्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आमदार देशमुख यांनी सांगीतले. नागरिकांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी कामकाजात सुधारणा करावी. फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, गंजगोलाई तसेच शहरातील इतर ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असे सांगीतले.
एकूणच प्रशासकीय कामकाज पारदर्शक, सुलभ आणि गतिमान होण्यासाठी एआय व इतर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासह अनेक महत्त्वाच्या सूचना याप्रसंगी केल्या असून अधिकारी, कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेऊन, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येइल व आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपूरावा करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. या प्रसंगी नगरसेवक फारुक शेख, विकास कांबळे, युनुस मोमीन, इसरार सगरे, डॉ. बालाजी सांळुके, अतिश चिकटे, मुक्तार शेख, अमोल लांडगे,सचिन गायकवाड यांच्यासह मनपाचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
    user_Latur 24
    Latur 24
    Local News Reporter सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • उष्णतेची लाट… आणि वानरांचा दिलासा देणारा संदेश! हिमायतनगरमध्ये तापमान 44-45°C पर्यंत पोहोचलंय माणसांसोबतच प्राणीही उष्णतेने हैराण झाले आहेत. श्री परमेश्वर मंदिर परिसरात वानरांचा एक गट लिंबाच्या झाडाखाली शांतपणे विसावा घेताना दिसला जणू तेच सांगत आहेत — “बाहेर ऊन खूप आहे… सावलीतच आराम करा!” हे सुंदर दृश्य रामभाऊ सूर्यवंशी यांनी टिपले असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संदेश स्पष्ट आहे: स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि दुपारच्या उन्हापासून दूर रहा! #हिमायतनगर #HeatWave #SummerAlert #StaySafe #NatureMessage ViralPost MonkeyLife SaveYourself Climate NNLDigitalMedia
    1
    उष्णतेची लाट… आणि वानरांचा दिलासा देणारा संदेश!
हिमायतनगरमध्ये तापमान 44-45°C पर्यंत पोहोचलंय 
माणसांसोबतच प्राणीही उष्णतेने हैराण झाले आहेत.
श्री परमेश्वर मंदिर परिसरात वानरांचा एक गट लिंबाच्या झाडाखाली शांतपणे विसावा घेताना दिसला 
जणू तेच सांगत आहेत —
“बाहेर ऊन खूप आहे… सावलीतच आराम करा!”
हे सुंदर दृश्य रामभाऊ सूर्यवंशी यांनी टिपले असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संदेश स्पष्ट आहे:
स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि दुपारच्या उन्हापासून दूर रहा!
#हिमायतनगर #HeatWave #SummerAlert #StaySafe #NatureMessage ViralPost MonkeyLife SaveYourself Climate NNLDigitalMedia
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.