राज्यात काँग्रेसची पक्ष संघटना अधिक सक्षम आणि सक्रिय करण्याच्या उद्देशाने 'संघटन सृजन अभियान' राबवले जात असून, या अंतर्गत सात हजार नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दादर येथील टिळक भवनमधील पक्षाच्या मुख्यालयात दिनांक २६ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा ओबीसी, अल्पसंख्याक, एस. सी. आणि सोशल मीडिया विभागासाठी, विशेषतः या विभागांच्या नवनियुक्त तालुकाध्यक्षांसाठी होती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार, जनसंपर्क, सोशल मीडिया संवाद, बूथस्तरीय नियोजन आणि विविध समाजघटकांशी समन्वय यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींनीही यावेळी पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) ॲड. गणेश पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश शेट्टी, सरचिटणीस गुरबिंदर बच्चर आणि अभिजित सपकाळ, सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष हृषिकेश पाटील तसेच प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के आणि निमिष साने यांच्या पुढाकाराने या कार्यशाळांचे नियोजन करण्यात आले होते, तसेच प्रसिद्ध आर.जे. संग्राम खोपडे यांनीही मार्गदर्शन केले.
राज्यात काँग्रेसची पक्ष संघटना अधिक सक्षम आणि सक्रिय करण्याच्या उद्देशाने 'संघटन सृजन अभियान' राबवले जात असून, या अंतर्गत सात हजार नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दादर येथील टिळक भवनमधील पक्षाच्या मुख्यालयात दिनांक २६ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत
विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा ओबीसी, अल्पसंख्याक, एस. सी. आणि सोशल मीडिया विभागासाठी, विशेषतः या विभागांच्या नवनियुक्त तालुकाध्यक्षांसाठी होती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार, जनसंपर्क, सोशल मीडिया संवाद, बूथस्तरीय नियोजन आणि विविध समाजघटकांशी समन्वय यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात
आले. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींनीही यावेळी पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) ॲड. गणेश पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश शेट्टी, सरचिटणीस गुरबिंदर बच्चर
आणि अभिजित सपकाळ, सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष हृषिकेश पाटील तसेच प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के आणि निमिष साने यांच्या पुढाकाराने या कार्यशाळांचे नियोजन करण्यात आले होते, तसेच प्रसिद्ध आर.जे. संग्राम खोपडे यांनीही मार्गदर्शन केले.
- महाराष्ट्रामध्ये मराठा, ओबीसी आणि इतर समाजांमध्ये जाणीवपूर्वक निर्माण होत चाललेल्या वाढत्या दरीवर आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी या सद्यस्थितीवर नेमका उपाय काय असू शकतो आणि या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. पटोले यांच्या मतानुसार, महाराष्ट्राला विकासाच्या मुख्य मुद्द्यांवरून भरकटवण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे मूळ प्रश्न लपवण्यासाठी मुद्दाम समाज-समाजामध्ये वाद निर्माण केले जात आहेत. याचसोबत, अनुसूचित जातींमधील (SC) उपवर्गीकरणाचा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर, आता मूळ प्रश्नांवर एकत्र येण्याची आणि महाराष्ट्राची सामाजिक वीण घट्ट करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन नानाभाऊ पटोले यांनी केले आहे.1
- या भागात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या दिसून येत आहे.2
- उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या जेवर परिसरात 15 वर्षीय किशोर गोपाल शर्मा यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. त्यांचा मृतदेह जेवरमधील रोही गावात असलेल्या एका दीर्घकाळापासून बंद असलेल्या आणि निर्जन घरातून जप्त करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपाल हत्याकांडात पोलीस स्टेटमेंटमधील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी मीडिया कॉन्फरन्सकडे लक्ष द्यावे.1
- ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कौसा परिसरात पाणीपुरवठा ५० एमएलडीने वाढवण्यासाठी शानू पठाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.1
- मुंब्रा-कौसाच्या विकासासंदर्भात अशरफ शानू पठान यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वपूर्ण भेट घेतली. या भेटीदरम्यान, ठाणे, मुंब्रा आणि कौसा शहरांसाठी ५० MLD अतिरिक्त पाण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, विविध विकासकामांवरही सविस्तर चर्चा झाली.1
- ठाणे महानगरपालिकेचे (ठा.म.पा) विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी मुंब्रा शहरासाठी 50 MLD पाणी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री (DCM) एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.1
- एका तरुणाला ऑटोवर स्टंटबाजी करणे खूप महागात पडले आहे.1