खान हॉस्पिटलमध्ये गणेशोत्सव; रुग्णालय परिसरात सामाजिक सलोख्याचा संदेश भोर : शहरातील खान हॉस्पिटलमध्ये गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका, रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने हॉस्पिटल परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आकर्षक सजावट करण्यात आली असून गणरायाच्या आगमनानंतर पूजा व आरतीचा कार्यक्रमही घेण्यात आला. विशेष म्हणजे, आरोग्यसेवेच्या ठिकाणी विविध धर्मीय नागरिक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करत असल्याने सामाजिक एकोपा आणि धार्मिक सलोख्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. गणेशोत्सव काळात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांनाही या उत्सवाचा आनंद घेता आला. रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांसाठी आरोग्यविषयक शिबिरे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर इम्रान खान यांच्याकडून देण्यात आली. यावेळी भोर मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष डॉ. इम्रान खान यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात बंधुभाव, एकोपा आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक दृढ व्हावी, अशी भूमिका व्यक्त केली.

- भोरच्या राजा रघुनाथराव विदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि. 17 भोर येथील राजा रघुनाथराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेत विविध कार्यक्रम सादर करत वाहवा मिळवली.1
- पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर मराठा आंदोलकांनी केली घोषणाबाजी.! पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी1
- बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! “पुण्यातील बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. चालकाचे वय १८ वर्षे असल्याचा दावा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित चालकाचे वय, वैध परवाना आणि आवश्यक नियमांचे पालन झाले आहे का, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.”1
- "हे नाकर्त्यांचं आंदोलन.. ज्यांनी आपल्या जीवनात काहीच केलेले नाही..!"1
- गोल्डन कार’चा रुबाब पडला महागात; पोलिसांची कारवाई.....! पिंपरी-चिंचवड : गोल्डमॅनच्या ‘गोल्डन कार’वर पोलिसांची कारवाई..! हिंजवडी वाहतूक पोलिसांकडून वाहन नियमभंगाविरोधात धडक कारवाई सुरू आहे. याच कारवाईदरम्यान एका गोल्डमॅनची गोल्डन कार पोलिसांच्या नजरेस पडली.कारच्या काचांवर काळी फिल्म आणि HSRP नंबर प्लेटऐवजी फॅन्सी नंबर प्लेट आढळून आली. पोलिसांनी तात्काळ काळी फिल्म हटवली आणि नियमभंगाप्रकरणी कारवाई केली.नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा कडक बडगा कायम आहे... #PimpriChinchwad #Hinjewadi #TrafficPolice #PoliceAction #GoldenCar #Goldman #CarAction #BlackFilm #FancyNumberPlate #HSRP #TrafficRules #VehicleRules #PimpriChinchwadNews #PuneNews #MaharashtraNews #TheNayakNews1
- फोनवर बुकिंग, लॉजवर महिलांचा पुरवठा; येरवड्यात अनैतिक मानवी व्यापारावर पोलिसांचा मोठा घाव1
- *लोकसंवाद 2026 कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानाची माहिती* *नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध – मनुज जिंदल* *लोकसंवाद 2026 कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानाची माहिती* *नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध – मनुज जिंदल* प्रतिनिधी स्वाती हडकर *रत्नागिरी, दि. 17 (जिमाका) : स्वच्छता, आरोग्य, वृक्षारोपण आणि थेट जागेवरच शासकीय दाखल्यांचे वाटप.. जनसेवेचा हा महायज्ञ सध्या जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून पूर्ण ताकदीने सुरू आहे. लोककल्याणकारी अभियानात प्रत्येक नागरिकांने सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध आहे,” अशी ग्वाही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.* माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कुवारबाव उत्कर्ष नगर वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळ येथे लोकसंवाद 2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी सेवा संकल्प अभियानाची सविस्तर माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी आधिकारी वैदेही रानडे उपस्थित होत्या. *प्रत्येक गावात लावणार १ हजार झाडे लावण्याचा संकल्प* जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, “पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून, या अभियानांतर्गत आगामी काही दिवसांत टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावात १,००० वृक्षांची लागवड केली जाईल,” या उपक्रमात नागरिकांनीही सहभाग नोंदवावा. आजपासून 17 ऑक्टोबर पर्यंत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध विभागांच्या सेवा जनतेपर्यंत पोहचविण्याचा मुख्य उद्देश आहे. *नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण* पंतप्रधान महोदयांच्या संवैधानिक पदावरील २५ वर्षांच्या लोकसेवेनिमित्त आयोजित हे अभियान केवळ उपक्रमांपुरते मर्यादित नसून थेट लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आहे. नागरिकांना लागणारे विविध शासकीय दाखले, कागदपत्रांच्या अडचणी आणि प्रशासकीय कामे यांचे जागेवरच निराकरण केले जाणार आहे. विविध सेवा व तक्रारींचे निवारण एकाच छताखाली करण्यात येणार आहे. *प्रशासन २४ तास जनतेच्या सेवेसाठी सज्ज - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* या मोहिमेत आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व महसूल अधिकारी स्वतःहून पुढाकार घेत आहेत, याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. “पुढील महिनाभर चालणाऱ्या या लोककल्याणकारी अभियानात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले. वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळाने उत्सवाचे रूपांतर सामाजिक सेवेत केल्याचा उल्लेख करुन गणेश मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी उमेश गावधडकर, मंडळाचे अध्यक्ष सुनील वडार, उपाध्यक्ष विलास माने, खजिनदार सागर वाघ यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 0001
- "शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला..!"1