logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एरंडोलला राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी दिमाखदार कार्यक्रमात शहरातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार येथील ओमनगरमध्ये राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची 428 वी जयंती राजमाता जिजाऊ महिला मंडळ आणि जिजाऊ ब्रिगेडतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार अमोलदादा पाटील यांच्या पत्नी मृणाली अमोल पाटील होत्या. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवविका डॉ. गितांजली नरेंद्र ठाकूर, शोभा जगदीश साळी, शबनम जावेद मुजावर, सोनल विजय पाटील, आशा गजानन पाटील या महिलांचा जिजाऊंचे स्मृतीचिन्ह आणि पुस्तक देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊंबद्दल उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष ,युवा सेना जिल्हाध्यक्ष प्रा. मनोज पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र आबा चौधरी, संभाजी आबा पाटील, रमेशअण्णा महाजन, ज्ञानेश्वर आमले, एस. आर. बापू पाटील, प्रा. आर. एस. पाटील, भैय्या पाटील, रोकडे सर, प्रमोदअण्णा पाटील, नगरसेवक मयुर महाजन, अनिल महाजन, रूपेश माळी, रवींद्र महाजन ,रवींद्र महाजन, कृष्णा ओतारी ,अमोल , नयुम खान पठाण ,नाना साळुंखे, रविंद्र लाळगे, हिम्मत पाटील सर गजानन पाटील (पोलिस), गजानन पाटील, शिंपी सर, निलेश चौधरी, भास्कर चौधरी, कैलास कुवर, सचिन पाटील, विजय पाटील, विवेक पाटील, टीनु ठाकूर, अजय पाटील, फरकांडे येथील ह.भ.प. दिनेश महाराज, गणेश बडगुजर, नामदेवराव पाटील, दिपक पाटील, अभी पाटील, यशवंत पाटील, रघुवंशी गुरूजी, महानंदाताई पाटील, उपनगराध्यक्ष सुनीताताई माळी , नगरसेविका संकल्पना ताई पाटील, जिजाबाई पाटील, शबानाबी मुजावर , नजमा बी कागजी ,डॉ. गितांजली ठाकूर, अध्यक्ष सत्यभामा पाटील , कमलताई पाटील , मंकरणा बाई चौधरी ,आरती महाजन, छाया दाभाडे, शारदा मराठे, पल्लवी पाटील, आशा पाटील, पुनम सावंत, मीना मानुधने, सोनल पाटील, शोभा साळी, रेवती पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली. तळई माध्यमिक विद्यार्थीनींनी नृत्याद्वारे मानवंदना देवून जिजाऊ वंदना सादर केली. प्रास्ताविक वैशाली पाटील, सूत्रसंचलन राकेश पाटील सर, तर आभार स्वप्निल सावंत यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. मनोज भाऊ (पैलवान) यांचे विशेष सहकार्य व अनमोल मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्निल सावंत, पोलीस गजानन पाटील, अजय पाटील, पंकज पाटील, स्वप्निल बोरसे, गोटू पाटील, हेमंत पाटील, टिनू ठाकूर, यांचे सहकार्य लाभले.

8 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Journalist धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
8 hrs ago
66994dfe-3927-4f74-9aa4-c58db3b3b12c

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    2
    Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    user_अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    पारोळा, जळगाव, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Peoples News 24
    1
    Post by Peoples News 24
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Riyazisaksayyed
    1
    Post by Riyazisaksayyed
    user_Riyazisaksayyed
    Riyazisaksayyed
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    57 min ago
  • Post by YUVA JALNA NEWS
    1
    Post by YUVA JALNA NEWS
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    Reporter जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • राजुर बस स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय चालत असलेल्या पती-पत्नींना पोलिसांनी केली अटक
    1
    राजुर बस स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय चालत असलेल्या पती-पत्नींना पोलिसांनी केली अटक
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सीमारेषेवर पाकिस्तानची पुन्हा कुरापत जम्मू कश्मीर मध्ये ड्रोन घुसखोरी
    2
    सीमारेषेवर पाकिस्तानची पुन्हा कुरापत जम्मू कश्मीर मध्ये ड्रोन  घुसखोरी
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse Nandurbar, Maharashtra•
    11 hrs ago
  • गतिरोधक की डिव्हायडर... प्रवासी वर्गात संभ्रम !  शेवगाव–नेवासा रस्त्यावरील अर्धवट गतिरोधक प्रवाशांसाठी ठरतोय डोकेदुखी; तातडीने तांत्रिक सुधारणा करण्याची प्रवासी वर्गाची मागणी.... शेवगाव दि १२ शेवगाव–नेवासा रोडवरील त्रिमूर्ती  शिक्षण संस्थेच्या समोरील रस्त्यावर शेवगाव बांधकाम विभागाच्या वतीने अलीकडेच एक गतिरोधक उभारण्यात आले.. आहे. मात्र हे गतिरोधक नेमके गतिरोधक आहे की डिव्हायडर याबाबत वाहनचालक व सामान्य प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अगोदरच शिक्षण संस्थेचे प्रवेशद्वार हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले असतांना हि गतिरोधकाची अडचण निर्माण झाल्याने हे गतिरोधक  विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी आहे की विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढवण्यासाठी आहे, हे मात्र विद्यार्थ्यांना ही समजेना ? सदर संरचनेला गतिरोधक म्हणावे, तर तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेले फलक, रिफ्लेक्टर, रंगसंगती अथवा सूचक चिन्हे कुठेही लावण्यात आलेली नाहीत. परिणामी, येणारी-जाणारी वाहने थेट या अडथळ्यावर आदळत असून, वाहनचालक व प्रवाशांना कंबर, मणके व हाडांच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. सामान्यतः शाळा-महाविद्यालय परिसरात गतिरोधक बसवण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांची सुरक्षितता राखणे हा असतो. मात्र येथे गतिरोधक उभारल्यानंतरही वाहनचालक या अडथळ्यावरून न जाता शाळेच्या गेटलगतच्या मोकळ्या जागेतून वाहने नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. त्यामुळे ही रचना गतिरोधक आहे की डिव्हायडर, याबाबत प्रवाशांना अजूनही स्पष्टता नाही. या तथाकथित गतिरोधकाच्या अयोग्य व अर्धवट रचनेमुळे बांधकाम विभागातील अभियंते, उपअभियंते व रस्त्यावर काम करणाऱ्या पर्यवेक्षकांची कारागिरी जनतेसमोर उघडी पडली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, प्रवासी वर्गातून या गतिरोधकाला तातडीने तांत्रिकदृष्ट्या योग्य स्वरूप देण्यात यावे, आवश्यक ते फलक, रंग व रिफ्लेक्टर लावून त्याचे शास्त्रशुद्ध पुनर्भरण करावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. याशिवाय, आधीच अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर या अडथळ्यामुळे आणखी अडचणी निर्माण झाल्या असून, वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
    2
    गतिरोधक की डिव्हायडर... प्रवासी वर्गात संभ्रम ! 
शेवगाव–नेवासा रस्त्यावरील अर्धवट गतिरोधक प्रवाशांसाठी ठरतोय डोकेदुखी; तातडीने तांत्रिक सुधारणा करण्याची प्रवासी वर्गाची मागणी....
शेवगाव दि १२
शेवगाव–नेवासा रोडवरील त्रिमूर्ती  शिक्षण संस्थेच्या समोरील रस्त्यावर शेवगाव बांधकाम विभागाच्या वतीने अलीकडेच एक गतिरोधक उभारण्यात आले.. आहे. मात्र हे गतिरोधक नेमके गतिरोधक आहे की डिव्हायडर याबाबत वाहनचालक व सामान्य प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अगोदरच शिक्षण संस्थेचे प्रवेशद्वार हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले असतांना हि गतिरोधकाची अडचण निर्माण झाल्याने हे गतिरोधक  विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी आहे की विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढवण्यासाठी आहे, हे मात्र विद्यार्थ्यांना ही समजेना ?
सदर संरचनेला गतिरोधक म्हणावे, तर तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेले फलक, रिफ्लेक्टर, रंगसंगती अथवा सूचक चिन्हे कुठेही लावण्यात आलेली नाहीत. परिणामी, येणारी-जाणारी वाहने थेट या अडथळ्यावर आदळत असून, वाहनचालक व प्रवाशांना कंबर, मणके व हाडांच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे.
सामान्यतः शाळा-महाविद्यालय परिसरात गतिरोधक बसवण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांची सुरक्षितता राखणे हा असतो. मात्र येथे गतिरोधक उभारल्यानंतरही वाहनचालक या अडथळ्यावरून न जाता शाळेच्या गेटलगतच्या मोकळ्या जागेतून वाहने नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. त्यामुळे ही रचना गतिरोधक आहे की डिव्हायडर, याबाबत प्रवाशांना अजूनही स्पष्टता नाही.
या तथाकथित गतिरोधकाच्या अयोग्य व अर्धवट रचनेमुळे बांधकाम विभागातील अभियंते, उपअभियंते व रस्त्यावर काम करणाऱ्या पर्यवेक्षकांची कारागिरी जनतेसमोर उघडी पडली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, प्रवासी वर्गातून या गतिरोधकाला तातडीने तांत्रिकदृष्ट्या योग्य स्वरूप देण्यात यावे, आवश्यक ते फलक, रंग व रिफ्लेक्टर लावून त्याचे शास्त्रशुद्ध पुनर्भरण करावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
याशिवाय, आधीच अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर या अडथळ्यामुळे आणखी अडचणी निर्माण झाल्या असून, वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
    user_ANI News
    ANI News
    Shevgaon, Ahmednagar•
    12 hrs ago
  • Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    1
    Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    user_अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    पारोळा, जळगाव, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.