Shuru
Apke Nagar Ki App…
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ हा अर्थसंकल्प अतिशय प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासनावर आधारित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसोबतच महिला सक्षमीकरणासाठी यात लाडकी बहीण योजना, लखपती दीदी व बचत गटांसाठी उमेद मॉल यांसारख्या भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा खऱ्या अर्थाने शेतकरी, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे. - डॉ. सुधा कांकरिया, सामाजिक कार्यकर्त्या, अहिल्यानगर #महाअर्थसंकल्प२०२६ #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
राविराज शिंदे
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ हा अर्थसंकल्प अतिशय प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासनावर आधारित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसोबतच महिला सक्षमीकरणासाठी यात लाडकी बहीण योजना, लखपती दीदी व बचत गटांसाठी उमेद मॉल यांसारख्या भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा खऱ्या अर्थाने शेतकरी, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे. - डॉ. सुधा कांकरिया, सामाजिक कार्यकर्त्या, अहिल्यानगर #महाअर्थसंकल्प२०२६ #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
More news from Ahmednagar and nearby areas
- राहुरीत शनिवारी पाणी टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांसाठी प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था राहुरी (प्रतिनिधी): राहुरी शहरातील नगरपरिषद हद्दीत दर शनिवारी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली. ही बाब लक्षात येताच राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने जीवनधारा पाणी पुरवठा गाडी चालकांना संपर्क करून शाळेत पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करून दिली. यावेळी प्रा. मोरे स्वतः शाळेत उपस्थित राहून रांगेत उभ्या विद्यार्थ्यांना पाणी पाजत होते. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली. या कार्याबद्दल फ्रिडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ जोगदंड यांनी प्रा. भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच राहुरी शहरातील सर्व शाळांनी दर शनिवारी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, शनिवारी नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.1
- Post by Dattatray Funde1
- राजूरमध्ये डुप्लिकेट कृषी निविष्ठांमुळे आदिवासी शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे. नेमके या प्रकरणामागे कोण आहे? आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? या संपूर्ण प्रकरणाचा सखोल पाठपुरावा जनहित 24/7 सातत्याने करत राहणार आहे. 👉 अशाच ताज्या आणि धाडसी बातम्यांसाठी पाहत राहा – जनहित 24/7, आपल्या हक्काचा आवाज. 📺1
- 👉 तुम्हालाही पार्सल पाठवायचे आहे का? विश्वासार्ह कुरिअर सेवेसाठी आजच आम्हाला कॉल करा! 95457899661
- छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे पाटील यांनी घेतले शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे दर्शन नाथ षष्ठीच्या पावन पर्वावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज श्री क्षेत्र पैठण येथे भेट देऊन शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी पैठण नगरीत भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर मनोज जरांगे यांचं विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने समाजाचे प्रश्न सुटावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा दर्शन सोहळा पार पडला.1
- ------- (प्रतिनिधी) - राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वराज्य संकल्पना प्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ नव्या राजमाता जिजाऊ नावाच्या ३ बाय २ आसन रचनेच्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. एसटी महामंडळाने या पूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा विविध नावांनी बससेवा सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेली लालपरी आज ही दुरावस्थेत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी एसटी बसची अवस्था अतिशय खराब असून प्रवाशांना मोडकळीस आलेल्या व धोकादायक बसमधून प्रवास करावा लागत आहे. या कडे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सोमवार दिनांक ०९ रोजी अंबेजोगाई ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करताना एसटी बसमधील आसनव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आलेली दिसून आली. या बाबत बस कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ही अवस्था अनेक दिवसांपासून असल्याचे सांगण्यात आले. एसटीच्या दुरावस्थेच्या या पूर्वीही बीड जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी एसटीच्या दुरावस्थेचे दर्शन घडवणाऱ्या तीन घटना एकाच दिवशी घडल्या होत्या. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पाटोदा - बीड - परभणी मार्गावरील बस पावसात गळत होती. छत खराब असल्याने पावसाचे पाणी थेट प्रवाशांवर पडत होते आणि प्रवाशांना छत्री घेऊन बसण्याची वेळ आली होती. नेकनूर ते मांजरसुंभा दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते लातुर जाणाऱ्या (एमएच-२४ एयू ८३३५) बसचे चाक निखळून पडले होते. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. अंबेजोगाई अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका बसमध्ये छत गळत असल्याने एका प्रवाशाला चालकाच्या डोक्यावर छत्री धरून उभे राहावे लागले होते. या घटनांमुळे लालपरीमधून प्रवास करणे अनेक ठिकाणी धोकादायक ठरत असून नादुरुस्त बसची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.1
- येवला शहरात चोरट्यांचे धाडस कमालीचे वाढले असून, आता भरवस्तीतही नागरिक सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील नांदगाव बायपासलगत असलेल्या रमणपार्क सोसायटीत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून मोठ्या रकमेवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे, पीडित कुटुंब प्रसूतीसाठी दवाखान्यात गेलेले असताना ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी रवी पवार हे आपल्या गर्भवती पत्नीला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. पवार यांनी आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी अत्यंत कष्टाने जमवलेली रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. दवाखान्यातून परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले पाहून पवार कुटुंबाला धक्काच बसला. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, "पोलिसांचा वचक संपला आहे का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एका गरीब कुटुंबाने अडचणीच्या काळासाठी साठवलेला पैसा चोरीला गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- सिल्लोड आकाराच्या वाहक व चालकाकडून महिला दिना निमित्त अनोखा उपक्रम चालत्या बसमध्ये प्रवासी महिलांचा पुस्तक देऊन मानसन्मान1