नाशिकच्या ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भेट देऊन भगवान त्र्यंबकेश्वराचे विधिवत पूजन आणि आरती केली. यादरम्यान त्यांनी देशाच्या प्रगती, समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली. त्र्यंबकेश्वर मंदिरातील मुख्य दर्शनापूर्वी लोकसभा अध्यक्षांनी तीर्थराज कुशावर्त येथेही विधिवत पूजन करून सर्व धार्मिक विधी पार पाडले. ओम बिर्ला मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या धार्मिक सोहळ्याप्रसंगी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, तहसीलदार गणेश जाधव, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, मंदिर संस्थानचे विश्वस्त कैलास घुले व रुपाली भुतडा आणि त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे उपस्थित होते.
नाशिकच्या ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भेट देऊन भगवान त्र्यंबकेश्वराचे विधिवत पूजन आणि आरती केली. यादरम्यान त्यांनी देशाच्या प्रगती, समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली. त्र्यंबकेश्वर मंदिरातील मुख्य दर्शनापूर्वी लोकसभा अध्यक्षांनी तीर्थराज कुशावर्त येथेही विधिवत पूजन करून सर्व धार्मिक विधी पार पाडले. ओम बिर्ला मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या धार्मिक सोहळ्याप्रसंगी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, तहसीलदार गणेश जाधव, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, मंदिर संस्थानचे विश्वस्त कैलास घुले व रुपाली भुतडा आणि त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे उपस्थित होते.
- उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला नवे बळ देणाऱ्या अत्याधुनिक अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अपेक्षा व्यक्त केली की, अशोका हेल्थ सिटी ही केवळ उपचारांची संस्था न राहता वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचे जागतिक दर्जाचे केंद्र बनावे. तसेच, या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना आधुनिक सुपर स्पेशालिटी आरोग्यसेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.1
- नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी टवाळखोरांच्या विरोधात केलेल्या कडक कारवाईचे शहरभरात कौतुक होत आहे. या कारवाईनंतर आवामी विकास पार्टीचे नाशिक शहर अध्यक्ष सरफराज पठाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांची भेट घेऊन पोलिसांच्या या कामगिरीची प्रशंसा केली. या भेटीदरम्यान त्यांनी मागणी केली की, ज्याप्रमाणे टवाळखोरांच्या विरुद्ध मोहीम राबवून कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर भद्रकाली परिसरात कथित स्वरूपात सुरू असलेल्या अवैध जुगार, मटका आणि सट्ट्याच्या धंद्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी. या बेकायदेशीर व्यवसायांमध्ये सहभागी असलेले चालक आणि खेळाडू यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांच्या यापुढील कारवाईकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- दिंडोरी तालुक्यातील वणी येथील शंकेश्वर मंदिर येथे आज साध्वी आणि महंतांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी वणी येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- नाशिक–पळसन मार्गावरील एसटी बस सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा फाटा येथे अचानक पंक्चर झाली, मात्र बसमध्ये टायर बदलण्यासाठी आवश्यक असलेला जॅकच उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे तासन्तास हाल झाले. या महत्त्वाच्या साधनसामग्रीअभावी बस दुरुस्तीचे काम जागेवरच खोळंबले. परिणामी, बसमधील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करत रस्त्यावरच ताटकळत राहावे लागले. एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनात जॅकसारखे मूलभूत साहित्यही उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असून, यामुळे एसटी महामंडळाच्या निष्काळजी कारभारावर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अभावामुळे केवळ प्रवाशांचा वेळच वाया गेला नाही, तर चालक आणि वाहकालाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व बसमध्ये आवश्यक साधनसामग्रीची खात्री करावी, अशी संतप्त मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.1
- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायतीने गारुडी आणि मातंग समाजाच्या अतिक्रमित जागेवरील घर बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, आश्वी पोलीस स्टेशनमध्ये मानवाधिकार राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या प्रकारानंतर संगमनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्यास, पक्षाच्या वतीने आश्वी पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे.2
- गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. पिंपळसेत-खरोंडा ग्रामपंचायत हद्दीतील शिंगारपाडा ते मांडवीहरा-हुंबरण या पाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पूर्णपणे वाहून गेला आहे. या रस्त्यासोबतच पाईप आणि मोऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असून, यामुळे मांडवीहरा आणि हुंबरण या दोन पाड्यांमधील नागरिकांचा इतर भागांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. रस्ता वाहून गेल्यामुळे या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दररोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांचे शिक्षणही धोक्यात आले असून, शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि वृद्ध नागरिकांना उपचारासाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात नेणे अत्यंत कठीण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकाही या भागात पोहोचू शकत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळसेत-खरोंडाचे सरपंच दिनेश जाधव यांनी प्रशासनाकडे तातडीने घटनास्थळाची पाहणी करून युद्धपातळीवर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी रस्ता, पाईप, मोऱ्या आणि संरक्षण भिंतीचे नुकसान होते, मात्र संबंधित बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते, असा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच दिनेश जाधव यांनी दिला आहे।2
- नाशिकच्या सातपूर परिसरातील बहुचर्चित 'गोल्ड मॅन' जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत मुख्य आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२च्या पथकाने पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथून अटक केली आहे. राकेश आबालाल सोनार (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी, अंबड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास 'गोल्ड मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिर्यादी हे आपल्या चारचाकी वाहनातून घरी जात असताना तिघा अज्ञातांनी त्यांना अडवले होते. आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या वाहनात प्रवेश केला आणि धारदार चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमालही जप्त केला आहे. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राकेश सोनार हा गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होता. गुन्हेशाखा युनिट-२ ने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे राकेश सोनार पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले आणि त्यांनी चोहोली फाटा परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हेशाखा युनिट-२चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर तसेच डॉ. समाधान हिरे, यशवंत बेडकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.3
- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. परिसरात 'गेला पाऊस कुणीकडे' अशी स्थिती निर्माण झाली असून, पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.2