logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अण्णाभाऊ साठे जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी व मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप बानेगाव, ता. घनसावंगी, दि.0 १ : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बानेगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वह्या, पेन व अन्य आवश्यक शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे आनंदाने स्वागत केले. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

1 hr ago
user_Santram Jadhav
Santram Jadhav
Jalna, Maharashtra•
1 hr ago
39b6980e-e81a-4c0e-bf2f-82eec0e9e02f

अण्णाभाऊ साठे जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी व मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप बानेगाव, ता. घनसावंगी, दि.0 १ : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बानेगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वह्या, पेन व अन्य आवश्यक शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे आनंदाने स्वागत केले. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सातबारा हॉटेलजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जण ताब्यात, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबूराव काळे चौक परिसरात सातबारा हॉटेलजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी सायंकाळी धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले. शनिवार दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजाता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि भ्रमणध्वनी असा एकूण 83 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पंचांसमक्ष सायंकाळी सुमारे 6.04 वाजता छापा टाकला. यावेळी सातही आरोपी पैशांवर ’झब्बा मत्ता (तीरट)’ हा जुगार खेळताना रंगेहात आढळून आले. कारवाईदरम्यान सचिन संतोष मंडळ, विनायक श्रीनिवास टिपरास, अनिकेत विनोद दांडगे, संदीप भिकनराव हीवाळे, अंशुमन देविदास बत्तीनीवार, शुभम राजेंद्र गाफुड आणि शिवकुमार पांडुरंग सावंत या सात जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात येणारे 31 पत्ते तसेच तीन भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 83 हजार 260 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार जाधव, कानडजे, भगवान मुंजाळ, दांडगे, शेख आणि दुर्गेश गोफणे यांनी सहभाग घेतला.
    1
    सातबारा हॉटेलजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जण ताब्यात, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त
जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबूराव काळे चौक परिसरात सातबारा हॉटेलजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी सायंकाळी धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले. शनिवार दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजाता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि भ्रमणध्वनी असा एकूण 83 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पंचांसमक्ष सायंकाळी सुमारे 6.04 वाजता छापा टाकला. यावेळी सातही आरोपी पैशांवर ’झब्बा मत्ता (तीरट)’ हा जुगार खेळताना रंगेहात आढळून आले.
कारवाईदरम्यान सचिन संतोष मंडळ, विनायक श्रीनिवास टिपरास, अनिकेत विनोद दांडगे, संदीप भिकनराव हीवाळे, अंशुमन देविदास बत्तीनीवार, शुभम राजेंद्र गाफुड आणि शिवकुमार पांडुरंग सावंत या सात जणांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात येणारे 31 पत्ते तसेच तीन भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 83 हजार 260 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार जाधव, कानडजे, भगवान मुंजाळ, दांडगे, शेख आणि दुर्गेश गोफणे यांनी सहभाग घेतला.
    user_दैनिक शुभ प्रभात
    दैनिक शुभ प्रभात
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    40 min ago
  • मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त! मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!
    1
    मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!
मनपाच्या दारात चार जणांचा आमरण एल्गार; सहावा दिवस उजाडला तरी प्रशासन सुस्त!
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात 30 जुलैपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून, प्रभाग क्रमांक 1 मधील गायत्री नगर, कोठारी नगर आणि महेश नगर परिसराला पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.
    1
    जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी

पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना..


जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी
पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना..
आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना शहरात 30 जुलैपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून, प्रभाग क्रमांक 1 मधील गायत्री नगर, कोठारी नगर आणि महेश नगर परिसराला पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! ​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! ​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand
    1
    जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान!
​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand
जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान!
​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand
    user_GLOBAL NEWS JALNA
    GLOBAL NEWS JALNA
    सच बोलने की आदत है मुझे जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • जालन्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस बँडची मनोवंदनाने सुभाष चंद्र बोस संस्था चे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते उत्साहून वातावरण संपन्न या दिवशी लोकांना मिथेपिया वाटण्यात आले
    1
    जालन्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस बँडची मनोवंदनाने सुभाष चंद्र बोस संस्था चे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते उत्साहून वातावरण संपन्न या दिवशी लोकांना मिथेपिया वाटण्यात आले
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल, ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी राबवली आहे... Bharat 24Taas News
    1
    भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल
भोकरदन मध्ये न. प च्या वतीने प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून दंड वसुल, ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी राबवली आहे...
Bharat 24Taas News
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    5 hrs ago
  • भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून
    1
    भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा 
मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून
भोकरदन तालुक्यातील मका पिकांना पावसामुळे दिलासा 
मका पिक हिरवं गार शेत दिसतेय शोभून
    user_Samadhn kalam
    Samadhn kalam
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवारी दुपारी धडक कारवाई केली. या कारवाईत लॉजमधून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात मोक्ष लॉजवर पोलिसांनी केलेली ही पाचवी कारवाई असल्याने या लॉजच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    1
    एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका

अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव


एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका
अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव
आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालन्यातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवारी दुपारी धडक कारवाई केली. या कारवाईत लॉजमधून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात मोक्ष लॉजवर पोलिसांनी केलेली ही पाचवी कारवाई असल्याने या लॉजच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.