चांदवडच्या नेमिनाथ जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून ७० सीडबॉलचे रोपण व ४० वृक्षांची लागवड ‘पर्यावरण रक्षणाचा करूया पण, आपले भविष्य घडवूया आपण...’ असा पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प करत चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यंदाही पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. विद्यालयाच्या ‘हरित सेना’ विभागांतर्गत सलग चौथ्या वर्षी सीडबॉल रोपण आणि वृक्षारोपण उपक्रम अत्यंत उत्साहात राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी डोंगर परिसरात ७० सीडबॉलचे रोपण व ४० वृक्षांची लागवड करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. वाढते प्रदूषण, जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग) आणि पावसाचे कमी होत जाणारे प्रमाण यांसारख्या गंभीर जागतिक समस्यांचे मूळ कारण पृथ्वीवरील झाडांची घटती संख्या हेच आहे. शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना या समस्येची जाणीव व्हावी, या उद्देशाने प्राचार्य शिवदास शिंदे, उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हरित सेना प्रमुख रोशन नेरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिवसागणिक वाढणारे तापमान आणि अवेळी येणारा पाऊस या संकटांवर मात करण्यासाठी वृक्षांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. तसेच निसर्ग रक्षणात मानवाची भूमिका स्पष्ट करत, नेरकर यांनी विद्यार्थ्यांना सीडबॉल (बीजगोळे) तयार करण्याची प्रत्यक्ष कृती समजावून सांगितली. त्यानुसार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जांभूळ, वड, कडुलिंब, आंबा आणि चिकू यांसारख्या विविध स्वदेशी वृक्षांचे तब्बल ७० सीडबॉल स्वतः तयार केले. त्यानंतर भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या राशेवाडी रस्त्यालगत विद्यार्थ्यांनी या सीडबॉलची उधळण केली, तसेच ४० विविध वृक्षांचे यशस्वी रोपणही केले.

- अशोका मेडीकव्हर हाॅस्पीटलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन डॉक्टरांनी आधुनिक नेत्ररोग उपचार पद्धती बाबत माहिती दिली मेडिकल क्षेत्रात मोठी क्रांती! ईएनटी आणि नेत्ररोगाच्या रुग्णांसाठी अशोका मेडिकव्हर ठरतेय वरदान, पत्रकार परिषदेत डॉ माहिती1
- विजय चौधरी यांच्या विरोधात समस्त लेवा पाटीदार गुजर समाजा मूक मोर्चा नंदुरबार : भाजपचे विजय चौधरी यांच्या विरोधात समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने मूक मोर्चा समाज माध्यमावरील कथित आक्षेपार्य वक्तव्यप्रकरणी विजय चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर1
- धुळ्यात मुसळधार पाऊस; पुराचा धोका टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर, जेसीबीच्या साहाय्याने केला पाण्याचा वेळेवर निचरा... Dhule News | धुळ्यात मुसळधार पाऊस; पुराचा धोका टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर, जेसीबीच्या साहाय्याने केला पाण्याचा वेळेवर निचरा... - #dhulenews #dhuleflood #dhuleheavyrainfall #rainfall #alert1
- पांझरा नदीचा पूर ओसरला; स्वच्छता मोहीम सुरू, तर पूर पाहण्यासाठी गर्दी न करण्याचे मुफ्ती कासिम जिलानी यांचे आवाहन... Dhule News | पांझरा नदीचा पूर ओसरला; स्वच्छता मोहीम सुरू, तर पूर पाहण्यासाठी गर्दी न करण्याचे मुफ्ती कासिम जिलानी यांचे आवाहन... - #dhulenews #panzrariver #dhuleflood #heavyrainindhule #dhulecity1
- चांदवड तालुक्यातील एक निसर्गरम्य ठिकाण हाडबिची शेंडी कातरवाडी1