logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिकच्या मुंबई नाका परिसरात गॅरेज व्यवसायासाठी घेतलेल्या १९ लाख रुपयांच्या बदल्यात २६ लाख रुपये फेडूनही गॅरेज चालकाचे अपहरण करून आणखी पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपींनी गॅरेज चालकाची कारही पळवून नेली आणि पोलिसातील तक्रार मागे न घेतल्यास कुटुंबाला गायब करण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुंडाविरोधी पथकाने मोठ्या शिताफीने मुख्य संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई नाका पोलिस ठाण्यात वडाळा रोड येथील रहिवासी इसरार इस्लाम खान (३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, संशयित नासीर कय्युम कुरेशी आणि सद्दाम कय्युम कुरेशी (दोघे रा. कसाईवाडा, वडाळानाका) यांच्याविरुद्ध खंडणी, अपहरण आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इसरार यांचे मुंबई नाका सर्कलजवळ चारचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. त्यांनी व्यवसायासाठी सप्टेंबर २०२५ मध्ये नासीरकडून टप्प्याटप्प्याने १९ लाख रुपये घेतले होते. मात्र व्यवसायात मंदी आल्याने नासीरने दरमहा १ लाख ९० हजारांची मागणी करत, उशीर झाल्यास रोज १० हजार रुपये याप्रमाणे वसुली सुरू केली. भीतीपोटी इसरार यांनी १९ लाखांच्या बदल्यात २६ लाख रुपये परत केले, तरीही त्यांचा छळ सुरूच होता. २८ एप्रिल रोजी नासीरने इसरार यांच्या गॅरेजमधून त्यांची कार (एमएच ०१ सी.डी. ९२१०) जबरदस्तीने पळवून नेली. त्यानंतर ११ जून रोजी सद्दाम कुरेशीने चॉपर काढून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच ९ जुलै रोजी इसरार यांना भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीची तक्रार देण्यासाठी इसरार पोलिस ठाण्यात गेले असता, याचा राग धरून १० जुलै रोजी सद्दाम थेट इसरार यांच्या घरात शिरला. त्याने इसरार यांचे दुचाकीवरून कसाईवाड्यात अपहरण केले व तक्रार मागे न घेतल्यास कुटुंब गायब करण्याची धमकी दिली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने गुंडा विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार घनश्याम महाले यांना सद्दाम कुरेशीबाबत माहिती मिळाली. तो सह्याद्री हॉस्पिटल जवळ असताना पथकाने सापळा रचून, स्कार्पिओ कारसह पळून जाण्याच्या बेतात असलेल्या सद्दाम कय्युम कुरेशी (३५) याला शिताफीने ताब्यात घेतले. ही यशस्वी कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक संदीप पवार व अंमलदारांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.

1 hr ago
user_Dadasaheb Gaikwad
Dadasaheb Gaikwad
Nashik, Maharashtra•
1 hr ago

नाशिकच्या मुंबई नाका परिसरात गॅरेज व्यवसायासाठी घेतलेल्या १९ लाख रुपयांच्या बदल्यात २६ लाख रुपये फेडूनही गॅरेज चालकाचे अपहरण करून आणखी पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपींनी गॅरेज चालकाची कारही पळवून नेली आणि पोलिसातील तक्रार मागे न घेतल्यास कुटुंबाला गायब करण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुंडाविरोधी पथकाने मोठ्या शिताफीने मुख्य संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई नाका पोलिस ठाण्यात वडाळा रोड येथील रहिवासी इसरार इस्लाम खान (३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, संशयित नासीर कय्युम कुरेशी आणि सद्दाम कय्युम कुरेशी (दोघे रा. कसाईवाडा, वडाळानाका) यांच्याविरुद्ध खंडणी, अपहरण आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इसरार यांचे मुंबई नाका सर्कलजवळ चारचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. त्यांनी व्यवसायासाठी सप्टेंबर २०२५ मध्ये नासीरकडून टप्प्याटप्प्याने १९ लाख रुपये घेतले होते. मात्र व्यवसायात मंदी आल्याने नासीरने दरमहा १ लाख ९० हजारांची मागणी करत, उशीर झाल्यास रोज १० हजार रुपये याप्रमाणे वसुली सुरू केली. भीतीपोटी इसरार यांनी १९ लाखांच्या बदल्यात २६ लाख रुपये परत केले, तरीही त्यांचा छळ सुरूच होता. २८ एप्रिल रोजी नासीरने इसरार यांच्या गॅरेजमधून त्यांची कार (एमएच ०१ सी.डी. ९२१०) जबरदस्तीने पळवून नेली. त्यानंतर ११ जून रोजी सद्दाम कुरेशीने चॉपर काढून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच ९ जुलै रोजी इसरार यांना भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीची तक्रार देण्यासाठी इसरार पोलिस ठाण्यात गेले असता, याचा राग धरून १० जुलै रोजी सद्दाम थेट इसरार यांच्या घरात शिरला. त्याने इसरार यांचे दुचाकीवरून कसाईवाड्यात अपहरण केले व तक्रार मागे न घेतल्यास कुटुंब गायब करण्याची धमकी दिली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने गुंडा विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार घनश्याम महाले यांना सद्दाम कुरेशीबाबत माहिती मिळाली. तो सह्याद्री हॉस्पिटल जवळ असताना पथकाने सापळा रचून, स्कार्पिओ कारसह पळून जाण्याच्या बेतात असलेल्या सद्दाम कय्युम कुरेशी (३५) याला शिताफीने ताब्यात घेतले. ही यशस्वी कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक संदीप पवार व अंमलदारांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला नवे बळ देणाऱ्या अत्याधुनिक अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अपेक्षा व्यक्त केली की, अशोका हेल्थ सिटी ही केवळ उपचारांची संस्था न राहता वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचे जागतिक दर्जाचे केंद्र बनावे. तसेच, या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना आधुनिक सुपर स्पेशालिटी आरोग्यसेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    1
    उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला नवे बळ देणाऱ्या अत्याधुनिक अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अपेक्षा व्यक्त केली की, अशोका हेल्थ सिटी ही केवळ उपचारांची संस्था न राहता वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचे जागतिक दर्जाचे केंद्र बनावे. तसेच, या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना आधुनिक सुपर स्पेशालिटी आरोग्यसेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी टवाळखोरांच्या विरोधात केलेल्या कडक कारवाईचे शहरभरात कौतुक होत आहे. या कारवाईनंतर आवामी विकास पार्टीचे नाशिक शहर अध्यक्ष सरफराज पठाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांची भेट घेऊन पोलिसांच्या या कामगिरीची प्रशंसा केली. या भेटीदरम्यान त्यांनी मागणी केली की, ज्याप्रमाणे टवाळखोरांच्या विरुद्ध मोहीम राबवून कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर भद्रकाली परिसरात कथित स्वरूपात सुरू असलेल्या अवैध जुगार, मटका आणि सट्ट्याच्या धंद्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी. या बेकायदेशीर व्यवसायांमध्ये सहभागी असलेले चालक आणि खेळाडू यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांच्या यापुढील कारवाईकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    1
    नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी टवाळखोरांच्या विरोधात केलेल्या कडक कारवाईचे शहरभरात कौतुक होत आहे. या कारवाईनंतर आवामी विकास पार्टीचे नाशिक शहर अध्यक्ष सरफराज पठाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांची भेट घेऊन पोलिसांच्या या कामगिरीची प्रशंसा केली.

या भेटीदरम्यान त्यांनी मागणी केली की, ज्याप्रमाणे टवाळखोरांच्या विरुद्ध मोहीम राबवून कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर भद्रकाली परिसरात कथित स्वरूपात सुरू असलेल्या अवैध जुगार, मटका आणि सट्ट्याच्या धंद्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी. या बेकायदेशीर व्यवसायांमध्ये सहभागी असलेले चालक आणि खेळाडू यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांच्या यापुढील कारवाईकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    user_AVP Nashik Tv
    AVP Nashik Tv
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • दिंडोरी तालुक्यातील वणी येथील शंकेश्वर मंदिर येथे आज साध्वी आणि महंतांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी वणी येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    दिंडोरी तालुक्यातील वणी येथील शंकेश्वर मंदिर येथे आज साध्वी आणि महंतांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी वणी येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नाशिक–पळसन मार्गावरील एसटी बस सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा फाटा येथे अचानक पंक्चर झाली, मात्र बसमध्ये टायर बदलण्यासाठी आवश्यक असलेला जॅकच उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे तासन्तास हाल झाले. या महत्त्वाच्या साधनसामग्रीअभावी बस दुरुस्तीचे काम जागेवरच खोळंबले. परिणामी, बसमधील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करत रस्त्यावरच ताटकळत राहावे लागले. एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनात जॅकसारखे मूलभूत साहित्यही उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असून, यामुळे एसटी महामंडळाच्या निष्काळजी कारभारावर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अभावामुळे केवळ प्रवाशांचा वेळच वाया गेला नाही, तर चालक आणि वाहकालाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व बसमध्ये आवश्यक साधनसामग्रीची खात्री करावी, अशी संतप्त मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
    1
    नाशिक–पळसन मार्गावरील एसटी बस सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा फाटा येथे अचानक पंक्चर झाली, मात्र बसमध्ये टायर बदलण्यासाठी आवश्यक असलेला जॅकच उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे तासन्तास हाल झाले. या महत्त्वाच्या साधनसामग्रीअभावी बस दुरुस्तीचे काम जागेवरच खोळंबले. परिणामी, बसमधील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करत रस्त्यावरच ताटकळत राहावे लागले.

एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनात जॅकसारखे मूलभूत साहित्यही उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असून, यामुळे एसटी महामंडळाच्या निष्काळजी कारभारावर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अभावामुळे केवळ प्रवाशांचा वेळच वाया गेला नाही, तर चालक आणि वाहकालाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व बसमध्ये आवश्यक साधनसामग्रीची खात्री करावी, अशी संतप्त मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायतीने गारुडी आणि मातंग समाजाच्या अतिक्रमित जागेवरील घर बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, आश्वी पोलीस स्टेशनमध्ये मानवाधिकार राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या प्रकारानंतर संगमनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्यास, पक्षाच्या वतीने आश्वी पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे.
    2
    संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायतीने गारुडी आणि मातंग समाजाच्या अतिक्रमित जागेवरील घर बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, आश्वी पोलीस स्टेशनमध्ये मानवाधिकार राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

या प्रकारानंतर संगमनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्यास, पक्षाच्या वतीने आश्वी पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे.
    user_Amol shelke 1711
    Amol shelke 1711
    Construction Worker संगमनेर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    1 day ago
  • गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. पिंपळसेत-खरोंडा ग्रामपंचायत हद्दीतील शिंगारपाडा ते मांडवीहरा-हुंबरण या पाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पूर्णपणे वाहून गेला आहे. या रस्त्यासोबतच पाईप आणि मोऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असून, यामुळे मांडवीहरा आणि हुंबरण या दोन पाड्यांमधील नागरिकांचा इतर भागांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. रस्ता वाहून गेल्यामुळे या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दररोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांचे शिक्षणही धोक्यात आले असून, शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि वृद्ध नागरिकांना उपचारासाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात नेणे अत्यंत कठीण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकाही या भागात पोहोचू शकत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळसेत-खरोंडाचे सरपंच दिनेश जाधव यांनी प्रशासनाकडे तातडीने घटनास्थळाची पाहणी करून युद्धपातळीवर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी रस्ता, पाईप, मोऱ्या आणि संरक्षण भिंतीचे नुकसान होते, मात्र संबंधित बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते, असा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच दिनेश जाधव यांनी दिला आहे।
    2
    गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. पिंपळसेत-खरोंडा ग्रामपंचायत हद्दीतील शिंगारपाडा ते मांडवीहरा-हुंबरण या पाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पूर्णपणे वाहून गेला आहे. या रस्त्यासोबतच पाईप आणि मोऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असून, यामुळे मांडवीहरा आणि हुंबरण या दोन पाड्यांमधील नागरिकांचा इतर भागांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

रस्ता वाहून गेल्यामुळे या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दररोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांचे शिक्षणही धोक्यात आले असून, शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि वृद्ध नागरिकांना उपचारासाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात नेणे अत्यंत कठीण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकाही या भागात पोहोचू शकत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पिंपळसेत-खरोंडाचे सरपंच दिनेश जाधव यांनी प्रशासनाकडे तातडीने घटनास्थळाची पाहणी करून युद्धपातळीवर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी रस्ता, पाईप, मोऱ्या आणि संरक्षण भिंतीचे नुकसान होते, मात्र संबंधित बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते, असा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच दिनेश जाधव यांनी दिला आहे।
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नाशिकच्या सातपूर परिसरातील बहुचर्चित 'गोल्ड मॅन' जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत मुख्य आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२च्या पथकाने पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथून अटक केली आहे. राकेश आबालाल सोनार (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी, अंबड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास 'गोल्ड मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिर्यादी हे आपल्या चारचाकी वाहनातून घरी जात असताना तिघा अज्ञातांनी त्यांना अडवले होते. आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या वाहनात प्रवेश केला आणि धारदार चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमालही जप्त केला आहे. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राकेश सोनार हा गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होता. गुन्हेशाखा युनिट-२ ने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे राकेश सोनार पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले आणि त्यांनी चोहोली फाटा परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हेशाखा युनिट-२चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर तसेच डॉ. समाधान हिरे, यशवंत बेडकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.
    3
    नाशिकच्या सातपूर परिसरातील बहुचर्चित 'गोल्ड मॅन' जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत मुख्य आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२च्या पथकाने पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथून अटक केली आहे. राकेश आबालाल सोनार (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी, अंबड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास 'गोल्ड मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिर्यादी हे आपल्या चारचाकी वाहनातून घरी जात असताना तिघा अज्ञातांनी त्यांना अडवले होते. आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या वाहनात प्रवेश केला आणि धारदार चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमालही जप्त केला आहे. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राकेश सोनार हा गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होता. गुन्हेशाखा युनिट-२ ने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे राकेश सोनार पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले आणि त्यांनी चोहोली फाटा परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हेशाखा युनिट-२चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर तसेच डॉ. समाधान हिरे, यशवंत बेडकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. परिसरात 'गेला पाऊस कुणीकडे' अशी स्थिती निर्माण झाली असून, पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
    2
    पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. परिसरात 'गेला पाऊस कुणीकडे' अशी स्थिती निर्माण झाली असून, पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
    user_Ravindra Laxman pardhi
    Ravindra Laxman pardhi
    Teacher वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.