ईदच्या पार्श्वभूमीवर दुसरबीड येथे उफाळलेल्या वादातून दोन गटांत झोंबाझोंबी होऊन सार्वजनिक शांतता भंग झाल्याची घटना घडली आहे. दुसरबीड (प्रतिनिधी: संतोष बाहेकर). बुलडाणा.... ईदच्या पार्श्वभूमीवर दुसरबीड येथे उफाळलेल्या वादातून दोन गटांत झोंबाझोंबी होऊन सार्वजनिक शांतता भंग झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी सुमारे २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास ईदगाह बांधकाम व नामनिर्देशनाच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर लवकरच झोंबाझोंबीमध्ये झाले. दोन्ही गटांतील व्यक्तींनी एकमेकांवर धावून जात मारहाण केल्याने काहीजण जखमी झाले.या घटनेमुळे काही काळ परिसरातील शांतता भंग झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ धाव घेत हस्तक्षेप केला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश वारकरी (वय ३५, रा. किनगाव राजा) यांच्या फिर्यादीवरून किनगाव राजा पोलिसांनी शेख नौशाद, शेख याकुब उर्फ नसीर, शेख जिलानी, शेख इमरान, शेख इरफानअली, जुनेद अली, शेख साजेद, शेख जाकेर यांच्यासह २० ते २५ अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार विष्णु मुंढे करीत आहेत.दरम्यान, परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारीचे उपाय योजना करण्यात येत आहे...

- बुलढाणा शहरात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी; 'जिओ और जीने दो'च्या संदेशासह विविध कार्यक्रमांचे आयोजन1
- Post by Labour addaa.1
- खामगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलांचे अपहरण व जीवे मारायची धमकी...1
- खामगाव: अयोध्येतील श्रीराम नवमीचा उत्सव यंदा अकोला आणि खामगाव येथील भाविकांच्या योगदानाने अधिकच गोड झाला. अकोल्यातील प्रसिद्ध उद्योजक व खामगावचे नामांकित वकील ॲड. उदयसिंह आपटे यांचे बहीण-जावई सुधीरराव अभ्यंकर व त्यांच्या परिवाराच्या वतीने अयोध्येत तब्बल साडेतीन लाख राजगिरा लाडूंचे भव्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात २२ मार्च रोजी अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात आरती करून झाली. लाडूंनी भरलेले दोन मोठे ट्रक अयोध्येकडे रवाना करण्यात आले. अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या ट्रकला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. अयोध्या येथे पोहोचल्यानंतर अभ्यंकर परिवार आणि त्रिशक्ती ग्रुपचे सचिव सत्येंद्रसिंह ठाकूर यांनी या महाप्रसादाच्या वाटपाची धुरा सांभाळली. रामनवमीच्या पर्वावर सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत अखंडपणे लाखो भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विवेक बिडवई हेदेखील आपल्या पत्नीसह उपस्थित होते.1
- भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण दतिया (मध्य प्रदेश), ३१ मार्च २०२६ : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे स्थानिक नेते आणि वार्ड क्रमांक १ चे नगरसेवक (पार्षद) कल्लू कुशवाहा यांची आज सकाळी भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण दतिया परिसरात खळबळ उडाली असून भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत सेवढा चुंगी (Sevdha Chungi) चौकात सकाळी सुमारे ८:३० ते ९ वाजेदरम्यान घडली. कल्लू कुशवाहा हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी किंवा रामलला/हनुमान मंदिरातून परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक ताबडतोब फायरिंग केली. डोक्यात आणि पाठीत गोळ्या लागल्याने ते जागीच कोसळले आणि मृत्यू झाला. हल्लेखोर (४-५ जण) दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले.5e4013 पार्श्वभूमी : कल्लू कुशवाहा हे २०२२ मध्ये भाजपातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावर पूर्वी एका हत्येचा गुन्हा होता. २०१६ मध्ये पूर्व पार्षद बालकिशन कुशवाहा यांच्या हत्येच्या प्रकरणात दतिया कोर्टाने त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, काही महिने आधी उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला होता. त्यांच्यावर इतर गुन्ह्यांचेही आरोप होते.4aaa75 पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी लगतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांच्या शोधात विशेष पथके दाखल करण्यात आली आहेत. भाजपा पक्षाने या घटनेची तीव्र निंदा केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या हत्येमुळे मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी जोडले राहा. ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. न्याय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Mazhar Pathan1
- Post by Labour addaa.1