बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी पुरेशी नसून कौशल्य आणि व्यावसायिक क्षमता हीच करिअरची गुरुकिल्ली आहे, याच संकल्पनेतून कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स महाविद्यालयात कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्याधारित आणि व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या संकल्पनेनुसार महाविद्यालयाने हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. या महाविद्यालयात रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस, ब्युटी पार्लर, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, स्टॉक मार्केट, फ्रंट ऑफिस डेव्हलपमेंट, फ्लॉवर स्टॉक डेव्हलपमेंट, क्लिनिकल व पॅरामेडिकल तंत्रज्ञान, मशरूम कल्टिव्हेशन, पशुपालन प्रशिक्षण, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे विश्लेषण, फॉरेन्सिक सायन्स तंत्रज्ञान, फळ प्रक्रिया तंत्रज्ञान, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, नर्सरी व गार्डनिंग व्यवस्थापन, विद्युत गृहउपकरणे दुरुस्ती व देखभाल, पत्रकारिता आणि भाषांतर, मायक्रमनिर्मिती आणि फॅशन डिझायनिंग यांसारखे विविध कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न मिळता प्रत्यक्ष कार्यानुभव, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उद्योगक्षेत्राला आवश्यक असणारी व्यावहारिक कौशल्ये शिकण्याची संधी मिळत आहे. प्रात्यक्षिके, कार्यशाळा आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्यात उद्योजकतेची वृत्ती विकसित होत आहे. विद्यार्थ्यांना 'जॉब रेडी' आणि 'फ्युचर रेडी' बनविणे हेच या उपक्रमांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी सांगितले. आजच्या वेगाने बदलणाऱ्या रोजगार क्षेत्रात पदवीसोबतच कौशल्ये असणे अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नाविन्यपूर्ण उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. संदीप वर्पे, आमदार विवेकभैय्या कोल्हे, सौ. चैतालीताई काळे, श्री. सुनील गंगुले यांच्यासह इतर सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून, रोजगारक्षम विद्यार्थी घडविण्यावर महाविद्यालय सातत्याने भर देत आहे.

- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायतीने गारुडी आणि मातंग समाजाच्या अतिक्रमित जागेवरील घर बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, आश्वी पोलीस स्टेशनमध्ये मानवाधिकार राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या प्रकारानंतर संगमनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्यास, पक्षाच्या वतीने आश्वी पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे.2
- छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये एका डॉनच्या घरात प्रचंड मोठी रक्कम सापडली आहे. या घरात मिळालेली रक्कम एवढी अफाट आहे की पोलिसांना ती मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. पोलीस ५ मशीनच्या साहाय्याने या सापडलेल्या रकमेची मोजणी करत होते.1
- चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथील शिंदेवस्ती परिसरात आज सकाळी एका हृदयद्रावक दुर्घटनेत ५२ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. दरेगाव येथील रहिवासी असलेल्या इंदुबाई संतोष देवरे या आपल्या नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहात माहेरी आल्या होत्या. नात शिक्षणासाठी तिथेच त्यांच्या भावाकडे राहत असून, वाढदिवसाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी इंदुबाई कालच राजदेरवाडीला पोहोचल्या होत्या. आज सकाळी इंदुबाई नेहमीच्या नित्यक्रमासाठी आणि प्रातःविधीसाठी घराबाहेर पडल्या असताना हा अनर्थ घडला. शिंदेवस्ती जवळील डोंगराचा भाग अचानक खचल्याने त्यावरून एक मोठा दगड थेट त्यांच्या अंगावर कोसळला. वजनी दगडाखाली दबल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कालपर्यंत आनंदाचे वातावरण असलेल्या घरात एका क्षणात शोककळा पसरली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे दरेगाव आणि राजदेरवाडी दोन्ही गावांवर शोकवदना पसरली असून परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चांदवड पोलीस स्टेशन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.2
- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे आज खेडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले. या पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी दिंडोरी पेठचे माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडीला भेट दिली. यावेळी त्यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत।1
- बनावट शालार्थ आदेश तयार करून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी धुळे येथून प्रशांत तुळशीराम वाडीले नावाच्या आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर नाशिक येथे आणण्यात येत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात उघड झाल्याप्रमाणे, नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैध मान्यता प्रस्ताव नसतानाही, मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. या आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीत नोंदी करून वेतन आणि थकबाकीची रक्कम लाटण्यात आली. या संपूर्ण गैरव्यवहारातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, आतापर्यंत सुमारे १२०० आरोपी निष्पन्न झाले आहेत. तपासादरम्यान समोर आले आहे की, प्रशांत वाडीले याने धुळे जिल्ह्यातील काही शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बनावट शालार्थ आदेश तयार करून दिले होते. तत्कालीन उपसंचालकांच्या स्वाक्षरीचा वापर करून संबंधितांना वेतन आणि मोठ्या प्रमाणावर थकबाकीची रक्कम मिळवून देण्यात त्याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी धुळे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस हवालदार कराड, गिते, पोलीस अंमलदार येवले तसेच अंबड युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार बोडके, पोलीस अंमलदार पचलोरे व महाले यांच्या पथकाने धुळे येथे कारवाई करून वाडीले याला अटक केली. आरोपीला धुळे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला असून, रविवारी (१२ जुलै) त्याला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे, पोलीस हवालदार राजेंद्र गिते, शिवाजी कुलकर्णी आणि संदीप बागल यांचे पथक करत आहे.1
- नाशिकच्या पेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार मनोज दुर्गा गायकवाड (वय ३७) यांना ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील कारवाई थांबवून त्यांचे वाहन सोडण्यासाठी सुरुवातीला १ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार १० जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.1
- येवला तालुक्यातील देवदरी येथील दाणे वस्ती परिसरात शनिवारी रात्री ८:३० च्या सुमारास एका ७० वर्षीय वृद्ध महिलेवर अज्ञात चोरट्याने कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला आहे. कमल दामू दाणे असे या जखमी वृद्ध महिलेचे नाव असून, त्या घराच्या परिसरात असताना अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात त्यांच्या डोक्याला, कमरेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांना राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेद्वारे येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. तपासाला वेग देण्यासाठी परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.1