पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत पोर्टलवरील रक्कम अंतिम राहणार; सहकार आयुक्त दीपक तावरे यांचे स्पष्टीकरण अमरावती: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत व्यापारी बँकांच्या एनपीए खात्यांबाबत गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील थकबाकी आणि पोर्टलवरील रक्कमेत फरक दिसून येत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. राज्य शासनाने 2 जून 2026 च्या शासन निर्णयानुसार ही योजना जाहीर केली होती. या योजनेत कर्जमाफी, एकवेळ तडजोड योजना आणि प्रोत्साहनपर लाभ या तीन घटकांचा समावेश आहे. योजनेच्या पोर्टलवर बँकांनी 31 लाख 97 हजार कर्जखात्यांची माहिती सादर केली होती. त्यापैकी 25 जुलै 2026 रोजी 16 लाख 16 हजार कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची 7 लाख 3 हजार आणि व्यापारी बँकांची 9लाख 13 हजार खाते आहेत. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील थकबाकी आणि पोर्टलवरील थकबाकी यामध्ये फरक असल्यास पोर्टलवरील रक्कमच ग्राह्य धरण्यात येईल. पोर्टलवरील थकबाकीची रक्कम 31 मार्च 2026 रोजीची आहे. शासनाने 1 जुलै 2026 रोजी सर्व बँकांना 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज न आकारण्याबाबत सूचना दिल्या आहेत. आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर शेतकऱ्याला पावती देण्यात येईल. त्यात कर्जमुक्तीची रक्कम नमूद केलेली असेल. आधार प्रमाणीकरणानंतर 31 मार्च 2026 वरील कर्जबाकीची लाभाची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यानंतर बँकामार्फत कर्ज बेबाकीचे प्रमाणपत्र संबंधित शेतकऱ्याला दिले जाईल. कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेच्या शाखेत आणि सेवा संस्थांमध्ये लावण्यात येतील. तसेच कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना संबंधित बँकेमार्फत खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून दिले जाईल. पोर्टलवरील रक्कम किंवा इतर तपशीलाबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास त्यांनी पोर्टलवर ग्रिव्हन्स नोंदवावी. त्याचा निपटारा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत केला जाईल. सहकार आयुक्तांनी हे स्पष्टीकरण सर्व शेतकरी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.

- शिक्षण व्यवस्थेवरील भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थेविरोधात काँग्रेस खासदारांचे संसदेच्या परिसरात आंदोलन खासदार बळवंत वानखेडे चे उपस्थित1
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. #Amravati #aashishyerekar1
- महापुरुषांचे फोटो कचरा सारखे पडले धुळखात वनोजा ग्रामपंचायत कार्यालयात हि आहे ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामसेवक यांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटो ची वीटंबना होत आहे कितेक दिवसांपासून महापुरुषांचे फोटो धूळखात पडून आहेत आणि याकडे प्रशासनान का दुर्लक्ष करत आहे ज्यांच्या मुळे आज आपण स्वातंत्र्य जीवन जगत आहो ज्या महामानवामुळे गावात ग्रामपंचायत. कायदा.संविधान. सन्मानाने जगण्याचा हक्क अधिकार स्वतंत्र दिले आशा महापुरुषांचे फोटो धूळखात पडून आहेत किती लाजवनारी बाब आहे तेही ग्रामपंचायत मध्ये यावर शासन कारवाई करेल का? हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की ग्रामसेवक वर कारवाई झाली पाहिजे1
- रोलर नाही… थेट बसच वापरली! आर्वी आगारातील धक्कादायक प्रकार; प्रश्न विचारताच व्यवस्थापकांची उद्धट भाषा?”1
- माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती1
- अमरावतीत वाढत्या अवैध वाहतुकीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक; दोषी RTO निलंबनाची मागणी1
- पाटणबोरीत पावसाचा कहर! सर्व प्रमुख रस्ते बंद, पुलांवरून पाणी; वाहतूक पूर्णपणे ठप्प | Yavatmal Rain यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पैनगंगा आणि खुनी नदी दुथडी भरून वाहत असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये आणि पूराच्या पाण्यातून प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. इंडिया न्यूज R7 वर पाहा यवतमाळ, अकोला, अमरावती आणि विदर्भातील ताज्या, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्या. 📍 स्थान: पाटणबोरी, यवतमाळ, महाराष्ट्र 🎥 प्रतिनिधी: संदीप सुरपाम1