ट्रॅक्टर अपघातातील जख्मी महिलेला कंकडालवार कडून आर्थिक मदतीची हात चिंतलपेठ येथे महिला मजुरांची ट्रॅक्टर पलटली..अनेक महिला गंभीर ! गडचिरोली प्रतिनिधी अहेरी : कापूस तोडणीसाठी नवेगाव येथून जामगा येथे जात असलेल्या महिलांवर मोठे संकट कोसळले.चिंतलपेट परिसरात महिला मजुरांनी भरलेला ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्याने भीषण अपघात घडला.या अपघातात अनेक महिला जखमी झाल्या असून यात वंदना मनोहर गाऊत्रे (वय ५४,रा.नवेगाव) ही महिला गंभीर जखमी झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार,सकाळच्या सुमारास वंदना गाऊत्रे यांच्यासह अनेक महिला कापूस काढण्यासाठी ट्रॅक्टरने जामगा येथे जात होत्या.दरम्यान चिंतलपेट येथे ट्रॅक्टरचा तोल जाऊन तो पलटी झाला.या अपघातात महिलांना जबर दुखापत झाली. जखमींना तात्काळ मदत करत वंदना गाऊत्रे यांना त्वरित चंद्रपूर येथील मेहरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान,वंदना गाऊत्रे यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे.त्यांच्या पतींची प्रकृती आधीपासूनच खालावलेली असून ते खाटेवर आहेत.कुटुंबात एकच मुलगा श्रीकांत मनोहर गाऊत्रे आहे.या अपघातामुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट कोसळले होते. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.यावेळी प्रवीण रेषे,बादल कोटरंगे,अतुल शेंडे,शरद कोटरंगे, पंकज शेंडे,पंकज कोटरंगे,सूरज शेंडे आदींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या घटनेनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी पुढाकार घेत जखमी वंदना गाऊत्रे यांना आर्थिक मदत दिली.त्यांच्या या मदतीमुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून,गरजू कुटुंबाला अधिकाधिक मदत मिळावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

- छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....1
- Post by Samachar king digital1
- Post by Suresh k langde1
- कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते1
- उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.1
- सच दिखाने के लिए पत्रकार को परमिशन चाहिए #Aurai #BiharPolice #Muzaffarpur #viralreels #worldbiharnews1
- Post by Pitam Parjapati1
- नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले1