एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गीता परिवार तर्फे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित "योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद" या विषयावर व्याख्यान. अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गीता परिवार तर्फे सोनाली कलंत्री व वंदना मुंदडा यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद या विषयावर व्याख्यान देण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला व सहकार महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सौ.सोनाली कलंत्री यांनी स्वामीजींचे बालपण ते संन्यास आणि त्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या मठ यांच्या माध्यमातून धर्माबद्दल जागृती या विषयावर सविस्तर माहिती गोष्टी द्वारे दिली. व्याख्यान संपल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आले.त्या प्रश्नांचे कांचन देवरे, खदिजा खान, सुयोग वाकचौरे, वैष्णवी आहेर, ओजस अमोदकर, आराध्य दाभाडे या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिली व त्यांना बक्षीस देण्यात आले. तसेच या संस्थेतर्फे इ.1ली ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन देखील स्कूल मध्ये करण्यात आले. यानंतर स्कूलच्या वतीने आलेल्या पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्कूलचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक दीपक खैरनार, गणेश सोनवणे, सचिन घोडके, राजेश कांबळे, सुशांत निकम, अर्चना एंडाईत, निलिमा देशमुख, शर्मिला पवार, सुनिता वडे, शोभा निकम,धनश्री काळंगे, खुशी वाडेकर, दर्शना परदेशी या सह सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अजहर खतीब यांनी केले.

- येवल्यात श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) निमित्त श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर (विंचुर रोड, येवला) येथे श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्रीं ना महावस्त्र अर्पण आणि महाअभिषेक पूजेने झाली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्रीं ची बावन्नी, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत हिरालाल नारायणसा बाकळे, दिगंबर नारायणसा बाकळे व समस्त बाकळे परिवार (येवला) यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास वक्रतुंड बिल्डर्स & डेव्हलपर्स (येवला व कोपरगाव) आणि इंजि. ऋषिकेश हिरालाल बाकळे यांचे सहकार्य लाभले. श्री गजानन महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- गंगापुर तालुक्यातील शिक्षकांचा निवासस्थानाच्या मागणीसाठी पंचायत समिती गंगापूर येथे शाळा बंद आंदोलन सुरू…1
- प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!1
- आईच्या आरोग्यासाठी १२ ज्योतिर्लिंग धावती यात्रा करणाऱ्या मोनूचे त्र्यंबकेश्वर मध्ये उत्स्फूर्त स्वागत त्र्यंबकेश्वर :- आपल्या आईच्या उत्तम आरोग्यासाठी नवस करत देशातील १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प केलेला बिहारमधील धावपटू मोनू सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. मोनूने आतापर्यंत पायांनी तब्बल ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला असून, त्याने आतापर्यंत ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले आहे. आपल्या या प्रेरणादायी प्रवासादरम्यान मोनूचे आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले. त्यावेळी त्याचे उत्स्फूर्त आणि जोरदार स्वागत करण्यात आले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास मोरे आणि योगेश महाले यांनी मोनूचे स्वागत करून त्याच्या या अनोख्या संकल्पाला शुभेच्छा दिल्या. यानंतर मोनूने Sapkal Knowledge Hub येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी देशभरात विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेले विविध प्रश्न, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता तसेच MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या यावरही त्याने भाष्य केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोनूने मेहनत, सातत्य आणि ध्येयावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचेही यावेळी व्यक्त करण्यात आले. मोनूचा हा प्रवास केवळ धार्मिक यात्रा नसून आईच्या आरोग्यासाठी केलेला संकल्प, श्रद्धा, जिद्द, शारीरिक क्षमता आणि देशभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश देणारा ठरत आहे. महाराष्ट्रात मोनू चर्चेचा विषय आईच्या आरोग्यासाठी नवस करून १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन निघालेला बिहारचा मोनू सध्या महाराष्ट्रात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास आणि ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करून त्याची ही प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे.1
- ऋषिपंचमी निमित्ताने आज मार्कंडेश्वर पर्वतावरती महिला भाविकांची मोठी गर्दी ऋषिपंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर ती महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती - पुराणात सांगितले आहे की ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी ज्या शेतात बैलाने शेतीमध्ये राबलेले किंवा बैलाच्या साह्याने केलेली शेती त्याच्यातून निघालेले उत्पन्न हे ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांना खाता येत नाही त्या दिवशी सुवासिनी महिला व इतर महिला या सकाळी उठल्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करून आल्यानंतर त्या महिला ज्या ठिकाणी ऋषी चे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात . सप्तऋषीपैकी नाशिक जिल्ह्यात करंजी येथे कर्दम ऋषी मार्कंडेश्वर पर्वतावर ती मार्कंड ऋषी त्रंबकेश्वर येथे गौतम ऋषी व मनमाड जवळ अगस्ती ऋषी हे असून या ठिकाणी आज कृषी पंचमी निमित्ताने महिलांनी मोठी गर्दी केली होती . मार्कंडेश्वर पर्वतावरती दर्शनासाठी धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व नगर येथील महिला भाविक ह्या दर्शनासाठी आल्या होत्या . यावेळेस कळवण पोलीस स्टेशन व दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ही ठेवला होता .1
- देवळाली प्रवराच्या लोड शेंडीग बाबद दीलेल्या सर्व पक्षीय निवेदनावर काय कारवाई झाली1
- येवला शहरातील नांदगाव रोड लगतच्या वसाहतीत संशयास्पद हालचालींमुळे कुंटणखाना सुरू असल्याचा संशय स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला येवला शहरातील नांदगाव रोड लगतच्या वसाहतीत संशयास्पद हालचालींमुळे कुंटणखाना सुरू असल्याचा संशय स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असले तरी नेमकी काय कारवाई झाली, हे अद्याप अस्पष्ट आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे आदेश दिलेले असताना, शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने चालतो, असा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.1
- इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए1