भोरमध्ये बसवेश्वर महाराजांची जयंती उत्साहात साजरी ; लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित भोरमध्ये बसवेश्वर महाराजांची ८९५ वी जयंती उत्साहात विक्रम शिंदे /भोर दि.१९ जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८९५ व्या जयंतीनिमित्त भोर शहरात विविध ठिकाणी आज (दि.१९) भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भोर नगरपालिका तसेच तहसील कार्यालय येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. भोर नगरपालिकेत नगराध्यक्ष रामचंद्र आवारे ,उपनगराध्यक्षा अँड. जयश्री शिंदे यांच्या हस्ते बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक अमित सागळे, जगदीश किरवे, तृप्ती सुपेकर, गणेश पवार, राजकुमार शिंदे, राजेंद्र शिंदे पालिका अधिकारी महेंद्र बांदल ,राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते.शहरातील राजवाडा चौकातील तहसील कार्यालयातही जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नायब तहसीलदार डॉ.अरुण कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी डॉ.अण्णासाहेब बिराजदार, डॉ. अरुण बुरांडे, डॉ. विद्या बुरांडे, डॉ. पुष्कर बिराजदार, प्रसाद महाजन, पूनम महाजन, विजयकुमार केरूर, संगीता केरूर, समाधान पैलवान, दमयंती पैलवान, स्वप्निल पैलवान, वैशाली पैलवान, शरद साळमळगी, सुरेखा साळमळगी, अक्षय राशिनकर, शैला बिराजदार, अनिल कुमार धरणे, अमित माळी तसेच लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी “कायकवे कैलास” (कष्ट हाच स्वर्ग) या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत समता, लोकशाही आणि सामाजिक ऐक्याचा संदेश आचरणात आणण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. अरुण बुरांडे यांनी उपस्थितांना बसवेश्वर महाराजांवरील पुस्तके भेट देऊन विचारांचा प्रसार केला.  समतावादी विचारांचा जागर करत हा सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भोरमध्ये बसवेश्वर महाराजांची जयंती उत्साहात साजरी ; लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित भोरमध्ये बसवेश्वर महाराजांची ८९५ वी जयंती उत्साहात विक्रम शिंदे /भोर दि.१९ जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८९५ व्या जयंतीनिमित्त भोर शहरात विविध ठिकाणी आज (दि.१९) भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भोर नगरपालिका तसेच तहसील कार्यालय येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. भोर नगरपालिकेत नगराध्यक्ष रामचंद्र आवारे ,उपनगराध्यक्षा अँड. जयश्री शिंदे यांच्या हस्ते बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक अमित सागळे, जगदीश किरवे, तृप्ती सुपेकर, गणेश पवार, राजकुमार शिंदे, राजेंद्र शिंदे पालिका अधिकारी महेंद्र बांदल ,राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते.शहरातील राजवाडा चौकातील तहसील कार्यालयातही जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नायब तहसीलदार डॉ.अरुण कदम यांच्या प्रमुख
उपस्थितीत महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी डॉ.अण्णासाहेब बिराजदार, डॉ. अरुण बुरांडे, डॉ. विद्या बुरांडे, डॉ. पुष्कर बिराजदार, प्रसाद महाजन, पूनम महाजन, विजयकुमार केरूर, संगीता केरूर, समाधान पैलवान, दमयंती पैलवान, स्वप्निल पैलवान, वैशाली पैलवान, शरद साळमळगी, सुरेखा साळमळगी, अक्षय राशिनकर, शैला बिराजदार, अनिल कुमार धरणे, अमित माळी तसेच लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी “कायकवे कैलास” (कष्ट हाच स्वर्ग) या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत समता, लोकशाही आणि सामाजिक ऐक्याचा संदेश आचरणात आणण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. अरुण बुरांडे यांनी उपस्थितांना बसवेश्वर महाराजांवरील पुस्तके भेट देऊन विचारांचा प्रसार केला.  समतावादी विचारांचा जागर करत हा सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- विक्रम शिंदे /भोर दि.20तालुक्याच्या भाटघर धरण क्षेत्रातील पसुरे मधील टोंगेवाडी येथे पुणे येथील आदिनाथ भक्तामर हीलिंग सेंटरच्या वतीने नागरिकांना आरोग्यहितकारक थंडगार पाण्यासाठी माठ मोफत वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे गौरव मुनोत,सुरेशनाना धुमाळ,दत्तात्रेयदादा धुमाळ,संतोष धुमाळ,मनोज धुमाळ तसेच महिला भगिनी,युवक उपस्थित होते. प्रति कुटुंब एक असे माठ वितरित करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी व महिलांनी माठ मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering1
- Post by Raju Bawdiwale1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- : साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स येथे नागरिकांनी सोने खरेदीसाठी मोठी रांग लावली आहे. अक्षय तृतीया हा सुवर्ण खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख ज्वेलर्स दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मी रोड परिसर गजबजून गेला आहे. ग्राहकांकडून सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकांनी गुंतवणूक आणि शुभ मुहूर्त या दोन्ही कारणांसाठी खरेदीला प्राधान्य दिले आहे. दर वाढलेले असतानाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांचा खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पारंपरिक प्रथेनुसार सणासुदीला सोने चांदी खरेदी करण्याकडे कल असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी वाढली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत सोने खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीचे दर वाढले. आजपर्यंत सोन्या- चांदीत गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं, असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले. दरांची माहिती : * सोने (२४ कॅरेट) : अंदाजे रू.७२,००० ते रू.७४,००० प्रति १० ग्रॅम * सोने (२२ कॅरेट) : अंदाजे रू.६६,००० ते रू.६८,००० प्रति १० ग्रॅम * चांदी : अंदाजे रू.८५,००० ते रू.९०,००० प्रति किलो * सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा * महिलांचा विशेष सहभाग * दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांचीही मोठी मागणी1
- विक्रम शिंदे /भोर दि.20 तंबाखू खाण्याच्या वादातून एकाचा खून केल्यानंतर २४ वर्षापासून फरार आरोपीस राजगड- वेल्हे पोलिसांनी महाड जि.रायगड इथून ताब्यात घेतले आहे .1