वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते आ.सचिन दादा कल्याणशेट्टी यांचा सत्कार. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान परिसर व अक्कलकोट कॉरिडोरसाठी शासनाकडून ५०० कोटींचा विकास आराखडा मंजूर करून घेतल्याबद्दल आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते आ.सचिन दादा कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान परिसर व अक्कलकोट येथे भाविकांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कॉरिडोर निर्मितीच्या पहिल्या टप्प्यासाठी ५०० कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातर्फे मिळाले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांचा वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने हा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या हस्ते आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, व नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी यांना शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सचिन दादा म्हणाले की स्वामी समर्थांच्या चरणी ही मोठी सेवा घडत आहे. कॉरिडोरमुळे देशभरातील लाखो भक्तांना चांगल्या सुविधा मिळतील. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पहिल्या टप्प्यासाठी ५०० कोटींचा आराखडा मागवला आहे. लवकरच निधी मंजूर करून कामाला सुरुवात होईल. देवस्थान, नगरपालिका आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास नेऊ असे मनोगत व्यक्त केले. यावेळी चेअरमन महेश मालक इंगळे यांनी आमदारांच्या पाठपुराव्या बद्दल आभार मानले. सन्माननीय आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून आणि स्वामींच्या कृपेने अक्कलकोटचा विकास आणखी वेगाने होईल असा विश्वास यावेळी सर्व मान्यवरांनी व्यक्त केला. या सत्कार सोहळ्यास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय महाराज भोसले, नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, नगरसेवक तम्मा मामा शेळके, बाळा शिंदे, देविदास कवटगी, कांतू धनशेट्टी, नागराज कुंभार, महेश हिंडोळे, नन्नू कोरबू, प्रवीण शहा, सुनील सिद्धे, अपर्णाताई सिद्धे, अशोक जाधव, नावेद डांगे, नगरसेवक सद्दाम शेरीकर, नगरसेवक सचिन शिंदे आणि शिवू स्वामी, रमेश शिंदे सर व इतर नगरसेवक उपस्थित होते.

- सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच! सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच!1
- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण दलित पॅंथर स्टाईल आंदोलन करणार मोकाट जनावरे नगरपालिकेच्या आवारात आणून सोडणार बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण बीड | प्रतिनिधी बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात धम्मानंद वाघमारे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धम्मानंद वाघमारे हे शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट गायी बसलेल्या होत्या. याचवेळी परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. अंधारामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे त्यांना दिसली नाहीत आणि त्यांच्या मोटारसायकलची एका गायीला जोरदार धडक बसली. या अपघातात धम्मानंद वाघमारे हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. त्यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर, बंद असलेले पथदिवे आणि संबंधित यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोकाट जनावरे हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.3
- तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा1
- फिरस्ता मेंढपाळ कुटुंबाची मेंढरांचा चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी मरेपर्यंत भटकंती. फिरस्ता मेंढपाळ कुटुंबाची मेंढरांचा चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी मरेपर्यंत भटकंती लोणंद शहरात फिरस्त्या मेंढपाळ कुटुंबाचे आगमन झाले असून सर्वत्र शेतामध्ये पिके असल्याने चारा व भूक भागवण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे निदर्शनाला आले सध्या पावसाळा सर्वत्र जिल्ह्यामध्ये असल्याने रात्री अपरात्री शेतामध्ये किंवा माळावर मेंढरास कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे या कुटुंबाचा शासनाने फेरविचार करून बारमाही चारा व पोटाची खळगी भरण्यासाठी खास सवलत दिल्यास जीवनाचे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल असे मेंढपाळ कुटुंबाने म्हटले आहे1
- लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल बीड प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून १ ऑगस्ट हा दिवस "लेखन प्रेरणा दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी अरुण खेमाडे, दत्ताभाऊ सौंदरमल, दीपक तांगडे, मीनाक्षी देवकते, कमल लांडगे, भूषण वाघमारे, सम्यक सरवदे यानी सत्कार केला. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यप्रेमी माणिक वाघमारे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली असून नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा मिळावी, यासाठी "लेखन प्रेरणा दिन" ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचा जाहीरनामा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणे ही स्वागतार्ह बाब आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला "लेखन प्रेरणा दिन" म्हणून मिळालेली ही नवी ओळख त्यांच्या साहित्यकार्याला आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारी असून, नव्या पिढीला लेखन व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास माणिक वाघमारे यांनी व्यक्त केला.4
- राज ठाकरे यांनी आज पुण्यात सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली राज ठाकरे यांनी आज पुण्यात सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली1
- साहित्यरत्न, लोकशाहीर, सामाजिक परिवर्तनाचे महान प्रणेते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 💐🙏 "माझी लेखणी ही केवळ मनोरंजनासाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि शोषितांच्या संघर्षाला वाचा फोडण्यासाठी आहे." आपल्या समृद्ध साहित्यातून, ज्वलंत शाहिरीतून आणि धगधगत्या विचारांतून त्यांनी उपेक्षित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. 'फकिरा'सारख्या अजरामर कादंबऱ्या आणि लावणी-पोवाड्यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यात एक नवी क्रांती घडवून आणली. साहित्यरत्न, लोकशाहीर, सामाजिक परिवर्तनाचे महान प्रणेते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 💐🙏 "माझी लेखणी ही केवळ मनोरंजनासाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि शोषितांच्या संघर्षाला वाचा फोडण्यासाठी आहे." आपल्या समृद्ध साहित्यातून, ज्वलंत शाहिरीतून आणि धगधगत्या विचारांतून त्यांनी उपेक्षित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. 'फकिरा'सारख्या अजरामर कादंबऱ्या आणि लावणी-पोवाड्यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यात एक नवी क्रांती घडवून आणली.1