logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सात लाख मे.टन ऊस गाळपासाठी जय भवानीची यंत्रणा सज्ज; ४४ व्या गळीत हंगामाचे रोलर पूजन उत्साहात सात लाख मे.टन ऊस गाळपासाठी जय भवानीची यंत्रणा सज्ज; ४४ व्या गळीत हंगामाचे रोलर पूजन उत्साहात महंत ह.भ.प. जनार्धन महाराज यांच्या हस्ते रोलर पूजन; पारदर्शक ऊसतोड कार्यक्रमासाठी संगणकीकृत प्रणालीचा अवलंब गेवराई | प्रतिनिधी : जय भवानी सहकारी साखर कारखान्याने सन २०२६-२७ च्या ४४ व्या गळीत हंगामासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून यंदा सात लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ऊसतोडणी, वाहतूक व कारखान्याची संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी दिली. कारखान्याच्या ४४ व्या गळीत हंगामाच्या प्रारंभानिमित्त आयोजित रोलर पूजन समारंभात ते बोलत होते. श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड संस्थानचे महंत ह.भ.प. जनार्धन महाराज यांच्या शुभहस्ते तसेच संचालक संभाजीराव पवळ यांच्या उपस्थितीत विधीवत रोलर पूजन करण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन भाऊसाहेब नाटकर, युवा नेते पृथ्वीराज पंडित, संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी तसेच ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना चेअरमन अमरसिंह पंडित यांनी सांगितले की, यंदा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे १३ हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली असून सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस नोंदणी केली आहे. यावर्षी ऊस नोंदणी पूर्णपणे संगणकीकृत प्रणालीद्वारे करण्यात आली असून त्याच प्रणालीतून पारदर्शक पद्धतीने ऊसतोडीचे नियोजन व अंमलबजावणी केली जाणार आहे. ते पुढे म्हणाले की, सात लाख मे.टन ऊस गाळपाच्या उद्दिष्टासाठी आवश्यक ऊसतोडणी व वाहतुकीची संपूर्ण यंत्रणा उभारण्यात आली आहे. संबंधित करार प्रक्रिया पूर्ण झाली असून पहिल्या हप्त्याचे वितरणही करण्यात आले आहे. त्यामुळे नियोजित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी कारखाना पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. मागील सन २०२५-२६ च्या ४३ व्या गळीत हंगामात जय भवानी सहकारी साखर कारखान्याने ५ लाख २४ हजार ७८७ मे.टन ऊस गाळप करून ४ लाख ५५ हजार ३५५ पोती साखरेचे उत्पादन केले. या हंगामात कारखान्याला १०.२८ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला. तसेच आसवनी प्रकल्पातून ७७.९८ लाख बल्क लिटर बी-हेवी स्पिरीटचे उत्पादन करण्यात आल्याची माहितीही अमरसिंह पंडित यांनी दिली. या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, माजी उपसभापती विकास सानप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, जालिंदर पिसाळ, गजानन काळे यांच्यासह बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, भवानी अर्बन बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे व कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. समारंभास कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 hr ago
user_Anil Kachare
Anil Kachare
Event management company बीड, बीड, महाराष्ट्र•
1 hr ago
2edd4208-7e1a-4ac6-8451-204846e0a733

सात लाख मे.टन ऊस गाळपासाठी जय भवानीची यंत्रणा सज्ज; ४४ व्या गळीत हंगामाचे रोलर पूजन उत्साहात सात लाख मे.टन ऊस गाळपासाठी जय भवानीची यंत्रणा सज्ज; ४४ व्या गळीत हंगामाचे रोलर पूजन उत्साहात महंत ह.भ.प. जनार्धन महाराज यांच्या हस्ते रोलर पूजन; पारदर्शक ऊसतोड कार्यक्रमासाठी संगणकीकृत प्रणालीचा अवलंब गेवराई | प्रतिनिधी : जय भवानी सहकारी साखर कारखान्याने सन २०२६-२७ च्या ४४ व्या गळीत हंगामासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून यंदा सात लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ऊसतोडणी, वाहतूक व कारखान्याची संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी दिली. कारखान्याच्या ४४ व्या गळीत हंगामाच्या प्रारंभानिमित्त आयोजित रोलर पूजन समारंभात ते बोलत होते. श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड संस्थानचे महंत ह.भ.प. जनार्धन महाराज यांच्या शुभहस्ते तसेच संचालक संभाजीराव पवळ यांच्या उपस्थितीत विधीवत रोलर पूजन करण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन भाऊसाहेब नाटकर, युवा नेते पृथ्वीराज पंडित, संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी तसेच ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना चेअरमन अमरसिंह पंडित यांनी सांगितले की, यंदा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे १३ हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली असून सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस नोंदणी केली आहे. यावर्षी

f7827a5b-4ac1-4b00-aeb1-e2b802ad3d0d

ऊस नोंदणी पूर्णपणे संगणकीकृत प्रणालीद्वारे करण्यात आली असून त्याच प्रणालीतून पारदर्शक पद्धतीने ऊसतोडीचे नियोजन व अंमलबजावणी केली जाणार आहे. ते पुढे म्हणाले की, सात लाख मे.टन ऊस गाळपाच्या उद्दिष्टासाठी आवश्यक ऊसतोडणी व वाहतुकीची संपूर्ण यंत्रणा उभारण्यात आली आहे. संबंधित करार प्रक्रिया पूर्ण झाली असून पहिल्या हप्त्याचे वितरणही करण्यात आले आहे. त्यामुळे नियोजित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी कारखाना पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. मागील सन २०२५-२६ च्या ४३ व्या गळीत हंगामात जय भवानी सहकारी साखर कारखान्याने ५ लाख २४ हजार ७८७ मे.टन ऊस गाळप करून ४ लाख ५५ हजार ३५५ पोती साखरेचे उत्पादन केले. या हंगामात कारखान्याला १०.२८ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला. तसेच आसवनी प्रकल्पातून ७७.९८ लाख बल्क लिटर बी-हेवी स्पिरीटचे उत्पादन करण्यात आल्याची माहितीही अमरसिंह पंडित यांनी दिली. या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, माजी उपसभापती विकास सानप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, जालिंदर पिसाळ, गजानन काळे यांच्यासह बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, भवानी अर्बन बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे व कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. समारंभास कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच! सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच!
    1
    सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच!
सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच!
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Salesperson परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवारी दुपारी धडक कारवाई केली. या कारवाईत लॉजमधून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात मोक्ष लॉजवर पोलिसांनी केलेली ही पाचवी कारवाई असल्याने या लॉजच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    1
    एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका

अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव


एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका
अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव
आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालन्यातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवारी दुपारी धडक कारवाई केली. या कारवाईत लॉजमधून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात मोक्ष लॉजवर पोलिसांनी केलेली ही पाचवी कारवाई असल्याने या लॉजच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जालन्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस बँडची मनोवंदनाने सुभाष चंद्र बोस संस्था चे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते उत्साहून वातावरण संपन्न या दिवशी लोकांना मिथेपिया वाटण्यात आले
    1
    जालन्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस बँडची मनोवंदनाने सुभाष चंद्र बोस संस्था चे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते उत्साहून वातावरण संपन्न या दिवशी लोकांना मिथेपिया वाटण्यात आले
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    1
    जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद शहरात साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) साहित्यसम्राट लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी नगर शहरात विविध ठिकाणी मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यात आली
    2
    छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद शहरात साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )
साहित्यसम्राट लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी नगर शहरात विविध ठिकाणी मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यात आली
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    58 min ago
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
    3
    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती
बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मीटर कनेक्शन कमी म्हणून महावितरणने दहा गावांचा वीजपुरवठा केला खंडित! घनसावंगी तालुक्यातील विरेगावसह दहा गावं अंधारात; पूर्वसूचना न देता वीज बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त मीटर कनेक्शन कमी म्हणून महावितरणने दहा गावांचा वीजपुरवठा केला खंडित! घनसावंगी तालुक्यातील विरेगावसह दहा गावं अंधारात; पूर्वसूचना न देता वीज बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त गावांची वीजपुरवठा बंद असल्याने या गावांतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आज दिनांक 1 शनिवार रोजी दुपारी 1वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : घनसावंगी तालुक्यातील डांबरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या विरेगावसह तब्बल दहा गावांचा वीजपुरवठा मीटर कनेक्शनची संख्या कमी असल्याचे कारण देत महावितरणने खंडित केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रात्री सात वाजल्यापासून वीजपुरवठा बंद असल्याने या गावांतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
    1
    मीटर कनेक्शन कमी म्हणून महावितरणने दहा गावांचा वीजपुरवठा केला खंडित!

घनसावंगी तालुक्यातील विरेगावसह दहा गावं अंधारात; पूर्वसूचना न देता वीज बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त


मीटर कनेक्शन कमी म्हणून महावितरणने दहा गावांचा वीजपुरवठा केला खंडित!
घनसावंगी तालुक्यातील विरेगावसह दहा गावं अंधारात; पूर्वसूचना न देता वीज बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त
गावांची वीजपुरवठा बंद असल्याने या गावांतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ
आज दिनांक 1 शनिवार रोजी दुपारी 1वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : घनसावंगी तालुक्यातील डांबरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या विरेगावसह तब्बल दहा गावांचा वीजपुरवठा मीटर कनेक्शनची संख्या कमी असल्याचे कारण देत महावितरणने खंडित केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रात्री सात वाजल्यापासून वीजपुरवठा बंद असल्याने या गावांतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महावितरणचे दीपक देवरे यांना आपल्या जीव वर खेळून लोकांच्या अंधे दुनियेत प्रकाश केला भर पावसाळ्यात बीच कोल्हापूर चढून दिल्लीचे तार जोडले
    1
    महावितरणचे दीपक देवरे यांना आपल्या जीव वर खेळून लोकांच्या अंधे दुनियेत प्रकाश केला भर पावसाळ्यात बीच कोल्हापूर चढून दिल्लीचे तार जोडले
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • खेळणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या बैलांचा जीवघेणा हल्ला; थरार CCTV मध्ये कैद लखनऊ |उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अर्जुनगंज परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या एका चिमुकल्यावर भटक्या बैलने अचानक हल्ला केला. ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात भटक्या जनावरांच्या वाढत्या समस्येबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
    1
    खेळणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या बैलांचा जीवघेणा हल्ला; थरार CCTV मध्ये कैद
लखनऊ |उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अर्जुनगंज परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या एका चिमुकल्यावर भटक्या बैलने अचानक हल्ला केला. ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात भटक्या जनावरांच्या वाढत्या समस्येबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.