मुळुकवाडी – मसेवाडी शिवरस्त्याचा २५ वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे ग्रामस्थांकडून आभार :– डॉ. गणेश ढवळे ------- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी ग्राम पंचायत हद्दीतील मुळुकवाडी ते मसेवाडी शिवरस्त्याचा प्रश्न तब्बल २५ वर्षांपासून प्रलंबित होता. भूमी अभिलेख कार्यालयात तीन वर्षांपूर्वी २१ हजार रुपये मोजणी शुल्क भरून ही प्रत्यक्ष मोजणी होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर वस्तीवरील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या कडे पाठपुरावा केला. त्या नंतर तहसीलदार शेळके यांनी कठोर भूमिका घेत पोलिस बंदोबस्तात रस्त्याच्या खुणा करून देत रस्ता मोकळा करून दिला. सरपंच रामकिसन कदम व पांडुरंग कानडे यांनी पुढाकार घेऊन रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना होणारी अडचण दूर झाली आहे. या बद्दल ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे आभार मानले आहेत. ----_---- पावसाळ्यातील अडचण दूर झाली. :– ग्रामस्थ --- पावसाळ्यात शाळा सुरू झाल्यानंतर शाळकरी मुलांना गुडघाभर चिखलातून शाळेत जावे लागत होते. तसेच आठवडी बाजार, भाजीपाला, दूध-दुभते, खत-बियाणे आणणे तसेच दवाखान्यात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. तहसीलदार शेळके यांच्या सहकार्यामुळे ही २५ वर्षांपासूनची समस्या दूर झाली असून आम्ही त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. >-:-> शाकींदर काटकर (ग्रामस्थ) >-:-> ----_---- तहसीलदारांच्या कठोर भूमिकेमुळे प्रश्न सुटला... --- गेल्या २५ वर्षांपासून पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तीन वर्षांपूर्वी भूमी अभिलेख कार्यालयात २१ हजार रुपये मोजणीसाठी भरून ही मोजणी होत नव्हती. त्या मुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देत तहसीलदार शेळके यांच्या कडे पाठपुरावा करण्यात आला. सुरुवातीला खुणा करून ही काही ग्रामस्थ सहकार्य करत नसल्याने शेवटी पोलिस बंदोबस्तात रस्ता मोकळा करण्यात आला. तहसीलदार शेळके साहेब यांच्या ठाम भूमिकेमुळे ग्रामस्थांचा २५ वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागला. >-:-> डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर (सामाजिक कार्यकर्ते) >-:->

- Post by Sanjhsuyog News Channel1
- Post by AapTak Hindi News Channel1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- मोबाइल चोरी का विरोध करने पर युवक को चाकू मारा; CCTV फुटेज सामने आया छत्रपति संभाजीनगर: मुकुंदवाड़ी इलाके से सामने आई एक चौंकाने वाली घटना में, एक युवक को लुटेरों ने बेरहमी से चाकू मार दिया। युवक ने लुटेरों द्वारा उसका मोबाइल फोन छीनने की कोशिश का विरोध किया था। इस घटना ने शहर में सार्वजनिक सुरक्षा को लेकर चिंताएँ बढ़ा दी हैं।1
- छत्रपती संभाजीनगरात मोबाईल चोरीतून एका तरुणाला चाकूने मारले! काल मधरात्री छत्रपती संभाजीनगर येथे मोबाईल चोरीतून एका तरुणाला चाकूने मारून जखमी केल्याची घटना घडली असून ती CCTV मध्ये कैद झाली आहे1
- Post by Sominath Kolhe1
- महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी सचिव - तारेक खान दुर्राणीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनके 135 वे जयंती के मौके पर दी मुबारकबाद1
- Post by Sanjhsuyog News Channel1