सहशिक्षक बालाजी पांचाळ यांचा तालुकास्तरीय सुलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक सहशिक्षक बालाजी पांचाळ यांचा तालुकास्तरीय सुलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक उदगीर (प्रतिनिधी) – देगलूर तालुक्यातील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय, वझर येथील सहशिक्षक बालाजी पांचाळ यांनी तालुकास्तरीय सुलेखन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे शाळेसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर सुलेखन स्पर्धा ‘शिक्षक, अधिकारी व कर्मचारी स्पर्धा 2025’ अंतर्गत पंचायत समिती देगलूर, जिल्हा नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील कडव्या स्पर्धेत बालाजी पांचाळ यांनी आपल्या उत्कृष्ट हस्ताक्षर कौशल्याच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळवला. बालाजी पांचाळ हे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय व प्रेरणादायी शिक्षक म्हणून ओळखले जातात. ते विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवित असतात. त्यांच्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे बालाजी पांचाळ यांची पुढील विभागीय स्तरावरील सुलेखन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

- साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news1
- Post by नागनाथ ससाने1
- मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर : शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.1
- *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.1
- अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. � Hindustan Times ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत. येथे महिलांना: 🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा 💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी 📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा 👉 मुख्य उद्देश: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे. 📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे: ओळख (Identity) + विकास केंद्र समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन ✔️ थोडक्यात अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात पण मुख्य हेतू एकच — 👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे1
- लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी. निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- “उदगीरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे… शहरातील जळकोट रोडवरील जय मल्हार धाब्याच्या पाठीमागील वसाहतीत एका माजी सैनिकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत घरात आढळून आला आहे. घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली… त्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडताच ही धक्कादायक बाब उघडकीस आली. प्रकाश बाबुराव सासट्टे असे मृत माजी सैनिकाचे नाव असून ते गेल्या अनेक वर्षांपासून उदगीरमध्ये राहत होते. प्राथमिक अंदाजानुसार चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा… मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वृद्ध आई-वडिलांसह राहत असलेल्या या माजी सैनिकाच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे… पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.”1