तासगांव तालूक्यात चालु हंगामात अत्यंत कमी पाऊस पड़ल्याने निर्माण झालेली परिस्थिति पहाता तासगाव तालुक्यात तत्काळ दुष्काळ जाहिर करावा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार तासगांव तालूक्यात चालु हंगामात अत्यंत कमी पाऊस पड़ल्याने निर्माण झालेली परिस्थिति पहाता तासगाव तालुक्यात तत्काळ दुष्काळ जाहिर करावा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार ! शेतकरी नेते जोतीराम अप्पा जाधव व जेष्ठ पत्रकार शशिकांत डांगे यांचा इशारा* वरील विषयास अनुसरून तासगांव तालुक्यातील खालील सह्या करणारे उपोषण कर्ते व सर्व शेतकरी या निवेदन द्वारे तासगाव तालुक्यातील दुष्काळामुळे झालेल्या भीषण टंचाई बाबत तासगाव चे तहसीलदार मा. अतुल पाटोळे साहेब यांना निवेदन देवून मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी तासगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा व त्याबरोबर इतरही मागण्या आंदोलकांनी जाहीर केल्या आहेत. १) यंदा पावसाची प्रचंड तुट झालेने विहिर व बोअरला नैसर्गिक पाणी येणेच बंद झाले आहे व तालुक्यातील छोट्या छोट्या गावातील तलाव, बंधारे जुन महिन्यापासुन अतीअल्प पाऊस पडल्याने कोरडे झाले आहेत. *(त्याचा प्रतिदिन मंडल निहाय प्रजन्य वृष्टी डाटा आपल्याकड़े उपलब्ध आहे त्यावर आपन व लोकप्रतिनिधी यांनी नजर टाकावी.)* २) खरीपातील सर्वच कडधान्य अतीअल्प पाऊस व सततचे धुके यामुळे वाळून जात आहेत शिवाय चारा पीके जसे ज्वारी, हाइब्रिड ज्वारी, मका, कडवळ व हत्ती गवत व इत्यादि पीके यांची उंची खूंटली असुन टी आज रोजी शेवटच्या घटका मोजत आहेत पीकेच नाही तर शेतकरीही आकाशाकडे डोळे लावुन पावसाची वाट पहात आहेत. हीच परिस्थिति राहिल्यांस पशुधन धोक्यात येऊन शेतकऱ्यास पशुधन कत्तल खान्यास विकन्या शिवाय पर्याय रहात नाही तरी लवकरात लवकर चारा डेपो चालु करावेत अन्यथा दुधाचा तुटवडा होऊन भेसळ खोर वाढतील व जनतेस , लहान मुलांना दुधाच्या रूपाने विष प्यावे लागेल. ३) तासगांव तालुका हा राज्यातील एक नंबर द्राक्ष पट्टा म्हणुन ओळखला जातो पण पावसा/पाण्या अभावी फळ छाटन्या थांबल्या आहेत, शिवाय ज्यांची शेततळी आहेत ती मार्च/ एप्रिलच्या खरड छाटनीस रिकामी झाली आहेत , शेततळी पुन्हा भरण्या साठी आपआपल्या भागातील छोटे तलाव, मोकळे क्षेत्र मधे विविध योजनेच्या माध्यमातुन पैसे भरून पाणी भरून घेतले जाते, कारण बोअर/ विहीरीस पाणी येईल व शेततळी भरली जातील पण विजेच्या लपंडावा मुळे पुर्ण ८ तास विज न मिळता ६ तास व कधी कधी त्याही पेक्षा कमी तास वीज शेतकऱ्यांना मिळते त्यामुळे पैसे भरून घेतलेल्या पाण्याने शेततळी ही भरली गेली नाहीत व पाणी जमीनीत मुरुले गेले व त्यांचा फायदा हा न पैसे भरनाऱ्याना होतो यावर विचार होने जरुरी आहे व सलग विना खड़ित वीज दयावी. ४) कडधान्य पाऊस नसल्यामुळे गेले आहे, व कडधान्य विकुन येणारे चलन थांबले आहे यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे, शिवाय पशुपालन/दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे तो चारा कमी मुळे मोडण्याच्या स्थितीत आला आहे. ५) राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय स्तरावरील हवामान तज्ञांनी अल नेनो मुळे भयानक दुष्काळ पडणार असा इशारा देऊनही वाहुन जाणाऱ्या पाण्याने छोटे मोठे तलाव/बंधारे भरून घेतले असते तर जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाली असती व थोड़ी फार दुष्काळ वर मात करता आली असती पण तालुक्यातिल कर्तव्यदक्ष/लोकप्रिय लोकप्रतिनिधि व सरकार यांनी टंचाई निधीतुन तलाव/बंधारे भरून घेतले गेले नाहीत तरीही अजुन वेळ गेलेली नाही, आज ही बरेच पाणी कर्नाटक मधे वाहुन जात आहे ते तत्काळ उचलून तलाव/बंधारे भरून द्यावेत. ६) कधी अतिवृष्टि तर कधी दुष्काळ परिस्थिति यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तरी शेतकऱ्यांचा पोकळ पुळका घेणाऱ्या सरकारने कोणत्याही अटी ,शर्ती व पहिली यादी दुसरी यादी तीसरी यादी न करता संपूर्ण कर्ज माफी करावी व कर्ज भरणाऱ्या ईमानदार शेतकऱ्यांना दोन लाख मदत दयावी. ७) महापूर नियंत्रणासाठी ज्या प्रमाणे प्रत्येक वर्षी आर्थिक तरतुदी होतात.कामे होतात त्या धर्तीवर दुष्काळ निर्मूलनासाठी कायमस्वरूपी शासकीय योजना असावी. ८) खरीप हंगाम 2024/25 मधे ज्वारी पिकास विमा भरपाई मिळाली पन इतर पिकास मिळाली नाही बाकी सर्व पिकास भरपाई मिळावी व त्या शेतकऱ्यानवर झालेला अन्याय दुर करावा. ९) मणेराजूरी मंडल मधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याना 2024/25 मधे द्राक्ष विमा नाकारण्यात आला याचं कारण पर्जन्य वृष्टी कमी झाली होती पण मनेराजूरी ठिकाणा वरील आधुनिक हवामान केंद्रावर पाऊस कमी पडला आसला तरी मणेराजुरी केंद्राच्या क्षेत्रातल्या बाकी गावात भरपुर पाऊस झालेने द्राक्ष मनी तड़ा जाने वगैरे रोगाचे प्रकार झाले होते मग बाकीच्या गावावर अन्याय झाला आहे. यावर उपाय म्हणुन प्रत्येक गाव पातळी वर आधुनिक हवामान केंद्र बसवले जावे तरच शेतकऱ्याना योग्य न्याय मिळेल. १०) मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व मा. पालकमंत्री यांनी घोषणा केली होती की पुराचे जे पाणी वाहून जाते त्याने तलाव/बंधारे टंचाई मधुन भरून देणार. तरी आपल्या तासगाव तालुक्यातील कोण कोणत्या गावातील कोण कोणत्या तलाव/बंधारे मधे किती एम सी एफ टी पाणी सोडले गेले होते व त्यांची रक्कम किती होते? जर पाणी सोडले गेले नाही तर ते का सोडले नाही याची सविस्तर पत्र व्यवहार केलेची माहिती मिळावी. तरी तासगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचा सततच्या वरील स्थितीमुळे सहनशीलतेचा अंत झाला आहे, तरी सरकारने बुधवार दि ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किमान ७०% पाऊस पुढील १५ दिवसात न पडल्यास दुष्काळ जाहिर करावा व निवेदन मधील मागण्याची पुर्तता करावी अन्यथा श्री.जोतिराम आकाराम जाधव माजी सैनिक यांचे १४ वे आमरण उपोषण व श्री.शशिकांत बाळसिंग डांगे. ज्येष्ठ पत्रकार यांचे सहावे आमरण उपोषण (जेष्ठ पत्रकार) हे गुरूवार दि ०१ आक्टोंबर २०२६ पासुन तालुक्यातील सर्व पक्षीय व सर्व प्रकारच्या पीक शेतकऱ्यांना सोबत घेऊन काॅंग्रेस भवन समोर तासगाव येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसत आहे. तासगाव चे तहसीलदार साहेब यांना निवेदन देताना श्री भरत नाना थोरात , श्री रविकिरण जाधव, श्री. शहाजी जाधव, श्री विजय पाटील श्री राम जाधव, उपस्थित होते

- शेकडो शेतकऱ्यांनी हात वर करून शक्तिपीठ विरोध केला..... शेकडो शेतकऱ्यांनी हात वर करून शक्तिपीठ महामार्ग लादणाऱ्या प्रशासनाचा तीव्र जाहीर निषेध केला जनसंवाद दरम्यान अधिकारी व शेतकऱ्यांच्या मध्ये तणाव एकच जिद्द शक्तिपीठ कडेगाव प्रांताधिकारी कार्यालय दणाणून गेले शेतकऱ्यांना हलक्यात घ्याल तर मातीत जाल कडेगाव प्रांताधिकारी महामार्ग विभागाचे अधिकारी ,पलूस तहसीलदार, मोणार्क कंपनीचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती च्या वतीने एक सुरात शेतकऱ्यांनी हात वर करून शक्तिपीठ महामार्ग रद्द करा अशा घोषणा देत प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला1
- १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.4
- उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने उपचारासाठी रवाना1
- खेड भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे गणरायाचे आगमन खेड भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे गणरायाचे आगमन खेड : खेडचे भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पारंपरिक पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करून पूजा-अर्चा करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने खेडेकर यांच्या निवासस्थानी उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.1
- सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव1
- शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते1
- बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.1
- परभणीत घुमणार पिवळ वादळ.मोर्चास उपस्थित राहावे विद्याताई मोठे महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी मायबाप युवक-युवती वतीने दि. 17 सप्टेंबर रोजी परभणी येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व दीपक भाऊ बोराडे करणार असल्याची माहिती साध्य फाउंडेशनच्या संस्थापिका व धनगर समाजाची रणरागिणी सौ. विद्याताई सचिन मोठे यांनी समाज बांधवांना एकजुटीचे आवाहन केले. विद्याताई मोठे म्हणाल्या, आपल्या हक्कासाठी आणि आपल्या मुला-बाळाच्या भविष्यासाठी आता गप्प बसून चालणार नाही. आपला आवाज शासन दरबारी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक धनगर बांधवाने 17 सप्टेंबरला परभणीत मोठ्या संख्येने व शांततेने उपस्थित राहावे.1