माझी वसुंधरा ६.० ई-प्रतिज्ञा अभियान वसुंधरा रक्षणासाठी पिंपरी चिंचवडकरांनी पुढे यावे – महापौर रवि लांडगे *नागरिकांना ई-प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन; हरित जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश...* *पिंपरी, दि. ११ मार्च २०२६ :* पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या “माझी वसुंधरा ६.०” अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना ई-प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसुंधरेचे संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि हरित जीवनशैलीचा स्वीकार यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात, पाणी व ऊर्जेची बचत करावी, प्लास्टिकचा वापर कमी करावा तसेच स्वच्छता आणि वृक्षसंवर्धन उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, हरित आणि वसुंधरापूरक ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले. हा उपक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने या ई-प्रतिज्ञेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. *नागरिक खालील लिंकवर भेट देऊन वसुंधरा संवर्धनासाठी आपली ई-प्रतिज्ञा , वैयक्तिक अथवा सामूहिकरित्या देखील नोंदवू शकतात.* *कोट* : वसुंधरेचे रक्षण ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, ‘माझी वसुंधरा ६.०’ अभियानाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडकरांनी हरित जीवनशैलीचा स्वीकार करून पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग नोंदवावा. – रवि लांडगे महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ......... *कोट* : शाश्वत आणि वसुंधरापूरक शहर उभारण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘माझी वसुंधरा ६.०’ अभियानाच्या ई-प्रतिज्ञेत सहभागी होऊन प्रत्येकाने वसुंधरा संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी. – श्रावण हर्डीकर आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका

- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- #pcmc #commisionerofpcmc #marathinews #ncp #bjp1
- *नागपूर मोर्चात सहभागी व्हा; मोहन भागवत यांना जाब विचारू – प्रकाश आंबेडकर* पुणे : सरकारच्या सध्याच्या धोरणांमुळे देशातील सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच नागपूरमध्ये होणाऱ्या मोर्चात सहभागी होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना जाब विचारण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीत केंद्र सरकारची भूमिका कमकुवत ठरत आहे. इराणने जम्मू-काश्मीर प्रश्नावर भारताच्या बाजूने भूमिका घेतली होती, मात्र इराणवर हल्ला झाल्यानंतर भारताने त्यांच्या बाजूने उभे राहण्याचे स्पष्ट केले नाही, अशी टीका त्यांनी केली. इराण हा चीनचा मित्र देश असून योग्य धोरण अवलंबले असते तर भारताला गॅस पुरवठा मिळू शकला असता आणि सध्याचा गॅस तुटवडा निर्माण झाला नसता, असेही ते म्हणाले. याशिवाय सरकार आंदोलनांवर निर्बंध आणणारे नवे कायदे करत असल्याचा आरोप करत आंबेडकर म्हणाले की, ज्यांच्याकडे स्पष्ट धोरण नाही ते केवळ जात आणि धर्माच्या राजकारणावर भर देत आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी राजकारण करणे शक्य नसल्याची टीकाही त्यांनी केली. सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून बँकिंग व्यवस्थेबाबतही लोकांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीका केली. दरम्यान, देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपली भूमिका ठामपणे मांडावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.1
- पिंपरीतून एका व्यापाऱ्याचा अपहरण 'खंडणी विरुद्ध पथक 'काळेवाडी पोलीस स्टेशन 'संगमनेर पोलीस यांच्या मदतीने व्यापाऱ्याची झाली सुटका .1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- पिंपरी चिंचवड : - अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews1
- Post by Vruttshakti Digital News1
- Post by Vruttshakti Digital News1