logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बीड, संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख सरपंचपदी विजयी संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख सरपंचपदी विजयी मस्साजोग : मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सहानुभूतीची लाट न दिसता मतदारांनी बदलाचा कौल दिला. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला असून स्वरुपानंद देशमुख यांनी ९२ मतांनी विजय मिळवत सरपंचपद पटकावले. निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांना ९१४ मते मिळाली, तर अश्विनी देशमुख यांना ८२२ मतांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे गावाच्या राजकारणात मोठा उलटफेर झाल्याचे चित्र आहे. दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेवर अश्विनी देशमुख यांना मोठा पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यांच्या कुटुंबीयांनीही गावोगावी जाऊन प्रचार केला. मात्र, मतदारांनी वेगळा निर्णय घेत स्वरुपानंद देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. दरम्यान, या निवडणुकीत तब्बल ८४ टक्के मतदान नोंदवले गेले. शांततेत मतदान पार पडावे यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या निकालामुळे मस्साजोगमधील राजकीय समीकरणे बदलली असून स्वरुपानंद देशमुख यांचा प्रभाव वाढला आहे. पुढील काळात गावाच्या विकासाच्या दृष्टीने त्यांच्या कार्यपद्धतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

8 hrs ago
user_RahimKhan Pathan
RahimKhan Pathan
Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
8 hrs ago
5b9dee59-3c11-487c-9fae-a1cb96b1d9d8

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 😯😯😯😯
    1
    😯😯😯😯
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Salesperson सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट
    1
    SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Gautam Hiwrale
    1
    Post by Gautam Hiwrale
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    1
    नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • खुलताबादमध्ये ओमनी कारमध्ये भीषण स्पोर्ट ; कारला आग, गॅस सिलेंडर बाहेर खुलताबाद शहरातील कमला नेहरू भद्रा कॉलनी रोडलगत उभी असलेल्या एका ओमनी कारमध्ये अचानक भीषण स्पोर्ट होऊन आग लागल्याची घटना घडली. आगीदरम्यान गाडीत असलेला गॅस सिलेंडर उडून बाहेर पडल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली. घटनेनंतर अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच नगरपरिषदेकडून कोणताही आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी काही वेळाने पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.नगरपरिषदेकडे अग्निशमन गाडी उपलब्ध असूनही त्यावर प्रशिक्षित फायरमन नसल्याची बाब समोर आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. .
    1
    खुलताबादमध्ये ओमनी कारमध्ये भीषण स्पोर्ट ; कारला आग, गॅस सिलेंडर बाहेर 
खुलताबाद शहरातील कमला नेहरू भद्रा कॉलनी रोडलगत उभी असलेल्या एका ओमनी कारमध्ये अचानक भीषण स्पोर्ट  होऊन आग लागल्याची घटना घडली. आगीदरम्यान गाडीत असलेला गॅस सिलेंडर उडून बाहेर पडल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली.
घटनेनंतर अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच नगरपरिषदेकडून कोणताही आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी काही वेळाने पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.नगरपरिषदेकडे अग्निशमन गाडी उपलब्ध असूनही त्यावर प्रशिक्षित फायरमन नसल्याची बाब समोर आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. .
    user_अरबाज शेख. सावरगावकर
    अरबाज शेख. सावरगावकर
    Voice of people उंबेरखेडा तांडा•
    7 hrs ago
  • Post by Vikash Thakare
    1
    Post by Vikash Thakare
    user_Vikash Thakare
    Vikash Thakare
    पारोळा, जळगाव, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    1
    Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    user_तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    Social services organisation चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • जामनेर
    1
    जामनेर
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Salesperson सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.