भाजपची सत्ता... तरीही कामगारांसाठी निवेदन! धाराशिव नगर परिषदेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपच आक्रमक भाजपची सत्ता... तरीही कामगारांसाठी निवेदन! धाराशिव नगर परिषदेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपच आक्रमक धाराशिव | प्रतिनिधी धाराशिव नगर परिषदेत भाजपची सत्ता असताना त्याच पक्षाच्या शहर उपाध्यक्षांनी कंत्राटी कामगारांच्या किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा लाभांसाठी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भारतीय जनता पार्टीचे धाराशिव शहर उपाध्यक्ष स्वप्नील सुनिलराव शिंगाडे यांनी नगर परिषदेत कार्यरत असलेल्या अकुशल व कुशल कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार मानधन मिळावे, तसेच भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) आणि विमा (इन्शुरन्स) यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ तातडीने लागू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगर परिषदेतील अनेक कंत्राटी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. शासनाने वेळोवेळी किमान वेतनात वाढ करण्याबाबत परिपत्रके जारी केली असतानाही त्याचा लाभ अनेक कामगारांना मिळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे किमान वेतन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून थकीत फरकासह योग्य मानधन देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सर्व पात्र कंत्राटी कामगारांना पी.एफ., विमा आणि इतर कायदेशीर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ नियमितपणे मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. कामगारांचे आर्थिक व सामाजिक संरक्षण अधिक भक्कम व्हावे आणि त्यांच्या कुटुंबांना सुरक्षिततेची हमी मिळावी, हा या निवेदनामागील उद्देश असल्याचे शिंगाडे यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, नगर परिषदेत भाजपचीच सत्ता असताना त्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याला कामगारांच्या मूलभूत हक्कांसाठी निवेदन द्यावे लागल्याने नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे कंत्राटी कामगारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

- भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा2
- हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०१ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०२ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०३ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०४ ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण) रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता. दृश्यमानता कमी होण्याची शक्यता. कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान. असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान. स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना. विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे: नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. सर्वसाधारण सूचना जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात: प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी. प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे. पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे. धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात: मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये. विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत. हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे. भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे. नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे. सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे. भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे. वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे. कृषी सल्ला उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा. खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी. मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी. भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.1
- *बद्रीनाथ में चोरी करने वाले के पास मिला सोना-चांदी:* आज खत्म हो रही रिमांड; PA ने घर में छिपाई थी चांदी की मूर्ति-विदेशी करेंसी बद्रीनाथ धाम के बहुचर्चित चढ़ावा चोरी मामले में मुख्य आरोपी प्रमोद नौटियाल की 4 दिनों की पुलिस कस्टडी रिमांड आज (31 जुलाई 2026) समाप्त हो रही है। चमोली पुलिस की विशेष जांच टीम (SIT) ने रिमांड के दौरान आरोपी के बद्रीनाथ और देहरादून स्थित ठिकानों पर ताबड़तोड़ छापेमारी कर भारी मात्रा में चोरी का सामान और संपत्तियों के दस्तावेज बरामद किए हैं।छापेमारी में बरामद हुआ 'खजाना'बद्री-केदार मंदिर समिति (BKTC) के अध्यक्ष के पूर्व निजी सहायक (PA) प्रमोद नौटियाल के पास से मिली सामग्रियां इस प्रकार हैं:मूर्तियां और धार्मिक वस्तुएं: बद्रीनाथ स्थित नीलकंठ वीवीआईपी गेस्ट हाउस के सरकारी आवास से भगवान नारायण की एक चांदी की मूर्ति, चांदी का नाग और मंदिर का पवित्र शालिग्राम पत्थर बरामद हुआ है।विदेशी और भारतीय करेंसी: तलाशी में 500-500 रुपये के नोटों की गड्डियों के साथ 150 नोट नेपाली करेंसी (विदेशी मुद्रा) और चांदी के सिक्के मिले हैं। ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा1
- उपसंचालकांचा आदेश असतानाही शिक्षकांची नियुक्ती नाही? सामाजिक संघटनांचे निवेदन व मागणी नेकनूर येथील डी.एड महाविद्यालय येथे शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याचे निवेदन सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आले1
- मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* 📍 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल), सांगोला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* अभियानास सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद सोलापूर व मा.जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण *मा.श्री चेतनसिंह केदार सावंत* उपस्थित होते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित या शिबिराच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व शासकीय कामांशी संबंधित विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रकरणे एकाच छताखाली जलदगतीने मार्गी लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच *“शासन आपल्या दारी”* ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आमदर श्री बाबासाहेब देशमुख, नगरसेविका सुजाताताई केदार-सावंत, नगरसेविका तनुजाताई एरंडे, नगरसेविका शोभाताई फुले, नगरसेविका वैशालीताई झपके, नगरसेविका आशाताई यावलकर, नगरसेविका सिमाताई सरगर,सोमनाथ मोटे, प्रांतधिकारी माळी साहेब, तहसीलदार बाळूताई भागवत, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी साहेब, कृषी अधिकारी जाधव मॅडम, मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब इ आदी मान्यवर उपस्थित होते. KHABARDAR NEWS ✨ आवाज जनतेचा ✨ ━━━━━━━━━━━━━━━ 🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 🟨 संपर्क: दत्तात्रय पवार 📞 मो:80079136681
- ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.2
- चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.1