प्रसादनगर मधील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व सुशोभीकरण करण्यासाठी स प्रसादनगर मधील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व सुशोभीकरण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार - आप्पासाहेब ढूस, जिल्हा उपाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष देवळाली प्रवरा/प्रतिनिधी देवळाली प्रवरा शहरातील प्रसादनगर भागात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवून व येथील परिसराचे सुशोभीकरण करणे हे काम आपल्या सर्वांच्या अस्मितेचे असून ते पुर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी मंगळवार दि.१४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रसादनगर येथील पुतळ्याला अभिवादन करतांना सांगितले. प्रसंगी बोलताना ढूस म्हणाले की, ना विमान, ना हेलिकॉप्टर, ना हातात व्हाट्सॲप, ना सोबतीला मीडिया! तरीही गावकुसाबाहेरील शेवटच्या माणसापर्यंत ज्यांचा शब्द पोहोचला आणि ज्यांच्या शब्दाखातर हजारो वर्षांची गुलामगिरी झुगारून समाज ताठ मानेने उभा राहिला, अशा 'टाईम मॅनेजमेंट'च्या पलीकडील महामानवाची आज जयंती! केवळ ६५ वर्षांचे आयुष्य... त्यातली ३० वर्षे शिक्षणात गेली, उरलेल्या अवघ्या २५-३० वर्षांत त्यांनी २३ ग्रंथ लिहिले, वृत्तपत्रे चालवली, सत्याग्रह केले आणि या देशाला संविधान दिले. आज सगळी साधने असूनही आपण जिथे पोहोचू शकत नाही, तिथे बाबासाहेब आपल्या विचारांनी आणि कतृत्वाने काळजापर्यंत पोहोचले. अशा या प्रज्ञासूर्याला, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! करताना कित्येक वर्ष जुना व अर्धाकृती असलेला हा पुतळा पूर्णाकृती व्हावा व त्याभोवती सुशोभीकरण करावे अशी येथील जनतेची कित्येक दिवसांची मागणी आहे. प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आप्पासाहेब ढूस यांचे समवेत प्रभागातील नगरसेविका पल्लवी वैभव ढूस, नंदा ढूस, प्रहार च्या शहर उप अध्यक्ष अफसाना शेख, वंदना कांबळे, शहर संपर्क प्रमुख गणेश भालके व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना ढूस म्हणाले की, कित्येक वर्षांपासून स्थापना झालेल्या येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व सुशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. या बाबत सामाजिक न्याय विभाग व देवळाली प्रवरा नगरपरिषद यांचेकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. या कामास गती प्राप्त व्हावी यासाठी नगरपरिषदेचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जुन्या पुतळ्याच्या जागी नवीन, अधिक उंच व भव्य पुतळा उभारणी करणे.. तसेच परिसर सौंदर्यीकरण करणे.. त्यामध्ये पेव्हर ब्लॉक, बगीचा (लँडस्केपिंग), आणि आकर्षक विद्युत रोषणाई करणे. पुतळा व परिसराच्या रक्षणासाठी मजबुत सुरक्षा भिंत किंवा कुंपण घालणे.. परिसरामध्ये महामानवांचे विचार दर्शवणारे फलक किंवा स्मारक उभारणे आदी विविध कामांची मागणी करून आम्ही आमच्या शहराची अस्मिता उंचावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ढूस यांनी बोलताना सांगितले.

- 🚨 महत्त्वाचे आवाहन: वाढत्या तापमानापासून स्वतःचे संरक्षण करा! 🚨 जिल्ह्यामध्ये तापमानात सातत्याने वाढ होत असून, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ✅ नागरिकांनी काय काळजी घ्यावी? 🧢 उन्हात घराबाहेर पडताना डोक्यावर रुमाल बांधा किंवा टोपीचा आवर्जून वापर करा. 💧 शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी, ताक किंवा इतर द्रवपदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करा. 👨🌾 विशेष लक्ष द्या: गरोदर माता, शेतकरी, कामगार आणि आजारी व्यक्तींनी वाढत्या उन्हाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 🏥 प्रशासनाची तयारी: नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), ग्रामीण रुग्णालये (RH) आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये (SDH) 'कूल रूम्स' (Cool Rooms) तयार करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. ⚠️ लक्षात ठेवा : उष्णतेच्या लाटेमुळे (Heatwave) कोणताही त्रास किंवा लक्षणे जाणवल्यास अंगावर न काढता त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा आणि वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या! ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पोस्ट नक्की शेअर करा. #Ahilyanagar #HeatwaveAlert #SummerSafety #CollectorAppeal #StayHydrated #Maharashtra #DrPankajAshiya #PublicHealth #StayCool1
- येवल्याजवळ भीषण अपघात; डॉक्टर महिलेच्या प्रसंगावधामुळे दोघांचे प्राण वाचले नाशिक-संभाजीनगर महामार्गावर गवंडगाव शिवारात मालवाहू ट्रक आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या एका महिला डॉक्टरने दाखवलेल्या देवदूतकीमुळे दोन जखमींचे प्राण वाचले आहेत. सुरेश भाऊराव शिंदे (रा. सोयगाव, मालेगाव) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गवंडगाव फाट्याजवळ ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारमधील प्रवासी अडकून पडले होते. डॉक्टरांच्या 'सीपीआर'ने दिले जीवदान अपघात झाला त्याच वेळी नाशिकच्या प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. दिपाली चंद्रशेखर क्षत्रिय या त्या मार्गावरून जात होत्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. दोन जखमींची प्रकृती अत्यंत खालावलेली असताना डॉ.दिपाली क्षत्रिय यांनी त्यांना जागेवरच सीपीआर (CPR) दिला. त्यांच्या या तातडीच्या उपचारामुळे दोघांचे प्राण वाचले असून त्यांना पुढील उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद येवला तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. दिपाली चंद्रशेखर क्षत्रिय यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.1
- घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच1
- Post by Sominath Kolhe1
- Md Tayyab Zafar Best Speech ॥ Eid Milan Program ॥ Organized by Vanchit Bahujan Aghadi1
- सिल्लोड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम व्याख्यान, आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आमदार अब्दुल सत्तार यांनी भीम जयंतीच्या जनतेस शुभेच्छा दिल्या1
- छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. करण राधाकिसन जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला असून मुकुंदवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.1
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमात त्यांनी समता, न्याय व बंधुतेच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #सामाजिक_समता #अहिल्यानगर #समता_सप्ताह #प्रेरणादायी_विचार1