हिमायतनगरच्या राजकारणात खळबळ; नवनिर्वाचित नगरसेवकाची माहिती संशयास्पद असल्याचा आरोप. नगर पंचायत निवडणूक २०२५ मधील वॉर्ड क्रमांक १३ च्या एका नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीने निवडणूक आयोगाला दिलेली माहिती खोटी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कुरेश कॉन्फरन्सच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाला दिला इशारा उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती संशयास्पद असून प्रशासनाने याची सत्यता तत्काळ तपासावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. योग्य कारवाई न झाल्यास निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यांची होती उपस्थिती निवेदन देतेवेळी शेख इलियास शेख नबीसाब यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या आरोपामुळे शहरात सध्या राजकीय चर्चांना उधाण आले असून, प्रशासकीय चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Post by Sk Chand1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by M B B1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Today One Live1
- Post by Karan1
- क्षितिज पुरम” की GRAND OPENING : Skyline Builders & Developers का भव्य प्रोजेक्ट लॉन्च1
- Post by Sk Chand1