logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भारतीय आयुर्विमा महामंडळातील विजयकुमार शहाणे यांना सन्मानपूर्वक निरोप परभणी (प्रतिनिधी) – येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) परभणी शाखेतील कर्मचारी विजयकुमार अंबादासराव शहाणे (उच्च श्रेणी सहाय्यक) हे तब्बल ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि. ३१ मार्च २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवेनिमित्त शाखेच्या वतीने दि. १ एप्रिल रोजी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य व्यवस्थापक सायना पोपुलवार या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक विभाग व्यवस्थापक दिक्षित उपस्थित होते. यावेळी राजेंद्र कुलथे, उमेश भुजबळराव, शमशोदिन शेख, गौतम भुजबळ, बन्सीलाल संघई, स्वामी नरमला आदींनी आपल्या मनोगतातून शहाणे यांच्या कार्याचा गौरव केला. विमा कामगार संघटना, नांदेड विभागाचे अध्यक्ष कॉ. शमशोदिन शेख यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन शहाणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच परभणी शाखेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सय्यद निसार, गोपाळ गाडगे, सुधाकर शेळके, व्यास, जाकेर शेख, रफिक शेख, पंडित लोकडे, संतोष कोडगिरकर, रमेश दांडगे, शिवसांब समशेटे, लोलगे, माधव वाघ, भोंडवे, नरेश मुळे, सुनील पेडगावकर, किरण कुलथे, विठ्ठल कदम, श्रीधर सरपे, बन्सीलाल शिंदे, कैलास टाक आदींनी परिश्रम घेतले. दादाराव शिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला कर्मचारी, अधिकारी, विकास अधिकारी, विमा प्रतिनिधी तसेच आयुर्विमा महामंडळाचे पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

6 hrs ago
user_Kapil Ashokrao Shinde
Kapil Ashokrao Shinde
मानवत, परभणी, महाराष्ट्र•
6 hrs ago
f1911a5b-c0fd-4463-8c6c-5e43e4c57c3b

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धावत्या ऑटोने घेतला पेट परभणीच्या वसमत रोडवरील घटना...
    1
    धावत्या ऑटोने घेतला पेट
परभणीच्या वसमत
रोडवरील घटना...
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • परभणी शहरातील वसमत रोडवर पेट घेतलेला ऑटो आगीत जळून खाक
    1
    परभणी शहरातील वसमत रोडवर पेट घेतलेला ऑटो आगीत जळून खाक
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    18 hrs ago
  • समृद्धी महामार्ग भीषण अपघात हृदयद्रावक व्हिडिओ - मृतांची संख्या आठवर... जालना जिल्ह्यातील जामवाडी शिवारात समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात ७ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता, तर ४ महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. दरम्यान, जखमींपैकी आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता ८ झाली असल्याची माहिती सूत्रांनी रात्री उशिरा दिली.
    1
    समृद्धी महामार्ग भीषण अपघात हृदयद्रावक  व्हिडिओ - मृतांची संख्या आठवर...
जालना जिल्ह्यातील जामवाडी शिवारात समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात ७ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता, तर ४ महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. दरम्यान, जखमींपैकी आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता ८ झाली असल्याची माहिती सूत्रांनी रात्री उशिरा दिली.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Balaji Vedpathak
    1
    Post by Balaji Vedpathak
    user_Balaji Vedpathak
    Balaji Vedpathak
    Voice of people केज, बीड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिलांचा जागीच मृत्यू, ३ जखमी.. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली
    1
    समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिलांचा जागीच मृत्यू, ३ जखमी..
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 min ago
  • ___ जिल्हाधिकारी श्री.विवेक जॉन्सन यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू असून, आतापर्यंत ५८४५ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या पैकी प्रतिनिधिक स्वरूपात १० कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पुढील तीन महिन्यांत सर्व उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील सर्व उसतोड कामगारांनी स्थानिक स्तरावर संबंधित संस्थेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    ___
जिल्हाधिकारी श्री.विवेक जॉन्सन यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू असून, आतापर्यंत ५८४५ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या पैकी प्रतिनिधिक स्वरूपात १० कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पुढील तीन महिन्यांत सर्व उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील सर्व उसतोड कामगारांनी स्थानिक स्तरावर संबंधित संस्थेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • विठाबाई नारायणगावकर तमाशा महिला कलावंताना जबर मारहाण.घारगाव पोलिस स्टेशनला कलावंत आक्रमक.
    1
    विठाबाई नारायणगावकर तमाशा महिला कलावंताना जबर मारहाण.घारगाव पोलिस स्टेशनला कलावंत आक्रमक.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • भाजपा स्थापना दिवस व SIR मुद्द्यावर महत्त्वपूर्ण बैठक भाजप संघटनमंत्री संजय कौडगे यांचे मार्गदर्शन
    1
    भाजपा स्थापना दिवस व SIR मुद्द्यावर महत्त्वपूर्ण बैठक भाजप संघटनमंत्री संजय कौडगे यांचे मार्गदर्शन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.