logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे समता सप्ताहात अभिवादन व स्वाभिमान मेळावा उत्साहात संपन्न जळगाव, : “समाजातील असमानता दूर करण्यासाठी संविधानाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे,उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त चित्रकार तथा लेखक राजू बाविस्कर, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त राकेश महाजन, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, सहायक आयुक्त योगेश पाटील, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, विशेष अधिकारी, अमोल कुलकर्णी, कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री घुगे म्हणाले,भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, पण त्यात असमानताही आहे. ही असमानता दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा मार्गच आपल्याला तारू शकतो. युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी सोशल मीडियाच्या युगातही सखोल अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. बाबासाहेबांचे अर्थशास्त्र, कामगार कायदे तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापनेतील योगदान नमूद करत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसतीगृहाच्या अंकिता गजरे या विद्यार्थिनीने उत्कृष्ट पणे पोवाडा सादर केल्याबद्दल तीचे कौतुक करत तरुणांमधील कला व सामाजिक जाणीवेचे स्वागत केले. तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजू बाविस्कर यांच्या यशाचा उल्लेख करत जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. महापौर दीपमाला काळे यांनी संविधानामुळे सर्वसामान्य नागरिकांना समान संधी मिळाल्याचे नमूद करत, विकासासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे सांगितले. शेतीक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान ए.आय स्वीकारण्याचे शेतकऱ्यांना त्यांनी आवाहनही केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नायर आपल्या मनोगत म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य प्रत्येकाने आत्मसात करावे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही चार महत्त्वाची मुल्ये आपण नेहमी लक्षात ठेवून अंगीकारली पाहिजे असे त्यांनी सांगितले. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजू बाविस्कर यांनी आपल्या मनोगतात वंचित समाजाच्या वेदना, दारिद्र्य आणि सामाजिक विषमतेचे वास्तव अधोरेखित केले. आपल्या लेखन व चित्रकलेतून उपेक्षित घटकांचे जीवन मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत त्यांनी समाजाने अधिक संवेदनशील होण्याची गरज व्यक्त केली. शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्यावर भर देत, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ज्ञानाच्या मार्गावर चालण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या साहित्याला मिळालेला सन्मान हा वैयक्तिक नसून संपूर्ण समाजाचा आहे, तसेच हा गौरव जळगाव जिल्ह्याचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, “मानवी हक्काचे प्रतीक चवदार तळे सत्याग्रह” या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले, चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठीचा लढा नसून मानवी सन्मान व हक्कांसाठीचा संघर्ष असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेण्यासाठी त्यांच्या लेखनाचा सखोल अभ्यास आवश्यक असून केवळ जयंती साजरी करून थांबणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या उदाहरणातून सामाजिक समतेचा संदेश देत ते म्हणाले, भारताची तत्त्वज्ञान परंपरा ही सर्वांना समान दर्जा देणारी असून प्रत्येकाने डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार करून समता, बंधुता व मानवी हक्कांची अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी यांनी “कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची नवी लाट” या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले, शेतीकडे उद्योजकतेच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी महाविस्तार एआय ॲपचा वापर करून शेती विषयक माहिती उपलब्ध करून द्यावी, दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेची तसेच विविध शासकीय योजनांची माहिती त्यांनी दिली. तरुणांनी शेती व उद्योग क्षेत्रात संधी शोधून उद्योजक बनावे, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त श्री पाटील यांनी समता सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली व कार्यक्रम आयोजनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, यांच्या प्रतीमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील पात्र वारसांना शासकीय,निमशासकीय नोकरीचे नियुक्ती आदेशांचे वाटप तसेच समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे व विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. समाज कल्याण कार्यातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हर्षल पाटील यांनी केले. कार्यक्रमाला विविध पुरस्कार्थी, सबळीकरण योजनेचे लाभार्थी तसेच जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी अमोल कुलकर्णी यांनी केले.

on 17 April
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
on 17 April
a35bba29-f8bb-4059-94e9-3fb9203ed44c

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 🗒️ विषय: डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींपैकी शरद कळस्कर यांना आज मुंबई उच्च न्यायालय जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधान, अधिवक्ता शुभदा खोत, अधिवक्ता सिद्धविद्या, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, तसेच अन्य अधिवक्त्यांनी प्रभावी बाजू मांडत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
    1
    🗒️ विषय: डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींपैकी शरद कळस्कर यांना आज मुंबई उच्च न्यायालय जामीन मंजूर केला आहे.
सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधान, अधिवक्ता शुभदा खोत, अधिवक्ता सिद्धविद्या, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, तसेच अन्य अधिवक्त्यांनी प्रभावी बाजू मांडत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • "उष्माघाताने फळविक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यात हळहळ" शासनाने तात्काळ मदत करावी पाचोरा काँग्रेसची मागणी पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या आनंद नथ्थु भोई (वय 32) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोई हे दररोजप्रमाणे चौकात काकडी विक्री करत होते. सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने प्रचंड उकाडा आणि कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवसभर उन्हात काम करताना त्यांनी डोक्यावर कोणतेही संरक्षण (टोपी, अंगावर कापड) घेतले नव्हते. परिणामी त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच, आनंद भोई हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही सोमवंशी यांनी केली आहे. मयताच्या पश्चात विधवा आई, पत्नी आणि तीन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
    1
    "उष्माघाताने फळविक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यात हळहळ" शासनाने तात्काळ मदत करावी पाचोरा काँग्रेसची मागणी 
पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या आनंद नथ्थु भोई (वय 32) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोई हे दररोजप्रमाणे चौकात काकडी विक्री करत होते. सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने प्रचंड उकाडा आणि कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवसभर उन्हात काम करताना त्यांनी डोक्यावर कोणतेही संरक्षण (टोपी, अंगावर कापड) घेतले नव्हते. परिणामी त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच, आनंद भोई हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही सोमवंशी यांनी केली आहे.
मयताच्या पश्चात विधवा आई, पत्नी आणि तीन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    7 hrs ago
  • राजकीय भूकंप! बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश ⚡ मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत Bacchu Kadu यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा ‘गेमचेंजर’ मानला जात आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांनी “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी आणि विकासाच्या कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतला,” असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांचे स्वागत करत “त्यांच्या येण्याने पक्ष अधिक बळकट होईल,” असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, अपंग आणि वंचित घटकांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात शिंदे गटाला मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या निर्णयावर जोरदार टीका केली असून “ही केवळ सत्तेसाठीची राजकीय चाल आहे,” असा आरोप केला आहे. मात्र शिंदे गटाने या प्रवेशाचे स्वागत करत “राजकारणात नवे समीकरण तयार होईल,” असा दावा केला आहे. 👉 या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
    1
    राजकीय भूकंप! बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश ⚡
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत Bacchu Kadu यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा ‘गेमचेंजर’ मानला जात आहे.
मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांनी “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी आणि विकासाच्या कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतला,” असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांचे स्वागत करत “त्यांच्या येण्याने पक्ष अधिक बळकट होईल,” असा विश्वास व्यक्त केला.
शेतकरी, अपंग आणि वंचित घटकांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात शिंदे गटाला मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांनी या निर्णयावर जोरदार टीका केली असून “ही केवळ सत्तेसाठीची राजकीय चाल आहे,” असा आरोप केला आहे. मात्र शिंदे गटाने या प्रवेशाचे स्वागत करत “राजकारणात नवे समीकरण तयार होईल,” असा दावा केला आहे.
👉 या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • धुळे जिल्ह्यातील निजामपूर (ता. साक्री) पोलिसांनी अपहरण प्रकरणात मोठी कारवाई करत मुख्य संशयितासह अन्य दोन जणांना गोव्यातून अटक केली आहे. या कारवाईत पीडित अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघा आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
    1
    धुळे जिल्ह्यातील निजामपूर (ता. साक्री) पोलिसांनी अपहरण प्रकरणात मोठी कारवाई करत मुख्य संशयितासह अन्य दोन जणांना गोव्यातून अटक केली आहे. या कारवाईत पीडित अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघा आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Mushraf Tadvi
    1
    Post by Mushraf Tadvi
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Physiotherapist सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया
    1
    तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • बुलढाणा जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन.!!
    1
    बुलढाणा
जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन.!!
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • 🎤 वक्ता : अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकरजी, (मुंबई उच्च न्यायालय) राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
    1
    🎤 वक्ता : अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकरजी, (मुंबई उच्च न्यायालय) राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.