गोल्डन रोटरी पिंकेथॉन 2026’ला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद; स्वच्छ व हरित तळेगावासाठी एकजूट महिला सक्षमीकरण, आरोग्य जागृती आणि स्वच्छतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी तळेगाव दाभाडे शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘गोल्डन रोटरी पिंकेथॉन 2026’ या उपक्रमाला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गोल्डन रोटरी क्लबच्या वतीने आयोजित या कार्यक्रमातून महिला सक्षमीकरण, आरोग्य जागृती आणि स्वच्छतेचा प्रभावी संदेश देण्यात आला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत या उपक्रमाला उत्साहाने प्रतिसाद दिला. कार्यक्रमादरम्यान नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी “स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव आणि हरित तळेगाव” घडवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला महिलांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहराच्या विकासात सक्रिय भूमिका निभावण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून जीवनशैलीचा भाग बनवण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. या पिंकेथॉनच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. विविध उपक्रमांद्वारे महिलांना फिटनेस, मानसिक आरोग्य आणि स्वावलंबनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. सिने अभिनेत्री प्रियंका हांडे यांनी तळेगावातील महिलांची आरोग्याविषयीची जागरूकता पाहून समाधान व्यक्त करत त्यांच्या सहभागाचे कौतुक केले. कार्यक्रमाला नगरसेविका संगीता खळदे, आशा भेगडे, शैलजा काळोखे तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष परदेशी, प्रकल्प प्रमुख डॉ. धनश्री काळे, डिस्ट्रिक्ट टीममधील दीपक फल्ले, किरण ओसवाल, दिशा वाईकर, मेधा शिंदे, सुजाता देव आणि कविता खोल्लम यांची उपस्थिती लाभली. रोटरी डिस्ट्रिक्टचे डीजी चारुकशोत्री यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांची समाजात मोठी गरज असल्याचे अधोरेखित केले कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी २० लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. संकेत सारीच्या मानाच्या पैठणीचे बक्षीस सुरेखा रुपनवर आणि श्रेया बाविस्कर यांनी जिंकले. तसेच चिखले एक्वा फिल्टरचे बक्षीस अमृता पाटील यांना, तर साई कम्युनिकेशनच्या भेटवस्तू स्वागती घारे, सभागती घारे आणि सुषमा खोत यांना मिळाल्या. विजेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व मान्यवरांनी आणि सहभागी सदस्यांनी स्वच्छतेचा आदर्श घालत “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश दिला. हा उपक्रम केवळ स्पर्धा न राहता सामाजिक परिवर्तनाची चळवळ ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले, तर प्रशांत ताये यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन रोट्रॅक्टचे अध्यक्ष ललित देसले आणि क्लबच्या सर्व सदस्यांनी केले.

- अतिक्रम विभागांच्या बीटनिरक्षकाच काम फक्त नोटीस देणंच नव्हे .कारवाई करणे देखील त्यांचे कर्तव्य आहे1
- वरुडमध्ये शेतातील नाल्यात अर्धवट जळालेला अज्ञात मृतदेह सापडला1
- पिंपरी चिंचवड : - हिंजवडीच्या ब्लु रिच सोसायटी आणि परिसरात मोठी गारपीट झाली. या गारपिटीची दृश्य इथल्या रहिवाश्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. अतिशय विलोभनीय अशी ही दृश्य आहेत, जणू आपण बर्फाळ प्रदेशात आहोत, असं वाटावं... #हिंजवडी #पिंपरीचिंचवड #गारपीट #अवकाळीपाऊस #हवामानबदल #निसर्गचमत्कार #व्हायरलव्हिडिओ #ब्लुरिचसोसायटी #पुणेन्यूज #गारांचा_वर्षाव #Hinjewadi #PimpriChinchwad #Hailstorm #UnseasonalRain #WeatherUpdate #Nature #ViralVideo #BlueRidge #PuneNews #ClimateChange3
- पुण्यात पावसाचा तडाका पुणेकर गाराठले भर उन्हात पावसाचा तडाका1
- Post by Kishor subhash jadhav1
- विक्रम शिंदे / भोर दि.30 भोर शहराला अवकाळी पावसाने झोडपले.बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नदी नाल्याचे स्वरूप.पावसाच्या पाण्यामुळे अनंत नगर भोर येथे ये जा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता आणि ड्रेन लाईन नगरपालिकेने करून दिलं असतं तर बर झालं असतं. असे नागरिकांचे म्हणणे. वस्ती साठी पैसे आले होते त्यानुत काम करता आले असते पण तसे न करता त्यावेळी दुसरी कडील रस्ता केला गेला. नागरिकाची संतप्त प्रतिकिया .1
- शिरूर तालुक्यातील वरुडे-धामारी रोडवर भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळून खड्ड्यात कोसळली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे.1
- आठवले साहेबांच्या आदेशाने निवडणुकीत काम केलं 'आरपीआय वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख1