logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मेहकर येथे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन केल्याप्रकरणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह एकूण २० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ही कारवाई झाल्याचा आणि सरकारच्या दडपशाहीचा संघटनेने तीव्र निषेध केला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकरी कर्जमाफी व इतर गंभीर प्रश्नांसाठी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी १६ जून रोजी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘भीक मागो’ आंदोलन आयोजित केले होते. कार्यकर्त्यांनी शहरातील विविध चौकांमधून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढून शासनाच्या धोरणांविरोधात निषेध नोंदवला. यानंतर, प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मते, हे आंदोलन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि लोकशाही मार्गाने करण्यात आले होते. परंतु, आंदोलनामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली म्हणून सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना, क्रांतिकारी शेतकरी संघटना, जिल्हा बुलढाणाचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी फासावर जायचे काम पडले तरी आपण तयार आहोत. हजारो गुन्हे अंगावर झाले तरी चालतील; पण शेतकरी कर्जमाफी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि जाचक अटींच्या विरोधात न्याय मागणे गुन्हा असेल, तर तो गुन्हा मान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. टाले यांनी पुढे सांगितले की, शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संघटनेने स्पष्ट केले आहे की, अशा कारवायांमुळे आंदोलन मागे हटणार नाही, उलट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल.

3 hrs ago
user_गजानन कडुजी राऊत
गजानन कडुजी राऊत
Graphic designer मेहकर, बुलढाणा, महाराष्ट्र•
3 hrs ago
fe75df05-0f3b-4a7c-9958-0c2d4ceb00dd

मेहकर येथे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन केल्याप्रकरणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह एकूण २० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ही कारवाई झाल्याचा आणि सरकारच्या दडपशाहीचा संघटनेने तीव्र निषेध केला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकरी कर्जमाफी व इतर गंभीर प्रश्नांसाठी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी १६ जून रोजी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘भीक मागो’ आंदोलन आयोजित केले होते. कार्यकर्त्यांनी शहरातील विविध चौकांमधून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढून शासनाच्या धोरणांविरोधात निषेध नोंदवला. यानंतर, प्रतिबंधात्मक

a25b6522-259f-4899-8daa-be3b17713d15

आदेशांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मते, हे आंदोलन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि लोकशाही मार्गाने करण्यात आले होते. परंतु, आंदोलनामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली म्हणून सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना, क्रांतिकारी शेतकरी संघटना, जिल्हा बुलढाणाचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी फासावर जायचे काम पडले तरी आपण तयार आहोत. हजारो गुन्हे अंगावर झाले तरी चालतील; पण शेतकरी कर्जमाफी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात

ae8cab3f-eb7e-43ee-8181-0df14ed55565

आवाज उठवणे आणि जाचक अटींच्या विरोधात न्याय मागणे गुन्हा असेल, तर तो गुन्हा मान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. टाले यांनी पुढे सांगितले की, शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संघटनेने स्पष्ट केले आहे की, अशा कारवायांमुळे आंदोलन मागे हटणार नाही, उलट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या पायी वारीचे हे ५७ वे वर्ष असून, यामध्ये ७०० हून अधिक वारकरी भगव्या पताका घेऊन सहभागी झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात संत गजानन महाराजांची पालखी आज सकाळी पंढरपूरकडे निघाली. शेगाव ते पंढरपूर असा सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास ही पालखी ३३ दिवसांत पूर्ण करेल आणि २३ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. त्यानंतर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होऊन ही पालखी २८ जुलैपर्यंत पंढरपुरातच मुक्काम करणार आहे. या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आज लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले होते, ज्यामुळे संपूर्ण संत नगरी 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. पंढरपुरातील मुक्कामानंतर, पालखी शेगावसाठी परतीच्या प्रवासाला निघेल.
    4
    विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या पायी वारीचे हे ५७ वे वर्ष असून, यामध्ये ७०० हून अधिक वारकरी भगव्या पताका घेऊन सहभागी झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात संत गजानन महाराजांची पालखी आज सकाळी पंढरपूरकडे निघाली.

शेगाव ते पंढरपूर असा सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास ही पालखी ३३ दिवसांत पूर्ण करेल आणि २३ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. त्यानंतर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होऊन ही पालखी २८ जुलैपर्यंत पंढरपुरातच मुक्काम करणार आहे.

या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आज लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले होते, ज्यामुळे संपूर्ण संत नगरी 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. पंढरपुरातील मुक्कामानंतर, पालखी शेगावसाठी परतीच्या प्रवासाला निघेल.
    user_गजानन कडुजी राऊत
    गजानन कडुजी राऊत
    Graphic designer मेहकर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • दामिनी पथक महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी आणि टवाळखोरांना योग्य धडा शिकवण्यासाठी नेहमीच तत्पर असते.
    1
    दामिनी पथक महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी आणि टवाळखोरांना योग्य धडा शिकवण्यासाठी नेहमीच तत्पर असते.
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    Salesperson चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
    1
    राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    3 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यात अन्न व औषधी विभाग आता ॲक्शन मोडवर आला आहे. या विभागाने जिल्ह्यातील दोन प्रस्ताव मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत सादर केले आहेत.
    1
    बुलढाणा जिल्ह्यात अन्न व औषधी विभाग आता ॲक्शन मोडवर आला आहे. या विभागाने जिल्ह्यातील दोन प्रस्ताव मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत सादर केले आहेत.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • परभणी शहर एका भीषण घटनेने हादरले आहे. परभणीतील यशवाडी येथील मारुती मंदिरात एक मोठी दुर्घटना घडली असून, या दुर्घटनेत मारुती मंदिराचे छत कोसळले.
    1
    परभणी शहर एका भीषण घटनेने हादरले आहे. परभणीतील यशवाडी येथील मारुती मंदिरात एक मोठी दुर्घटना घडली असून, या दुर्घटनेत मारुती मंदिराचे छत कोसळले.
    user_Fitcoach Yunus Shaikh
    Fitcoach Yunus Shaikh
    Fitness Trainer Jafrabad, Jalna•
    14 hrs ago
  • मंत्रालयात सुरू असलेल्या उपोषणाच्या दणक्यामुळे अखेर एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडीमुळे उपोषणकर्त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसत आहे, ज्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे.
    1
    मंत्रालयात सुरू असलेल्या उपोषणाच्या दणक्यामुळे अखेर एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडीमुळे उपोषणकर्त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसत आहे, ज्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे.
    user_ZM news official
    ZM news official
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) छत्रपती संभाजीनगर महानगर शाखेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रादेशिक कार्यालयात साखळी उपोषण केले. अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते, कारण उन्हाळी सत्र संपत आले असतानाही वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या उपोषणात सुकन्या बावस्कर, श्रीया महाजन, श्रावणी साबळे, रोहित पवार, शुभम भोसले आणि ओम पवार यांनी सहभाग घेतला. अभाविपच्या या आंदोलनाची विद्यापीठ प्रशासनाने त्वरित दखल घेतली. अवघ्या तीन तासांत अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या दोन्ही अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त झाले. वेळापत्रक जाहीर होताच, विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. ब्रिजेश अय्यर यांच्या हस्ते फलाहार घेऊन आंदोलनाची यशस्वीरित्या सांगता करण्यात आली. यावेळी अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुकन्या बावस्कर यांनी स्पष्ट केले की, उत्तम शिक्षण आणि वेळेवर परीक्षा हे विद्यार्थ्यांचे मूलभूत हक्क असून, अभाविप नेहमीच विद्यार्थी हितासाठी आग्रही राहिली आहे आणि भविष्यातही विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करत राहील.
    1
    अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) छत्रपती संभाजीनगर महानगर शाखेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रादेशिक कार्यालयात साखळी उपोषण केले. अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते, कारण उन्हाळी सत्र संपत आले असतानाही वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या उपोषणात सुकन्या बावस्कर, श्रीया महाजन, श्रावणी साबळे, रोहित पवार, शुभम भोसले आणि ओम पवार यांनी सहभाग घेतला.

अभाविपच्या या आंदोलनाची विद्यापीठ प्रशासनाने त्वरित दखल घेतली. अवघ्या तीन तासांत अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या दोन्ही अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त झाले. वेळापत्रक जाहीर होताच, विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. ब्रिजेश अय्यर यांच्या हस्ते फलाहार घेऊन आंदोलनाची यशस्वीरित्या सांगता करण्यात आली. यावेळी अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुकन्या बावस्कर यांनी स्पष्ट केले की, उत्तम शिक्षण आणि वेळेवर परीक्षा हे विद्यार्थ्यांचे मूलभूत हक्क असून, अभाविप नेहमीच विद्यार्थी हितासाठी आग्रही राहिली आहे आणि भविष्यातही विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करत राहील.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • आज, २१ जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली आणि खामगाव या तीन तालुक्यांमधील एकूण १२ केंद्रांवर नीट (NEET) परीक्षेची पुनरावृत्ती (Re-test) शांततेत पार पडली. प्रशासनाने या महत्त्वपूर्ण परीक्षेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती, ज्यामुळे कोणताही गैरप्रकार टाळता यावा आणि कायदे-सुव्यवस्था राखली जावी. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी प्रशासनाने विशेष रणनीती आखली होती, ज्या अंतर्गत अत्यंत कडक सुरक्षा उपाय योजण्यात आले. सुरक्षेच्या तयारीची खात्री करण्यासाठी कालच सर्व केंद्रांवर मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पडली होती. खामगाव शहरातील जे.बी. मेहता, अंजुमन हायस्कूल आणि नॅशनल हायस्कूल या तीन प्रमुख परीक्षा केंद्रांवर १०८० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश करताना केवळ ओळखपत्र आणि पाण्याची बाटली सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली होती, तर इतर कोणत्याही वस्तूंना कडक मनाई करण्यात आली होती. दरम्यान, मागील परीक्षेचा मानसिक ताण सहन केल्यानंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागल्याने पालकांमध्ये काही प्रमाणात नाराजी आणि चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. खबरदारी म्हणून, परीक्षा परिसरातील झेरॉक्स सेंटर आणि सायबर कॅफे देखील बंद ठेवण्यात आले होते.
    1
    आज, २१ जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली आणि खामगाव या तीन तालुक्यांमधील एकूण १२ केंद्रांवर नीट (NEET) परीक्षेची पुनरावृत्ती (Re-test) शांततेत पार पडली. प्रशासनाने या महत्त्वपूर्ण परीक्षेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती, ज्यामुळे कोणताही गैरप्रकार टाळता यावा आणि कायदे-सुव्यवस्था राखली जावी.

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी प्रशासनाने विशेष रणनीती आखली होती, ज्या अंतर्गत अत्यंत कडक सुरक्षा उपाय योजण्यात आले. सुरक्षेच्या तयारीची खात्री करण्यासाठी कालच सर्व केंद्रांवर मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पडली होती. खामगाव शहरातील जे.बी. मेहता, अंजुमन हायस्कूल आणि नॅशनल हायस्कूल या तीन प्रमुख परीक्षा केंद्रांवर १०८० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश करताना केवळ ओळखपत्र आणि पाण्याची बाटली सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली होती, तर इतर कोणत्याही वस्तूंना कडक मनाई करण्यात आली होती.

दरम्यान, मागील परीक्षेचा मानसिक ताण सहन केल्यानंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागल्याने पालकांमध्ये काही प्रमाणात नाराजी आणि चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. खबरदारी म्हणून, परीक्षा परिसरातील झेरॉक्स सेंटर आणि सायबर कॅफे देखील बंद ठेवण्यात आले होते.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.