जिल्ह्यातील कुख्यात टोळीवर हद्दपारीची कडक कारवाई – कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा कठोर निर्णय. लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील नागरिकांचे जीवन, मालमत्ता व सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव कटिबद्ध असून, समाजात दहशत निर्माण करणाऱ्या व सतत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या कलम ५५ अंतर्गत लातूर येथील एका कुख्यात टोळीविरुद्ध हद्दपारीचा आदेश पोलीस अधीक्षक, लातूर अमोल तांबे यांनी निर्गमित केला आहे. हद्दपार करण्यात आलेले इसम पुढीलप्रमाणे आहेत ईश्वर गजेंद्र कांबळे,( वय २३ वर्षे, रा. जय नगर, लातूर),विकास उर्फ विक्की गजेंद्र कांबळे, (वय २५ वर्षे, रा. जय नगर, लातूर), प्रफुल श्रीमंत गायकवाड, (वय २९ वर्षे, रा. सिद्धार्थ सोसायटी, लातूर).या तिन्ही इसमांविरुद्ध पोलीस स्टेशन विवेकानंद चौक, लातूर येथे जबरी चोरी, दरोडा, शस्त्राचा धाक दाखवून लूटमार, धमकी देणे, टोळी बनवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणे अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांचा गुन्हेगारी अभिलेख पाहता ते सातत्याने संघटित पद्धतीने गुन्हे करीत असून, त्यांच्या कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती, दहशत व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. या टोळीविरुद्ध यापूर्वी वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई (कलम १०७ सीआरपीसी, १२९ बीएनएसएस इ.) करण्यात आली होती. मात्र, या सर्व कारवायांनंतरही त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली दिसून आली नाही. उलट त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सातत्य व तीव्रता वाढलेली आढळून आली. त्यामुळे हे स्पष्ट झाले की, सामान्य कायदेशीर कारवाया त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यास अपुऱ्या ठरत आहेत. या टोळीविरुद्ध कोणीही उघडपणे तक्रार देण्यास धजावत नाही. कारण टोळीतील सदस्य तक्रारदारांना शारीरिक इजा, धमकी व मानसिक त्रास देतात. त्यामुळे नागरिक दहशतीखाली जीवन जगत असून, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आलेली होती. त्यांनी कायद्याचा अवमान केल्याचे व त्यांना कायद्याची भीती नसल्याचे स्पष्ट होत होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील व त्यांच्या टीम मधील पोलीस अंमलदार खुर्रम काझी, गणेश यादव, रवी गोंदकर, रणवीर देशमुख, सचिन राठोड, यशपाल कांबळे, धैर्यशील मुळे यांनी नमूद आरोपी विरुद्ध हद्दपारचा सविस्तर प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक लातूर यांच्याकडे पाठवण्यात आला होता. प्रस्तावामधील सर्व बाबींचा विचार करता, पोलीस अधीक्षक, लातूर यांनी सदर टोळी व तिच्या सदस्यांकडून भविष्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याची दाट शक्यता आहे. आगामी सण, उत्सव, निवडणुका व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करणे अत्यावश्यक असल्याने महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ चे कलम ५५ अंतर्गत सदर तिन्ही इसमांना लातूर जिल्हा,नांदेड जिल्ह्यातील लोहा, मुखेड, देगलूर तालुके, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, धाराशिव, उमरगा, कळंब तालुके, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका या सर्व हद्दीतून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसेच पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या पूर्वपरवानगी शिवाय हद्दपार क्षेत्रात प्रवेश करता येणार नाही. हद्दपारीच्या कालावधीत त्यांनी आपला निवासाचा पत्ता नजीकच्या पोलीस ठाण्यास कळविणे, दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हजेरी देणे, तसेच न्यायालयीन कामासाठी येताना पूर्वपरवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे. समाजातील सामान्य नागरिकांना सुरक्षिततेची भावना देण्यासाठी, कायद्याची अंमलबजावणी प्रभावी करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा गुन्हेगारी कृत्ये, दहशत, धमकी, लूटमार व संघटित गुन्हेगारी यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. लातूर पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव सज्ज असून, समाजविघातक प्रवृत्तीविरुद्ध अशाच प्रकारची कठोर आणि प्रभावी कारवाई भविष्यातही सुरू राहील.

- शेतकऱ्यांच्या कष्टाचे सोयाबीन पळवले !! एलसीबीने आरोपींना रंगेहात पकडले !! लातूर (ॲड.एल.पी. उगिले) शेतकऱ्यांनी मोठा कष्टाने ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिवस कष्ट करून शेतामध्ये पीक घ्यावे, आणि रास झाली की, चोरट्यांनी ते पळवावे. म्हणजे वर्षभराची मेहनत वाया गेली. अशी दुर्दैवी वेळ कधी कधी शेतकऱ्यावर येते. त्यांच्या मेहनतीचे फळ पळवले गेल्यामुळे शेतकऱ्यांचे स्वप्नच भंग होण्याची वेळ आलेली असते. अशावेळी मोठ्या कर्तबगारीने लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शेतकऱ्याच्या चोरीला गेलेल्या सोयाबीनच्या कट्ट्यासह तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जवळपास एक लाख 38 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. शेतकऱ्यासाठी शेतीचा माल चोरी झाली ही केवळ आर्थिक हानी नसून त्यांच्या कष्टावर झालेला अन्याय आहे. आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमूल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दखल घेत मालमत्ते विषय घडणाऱ्या विशेषतः शेतकऱ्यासंदर्भात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याचा छडा लावण्याच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निलंगा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पानचिंचोली पाटी परिसरातील हनुमंत वाडी ते निलंगा जाणाऱ्या रोडवरील मसलगाव शेत शिवारात चार ते पाचव्यक्ती चोरट्या पद्धतीने संशयितरित्या सोयाबीनचे कट्टे पांढऱ्या रंगाच्या पिकप वाहनात भरत आहेत. अशी माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांची चाहूल लागल्यामुळे संशयित इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने पथकातील अधिकारी व अंमलदारांनी प्रसंगावधान राखत, पाठलाग करून तीन व्यक्तींना ताब्यात घेतले. एक व्यक्ति मात्र पिकअप वाहन घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे दीपक तानाजी पवार (वय 27 वर्ष), नवनाथ छगन उर्फ अचित काळे (वय 25 वर्ष), संतोष सखाराम काळे (वय 23 वर्ष, सर्व रा. गोरोबा गल्ली तेर तालुका जिल्हा धाराशिव) यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, तपासा दरम्यान आरोपीने कबूल केले की, त्यांनी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी खरोसा जवळील सिंधी जवळगा गावातील शेत शिवारातून रात्रीच्या वेळी एकूण 40 कट्टे सोयाबीनची चोरी केली होती. तो चोरीचा माल लपवून ठेवला होता, आणि आता तो माल पिकप वाहनाद्वारे इतरत्र हलविण्याच्या तयारीत असताना ते पकडले गेले. या कारवाईत एकूण एक लाख 38 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये चोरीचे सोयाबीनचे कट्टे तसेच गुन्ह्यात वापरलेली एम एच 25 ए व्ही 4427 क्रमांकाची हिरो कंपनीची काळया रंगाची स्प्लेंडर मोटार सायकल यांचा समावेश आहे. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिकअप वाहनसह पसार झालेला आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल. अशी खात्री पोलीस पथकाने दिली आहे. ही कारवाई म्हणजे केवळ चोरीचा गुन्हा उघडकीस आणणे नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टाचे संरक्षण करणे, गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करणे, आणि समाजात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे, हे या कारवाईचे खरे उद्दिष्ट आहेत. लातूर पोलीस प्रशासनातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शेतमाल चोरी, अवैध वाहतूक किंवा कोणत्याही संशयास्पद हालचाली बाबत त्वरित नजीकच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधावा. नागरिकांचे सहकार्य, गुप्त माहिती देणाऱ्यांची भूमिका आणि पोलीस दलाची तत्परता या तिन्हींच्या समन्वयातूनच अशा मोठ्या गुन्ह्यांचा पडदाफास शक्य आहे. गुन्हेगार कितीही चालाख असला तरी, कायद्याच्या कचाट्यातून तो सुटू शकत नाही. हा ठाम संदेश देणारी ही कारवाई असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि समाजाच्या सुरक्षितते साठी लातूर पोलीस दल सदैव सज्ज आहे. हे सांगणारी आहे. या चोरीचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनी सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार नवनाथ हसबे, माधव बिलापट्टे, राजेश कंचे, तुराब पठाण, प्रशांत स्वामी, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रदीप स्वामी, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठ्ठेवाड, गणेश साठे, गोविंद भोसले, अंजली गायकवाड, शैलेश सुडे, हरी पतंगे, श्रीनिवास जांभळे यांच्या पथकाने यशस्वी करून दाखवली आहे. पिकअप घेऊन फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगळी पथके रवाना झाली आहेत. शेतकऱ्याचा माल शोधून दिल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.2
- तामसा येथे डॉक्टर बोंदरवाड यांचा पदोन्नती व बदली निमित्त सत्कार1
- 🗳️🚔 महानगरपालिका निवडणूक : पोलीस प्रशासन सज्ज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ डिसेंबर २०२५ पासून आचारसंहिता लागू असून 🗳️ १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान 📊 १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. शहरातील २० प्रभाग व ६०० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत, भयमुक्त व निपक्षपणे पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मतदानाच्या दिवशी सीसीटीव्ही, ड्रोन, व्हिडीओ कॅमेरे, तसेच १०३ वाहनांद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणतीही तक्रार असल्यास डायल-112 किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. ✋ कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. #नांदेडमहानगरपालिका #महानगरपालिका_निवडणूक #पोलीस_प्रशासन_सज्ज #भयमुक्त_निवडणूक #कडेकोट_बंदोबस्त VoteSafely Dial112 NandedPolice लोकशाहीचा_उत्सव https://www.instagram.com/reel/DTapsBIkgr4/?igsh=MXE0NXdzbWxxYWd3bw==1
- गलास या बोतल में पानी डालते समय गिरना आम समस्या है, लेकिन इसके पीछे साफ़ विज्ञान काम करता है। सही एंगल पर बर्तन झुकाने और ग्लास को पास रखने से हवा का गैप कम होता है, जिससे पानी की धार नियंत्रित रहती है। सतह तनाव और फ्लो रेट संतुलित होने पर पानी साफ़ तरीके से गिरता है। यह छोटा सा तरीका रोज़मर्रा की गंदगी से बचा सकता है। #ScienceHack #PhysicsTrick #LifeHacks #EverydayScience #FluidDynamics #SmartTips1
- महानगरपालिका के प्रभाग क्रमांक 9 में राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार गुट) के उम्मीदवारों का चुनाव प्रचार के उद्देश्य से एक सभा1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- बँक मॅनेजर वर दरोडा टाकल्या प्रकरणी तपास करण्यासाठी आरोपीस वसमत शहरात नेले असता अचानक वाहन बंद पडल्याने आरोपीस पायी चालत नेण्यात आले याप्रसंगी बघ्याची मोठी गर्दी झाली व दरोडे खोवरांवर कठोर कार्यवाही केल्यामुळे सामान्य नागरिकात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच दरोडेखोरांची दहशत सुद्धा संपुष्टात आली.1
- किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ येथे सामाजिक बहिष्कारांचे गंभीर प्रकरण.. एका कुटुंबावर आठ महिन्यापासून अ मानवी जाच..1