logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जळगावातील 'रिंग रोड' होणार हायटेक; पिंप्राळा रेल्वे पूल ते सिंधी कॉलनीपर्यंतची विद्युत यंत्रणा होणार भूमिगत! महापौरांचे ना. गिरीश महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र जळगाव : शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या आणि अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या पिंप्राळा रेल्वे ओव्हर ब्रीज ते सिंधी कॉलनी रिंग रोड परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. या रस्त्यावरील धोकादायक ठरणाऱ्या 'ओव्हर हेड' विद्युत तारा आणि खांब हटवून संपूर्ण यंत्रणा भूमिगत करण्यासाठी महापौर दिपमाला मनोज काळे यांनी पुढाकार घेतला आहे. या कामासाठी ४५ कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची मागणी त्यांनी राज्याचे मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे केली आहे. वाहतूक कोंडी फुटणार, अपघात टळणार जळगाव शहरात प्रवेश करताना पिंप्राळा आरओबी ते सिंधी कॉलनी हा रिंग रोड अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. सद्यस्थितीत या रस्त्याच्या मध्यभागी (सेंट्रल लाईन) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे खांब, रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) आणि उच्च व लघुदाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा येत असून अपघाताची भीतीही कायम असते. असे होणार फायदे रस्ता रुंदीकरण: विद्युत खांब भूमिगत झाल्यामुळे रस्त्याची प्रत्यक्ष रुंदी वाढणार असून वाहतूक सुलभ होईल. प्रखर प्रकाश व्यवस्था: यंत्रणा भूमिगत झाल्यावर रात्रीच्या वेळी वाहनधारकांसाठी अद्ययावत आणि प्रखर पथदिवे लावणे सोयीचे होईल. सौंदर्यीकरण: ओव्हर हेड वायर्सचे जाळे गायब झाल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडेल. ४५ कोटींचा निधी अपेक्षित महापौरांनी दिलेल्या पत्रानुसार, महावितरण कंपनीकडून या कामाचा प्राथमिक अंदाज घेतला असता, यासाठी सुमारे ४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जळगाव शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निधी विशेष अनुदान म्हणून उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती महापौरांनी पत्राद्वारे ना. गिरीश महाजन यांना केली आहे. यावेळी महापौर दीपमाला काळे यांचे प्रतिनिधी म्हणून मनोज काळे, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख, नंदकुमार अडवाणी आदी उपस्थित होते. "शहरातील मुख्य रिंग रोडवरील विद्युत यंत्रणा भूमिगत झाल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटेल आणि अपघातांचे प्रमाणही कमी होईल. शासन स्तरावरून या निधीसाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत." — दिपमाला मनोज काळे, महापौर, जळगाव शहर महानगरपालिका.

8 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
8 hrs ago
b7c5c560-c822-4414-81fe-c9c1a546552d

जळगावातील 'रिंग रोड' होणार हायटेक; पिंप्राळा रेल्वे पूल ते सिंधी कॉलनीपर्यंतची विद्युत यंत्रणा होणार भूमिगत! महापौरांचे ना. गिरीश महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र जळगाव : शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या आणि अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या पिंप्राळा रेल्वे ओव्हर ब्रीज ते सिंधी कॉलनी रिंग रोड परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. या रस्त्यावरील धोकादायक ठरणाऱ्या 'ओव्हर हेड' विद्युत तारा आणि खांब हटवून संपूर्ण यंत्रणा भूमिगत करण्यासाठी महापौर दिपमाला मनोज काळे यांनी पुढाकार घेतला आहे. या कामासाठी ४५ कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची मागणी त्यांनी राज्याचे मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे केली आहे. वाहतूक कोंडी फुटणार, अपघात टळणार जळगाव शहरात प्रवेश करताना पिंप्राळा आरओबी ते सिंधी कॉलनी हा रिंग रोड अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. सद्यस्थितीत या रस्त्याच्या मध्यभागी (सेंट्रल लाईन) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे खांब, रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) आणि उच्च व लघुदाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा येत असून अपघाताची भीतीही कायम असते. असे होणार फायदे रस्ता रुंदीकरण: विद्युत खांब भूमिगत झाल्यामुळे रस्त्याची प्रत्यक्ष रुंदी वाढणार असून वाहतूक सुलभ होईल. प्रखर प्रकाश व्यवस्था: यंत्रणा भूमिगत झाल्यावर रात्रीच्या वेळी वाहनधारकांसाठी अद्ययावत आणि प्रखर पथदिवे लावणे सोयीचे होईल. सौंदर्यीकरण: ओव्हर हेड वायर्सचे जाळे गायब झाल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडेल. ४५ कोटींचा निधी अपेक्षित महापौरांनी दिलेल्या पत्रानुसार, महावितरण कंपनीकडून या कामाचा प्राथमिक अंदाज घेतला असता, यासाठी सुमारे ४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जळगाव शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निधी विशेष अनुदान म्हणून उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती महापौरांनी पत्राद्वारे ना. गिरीश महाजन यांना केली आहे. यावेळी महापौर दीपमाला काळे यांचे प्रतिनिधी म्हणून मनोज काळे, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख, नंदकुमार अडवाणी आदी उपस्थित होते. "शहरातील मुख्य रिंग रोडवरील विद्युत यंत्रणा भूमिगत झाल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटेल आणि अपघातांचे प्रमाणही कमी होईल. शासन स्तरावरून या निधीसाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत." — दिपमाला मनोज काळे, महापौर, जळगाव शहर महानगरपालिका.

More news from Jalgaon and nearby areas
  • "उष्माघाताने फळविक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यात हळहळ" शासनाने तात्काळ मदत करावी पाचोरा काँग्रेसची मागणी पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या आनंद नथ्थु भोई (वय 32) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोई हे दररोजप्रमाणे चौकात काकडी विक्री करत होते. सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने प्रचंड उकाडा आणि कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवसभर उन्हात काम करताना त्यांनी डोक्यावर कोणतेही संरक्षण (टोपी, अंगावर कापड) घेतले नव्हते. परिणामी त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच, आनंद भोई हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही सोमवंशी यांनी केली आहे. मयताच्या पश्चात विधवा आई, पत्नी आणि तीन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
    1
    "उष्माघाताने फळविक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यात हळहळ" शासनाने तात्काळ मदत करावी पाचोरा काँग्रेसची मागणी 
पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या आनंद नथ्थु भोई (वय 32) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोई हे दररोजप्रमाणे चौकात काकडी विक्री करत होते. सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने प्रचंड उकाडा आणि कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवसभर उन्हात काम करताना त्यांनी डोक्यावर कोणतेही संरक्षण (टोपी, अंगावर कापड) घेतले नव्हते. परिणामी त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच, आनंद भोई हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही सोमवंशी यांनी केली आहे.
मयताच्या पश्चात विधवा आई, पत्नी आणि तीन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    18 hrs ago
  • धुळे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी कडक कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच त्या संदर्भात राजकीय स्तरावर बदलाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
    1
    धुळे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी कडक कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच त्या संदर्भात राजकीय स्तरावर बदलाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • राजकीय भूकंप! बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश ⚡ मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत Bacchu Kadu यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा ‘गेमचेंजर’ मानला जात आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांनी “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी आणि विकासाच्या कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतला,” असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांचे स्वागत करत “त्यांच्या येण्याने पक्ष अधिक बळकट होईल,” असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, अपंग आणि वंचित घटकांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात शिंदे गटाला मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या निर्णयावर जोरदार टीका केली असून “ही केवळ सत्तेसाठीची राजकीय चाल आहे,” असा आरोप केला आहे. मात्र शिंदे गटाने या प्रवेशाचे स्वागत करत “राजकारणात नवे समीकरण तयार होईल,” असा दावा केला आहे. 👉 या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
    1
    राजकीय भूकंप! बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश ⚡
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत Bacchu Kadu यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा ‘गेमचेंजर’ मानला जात आहे.
मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांनी “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी आणि विकासाच्या कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतला,” असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांचे स्वागत करत “त्यांच्या येण्याने पक्ष अधिक बळकट होईल,” असा विश्वास व्यक्त केला.
शेतकरी, अपंग आणि वंचित घटकांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात शिंदे गटाला मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांनी या निर्णयावर जोरदार टीका केली असून “ही केवळ सत्तेसाठीची राजकीय चाल आहे,” असा आरोप केला आहे. मात्र शिंदे गटाने या प्रवेशाचे स्वागत करत “राजकारणात नवे समीकरण तयार होईल,” असा दावा केला आहे.
👉 या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...
    1
    मुंबई - पुणे मिसिंग लिंक आजपासून जनतेच्या सेवेत ...
    user_अरबाज शेख. सावरगावकर
    अरबाज शेख. सावरगावकर
    Voice of people उंबेरखेडा तांडा•
    7 min ago
  • तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया
    1
    तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Gani Bhai
    1
    Post by Gani Bhai
    user_Gani Bhai
    Gani Bhai
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Gani shah
    1
    Post by Gani shah
    user_Gani shah
    Gani shah
    Software Developer Malegaon, Nashik•
    5 hrs ago
  • बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.
    1
    बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले.
पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    29 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.