हिवरखेड मंडळामध्ये महसूल व कृषी विभागाचे अधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर !.... अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या १४ हजार हेक्टरवरील संत्रा पिकाची पाहणी !.... हिवरखेड मंडळामध्ये महसूल व कृषी विभागाचे अधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर !.... अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या १४ हजार हेक्टरवरील संत्रा पिकाची पाहणी !.... अमरावती / मोर्शी : - मोर्शी तालुक्यातील हिवरखेड महसूल मंडळात ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे संत्रा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी जोरदार मागणी केल्यानंतर प्रशासनाने या मागणीची दखल घेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी सुरू केली. प्राथमिक माहितीनुसार हिवरखेड महसूल मंडळातील सुमारे १४ हजार हेक्टर क्षेत्रावरील संत्रा पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक बागांमध्ये आंबिया बहार संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असून, काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे झाडांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पाहणीदरम्यान कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध गावांतील संत्रा बागांना भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानाचे स्वरूप समजून घेतले तसेच तातडीने पंचनामे करण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती समोर आली. यावेळी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकऱ्यांना केवळ आश्वासने नकोत, तर तातडीची आर्थिक मदत आणि वस्तुनिष्ठ पंचनामे हवेत. अतिवृष्टीमुळे वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरले असून, शासनाने कोणताही विलंब न करता नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, हिवरखेड महसूल मंडळातील सर्व बाधित गावांचे तातडीने सर्वेक्षण करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याचा पंचनामा करून राज्य शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांच्यातर्फे करण्यात आली. यावेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उप विभागीय कृषी अधिकारी उज्वल आगरकर, तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके, माजी सरपंच नितीन काकडे, नानाभाऊ डवरे, गणेश घोरमाडे, उपसरपंच कांचन कुकडे, मनीष गुडधे, मनोज भोपते, वैभव काळे, रोशन बारस्कर, विजय चढोकर, अतुल मस्के, मंगेश मानकर, सुरेश घोरमाडे, तलाठी सतीश वऱ्हाडे, कृषी सहाय्यक अवंतिका कोल्हे, संजय अंधारे, सौरभ अंधारे, मनीष काळे, मनोज लंगोटे, सीमा चिखले यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.
हिवरखेड मंडळामध्ये महसूल व कृषी विभागाचे अधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर !.... अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या १४ हजार हेक्टरवरील संत्रा पिकाची पाहणी !.... हिवरखेड मंडळामध्ये महसूल व कृषी विभागाचे अधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर !.... अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या १४ हजार हेक्टरवरील संत्रा पिकाची पाहणी !.... अमरावती / मोर्शी : - मोर्शी तालुक्यातील हिवरखेड महसूल मंडळात ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे संत्रा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी जोरदार मागणी केल्यानंतर प्रशासनाने या मागणीची दखल घेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी सुरू केली. प्राथमिक माहितीनुसार हिवरखेड महसूल मंडळातील सुमारे १४ हजार हेक्टर क्षेत्रावरील संत्रा पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक बागांमध्ये आंबिया बहार संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असून, काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे झाडांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पाहणीदरम्यान कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध गावांतील संत्रा
बागांना भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानाचे स्वरूप समजून घेतले तसेच तातडीने पंचनामे करण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती समोर आली. यावेळी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकऱ्यांना केवळ आश्वासने नकोत, तर तातडीची आर्थिक मदत आणि वस्तुनिष्ठ पंचनामे हवेत. अतिवृष्टीमुळे वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरले असून, शासनाने कोणताही विलंब न करता नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, हिवरखेड महसूल मंडळातील सर्व बाधित गावांचे तातडीने सर्वेक्षण करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याचा पंचनामा करून राज्य शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांच्यातर्फे करण्यात आली. यावेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उप विभागीय कृषी अधिकारी उज्वल आगरकर, तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके, माजी सरपंच नितीन काकडे, नानाभाऊ डवरे, गणेश घोरमाडे, उपसरपंच कांचन कुकडे, मनीष गुडधे, मनोज भोपते, वैभव काळे, रोशन बारस्कर, विजय चढोकर, अतुल मस्के, मंगेश मानकर, सुरेश घोरमाडे, तलाठी सतीश वऱ्हाडे, कृषी सहाय्यक अवंतिका कोल्हे, संजय अंधारे, सौरभ अंधारे, मनीष काळे, मनोज लंगोटे, सीमा चिखले यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. #Amravati #aashishyerekar1
- राजापेठ येथील पुलावर घडलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक,आमदार प्रविण पोटे यांनी केली पाहणी1
- दहेगाव (मुस्तफा)सह सात* *गावांतील ९ हजार नागरिकांचा* *आक्रोश; "प्राथमिक आरोग्य केंद्र* *मंजूर करा, अन्यथा* *संविधानिक मार्गाने तीव्र जनआंदोलन*!"1
- प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा अकोट तालुका प्रतिनिधी..... अकोट तालुक्यातील आदर्श ग्राम सावरा येथील प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा येथे आषाढी एकादशीच्या दिवशी मुले मुली विठु मावली च्या गजरात वारकरी च्या गणवेशात टाळ मृदुंगात रमली विशेषता पालकांनी या सोहळ्या करीता चिमुकल्यांना छान प्रकारे तयारी करून उत्साह व्यक्त केला. या सर्व मुलांचा उत्साह महिला व पुरुष पालक यांनी पण घेतला. सर्व सहभागी मुलांना 15 ऑगष्ट 26 रोजी विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे या प्रसंगी शिक्षक वृंद सौ पुजा म्हसाये कोमल धांडे धांडे मॅडम वैशाली धांडे अक्षय निबाळकर शिवनाथ डोंगरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमा करीता प्रज्ञेश इंग्लिश स्कूल च्या प्राचार्या सौ स्वातीताई राऊत यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सावरा मंचनपुर देऊळगाव रंभापुर आसेगांव बाजार येथील पालकांनी सहकार्य केले.1
- इर्विन चौकात झाडाची फांदी अंगावर पडून ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी; नुकसानभरपाईची मागणी1
- पाटणबोरीत पावसाचा कहर! सर्व प्रमुख रस्ते बंद, पुलांवरून पाणी; वाहतूक पूर्णपणे ठप्प | Yavatmal Rain यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पैनगंगा आणि खुनी नदी दुथडी भरून वाहत असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये आणि पूराच्या पाण्यातून प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. इंडिया न्यूज R7 वर पाहा यवतमाळ, अकोला, अमरावती आणि विदर्भातील ताज्या, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्या. 📍 स्थान: पाटणबोरी, यवतमाळ, महाराष्ट्र 🎥 प्रतिनिधी: संदीप सुरपाम1