logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाढवणा पोलीस स्टेशनच्या पथकाकडून वायर चोरी करणाऱ्या टोळीला अटक पोलीस ठाणे वाढवणा (बु.) हद्दीत कॉपर वायर चोरी चोरीच्या ५ प्रकरणांचा उलगडा  ५ आंतरराज्यीय आरोपी अटकेत लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील पोलीस ठाणे वाढवणा (बु.) हद्दीत घडलेल्या कॉपर वायर चोरीच्या सलग घटनांचा उलगडा करण्यात पोलीस प्रशासनास महत्त्वपूर्ण यश प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारींना जोडलेले कॉपर वायर चोरी करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान करून चोरी करणाऱ्या आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणी पोलीस ठाणे वाढवणा (बु.) येथे गुरनं 78/26 व 80/26 अन्वये कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. फिर्यादी बालाजी धनराज तरवडे (रा. वाढवणा बु.) व इतर शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 26/03/2026 ते 27/03/2026 दरम्यान मौजे एकुर्का रोड परिसरातील साठवण तलावा जवळील डी.पी.वरून सुमारे 1050 मीटर कॉपर वायर (किंमत ₹84,000/-) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. तसेच दुसऱ्या घटनेत डांगेवाडी परिसरातील साठवण तलावावरील डी.पी.वरून 461 मीटर कॉपर वायर (किंमत ₹36,880/-) चोरीस गेले होते. अशा प्रकारे एकूण ₹ 120,880/- किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे वाढवणा (बु.) येथे विशेष तपास पथक गठीत करण्यात आले. तपासादरम्यान घटनास्थळांचे बारकाईने निरीक्षण, तांत्रिक विश्लेषण, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास, तसेच गोपनीय माहितीदार  सक्रिय करून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस पथकाने वाढवणा पाटी परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे रिहाईस जिवराज पवार (वय 24 वर्ष),सुजेश नवाब पवार (वय 26 वर्ष),दुकीस मलबकस पवार (वय 35 वर्ष),सासन सार्जन पवार (वय 24 वर्ष),बबू जिवराज पवार (वय 26 वर्ष,सर्व रा. सुगवा ललतपुर, ता. रिटी, जि. कटनी, राज्य मध्यप्रदेश)असे असून आरोपींनी वाढवणा, अहमदपूर, जळकोट, उदगीर व कमलनगर (कर्नाटक राज्य) परिसरात अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली आहे.  चोरी केलेले वायर जाळून त्यातून तांबे वेगळे करून ते विक्रीसाठी वापरण्याची त्यांची पद्धत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अधिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की सदरचे आरोपी हे गावाजवळील मोकळ्या जागेत वास्तव्य करून किंवा शेतात कामाच्या बहाण्याने येऊन रेकी करून अशा प्रकारच्या चोऱ्या करत होते. अटक आरोपींपैकी रिहाईस जिवराज पवार याच्याकडून सुमारे 23 किलो कॉपर वायर जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींकडून रेडमी, विवो व आयक्यू कंपनीचे एकूण 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. याशिवाय आरोपींकडे सोन्यासारखे दिसणारे “प्युअर गोल्ड 999” असा ठसा असलेले बनावट धातूचे बिस्कीट स्वरूपातील साहित्यही आढळून आले असून ते पितळ असल्याचे निष्पन्न झाले आहे. या माध्यमातून फसवणुकीचा गुन्हा झाला आहे का? याचाही तपास सुरू आहे. तपासादरम्यान आरोपींनी चोरी केलेले तांबे काही भंगार विक्रेत्यांना विक्री केल्याची माहिती समोर आली असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे. तसेच आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध व इतर गुन्ह्यांतील सहभागाबाबत सखोल तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे वाढवणा (बु.) चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकामधील तसेच तपासी अधिकारी तुकाराम बळदे, शिवप्रताप रंगवाळ,संजय दळवे , बालाजी आकेमोड, शिवाजी केंद्रे , गोरख कसबे, राजेश कंचे यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांनी दाखविलेल्या तत्परता, समन्वय व व्यावसायिकतेमुळे अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा होणे शक्य झाले.तसेच पोलिसांना आरोपी धरण्यासाठी पोलीस मित्र आकाश नागपूर्णे , सिद्धेश्वर गुद्दे यांनी सहकार्य केले आहे. सदर प्रकरणातील अटक आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपले गावात, गावाशेजारी वास्तव्यास  किंवा शेतात काम करण्याच्या बहाण्याने कोणीही अनोळखी व्यक्ती अथवा टोळी निदर्शनास येत असेल व आपणास त्यांच्याबद्दल वाजवी संशय येत असेल तर आपण नजीकच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधून तात्काळ माहिती देण्यात यावी.

1 hr ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
1 hr ago
a23e75dd-8fbd-4719-8050-b18717ed2880

वाढवणा पोलीस स्टेशनच्या पथकाकडून वायर चोरी करणाऱ्या टोळीला अटक पोलीस ठाणे वाढवणा (बु.) हद्दीत कॉपर वायर चोरी चोरीच्या ५ प्रकरणांचा उलगडा  ५ आंतरराज्यीय आरोपी अटकेत लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील पोलीस ठाणे वाढवणा (बु.) हद्दीत घडलेल्या कॉपर वायर चोरीच्या सलग घटनांचा उलगडा करण्यात पोलीस प्रशासनास महत्त्वपूर्ण यश प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारींना जोडलेले कॉपर वायर चोरी करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान करून चोरी करणाऱ्या आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणी पोलीस ठाणे वाढवणा (बु.) येथे गुरनं 78/26 व 80/26 अन्वये कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. फिर्यादी बालाजी धनराज तरवडे (रा. वाढवणा बु.) व इतर शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 26/03/2026 ते 27/03/2026 दरम्यान मौजे एकुर्का रोड परिसरातील साठवण तलावा जवळील डी.पी.वरून सुमारे 1050 मीटर कॉपर वायर (किंमत ₹84,000/-) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. तसेच दुसऱ्या घटनेत डांगेवाडी परिसरातील साठवण तलावावरील डी.पी.वरून 461 मीटर कॉपर वायर (किंमत ₹36,880/-) चोरीस गेले होते. अशा प्रकारे एकूण ₹ 120,880/- किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे वाढवणा (बु.) येथे विशेष तपास पथक गठीत करण्यात आले. तपासादरम्यान घटनास्थळांचे बारकाईने निरीक्षण, तांत्रिक विश्लेषण, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास, तसेच गोपनीय माहितीदार  सक्रिय करून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस पथकाने वाढवणा पाटी परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे रिहाईस जिवराज पवार (वय 24 वर्ष),सुजेश नवाब पवार (वय 26 वर्ष),दुकीस मलबकस पवार (वय 35 वर्ष),सासन सार्जन पवार (वय 24 वर्ष),बबू जिवराज पवार (वय 26 वर्ष,सर्व रा. सुगवा ललतपुर, ता. रिटी, जि. कटनी, राज्य मध्यप्रदेश)असे असून आरोपींनी

b00b32d6-cff5-42fa-b630-5ecd17f30787

वाढवणा, अहमदपूर, जळकोट, उदगीर व कमलनगर (कर्नाटक राज्य) परिसरात अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली आहे.  चोरी केलेले वायर जाळून त्यातून तांबे वेगळे करून ते विक्रीसाठी वापरण्याची त्यांची पद्धत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अधिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की सदरचे आरोपी हे गावाजवळील मोकळ्या जागेत वास्तव्य करून किंवा शेतात कामाच्या बहाण्याने येऊन रेकी करून अशा प्रकारच्या चोऱ्या करत होते. अटक आरोपींपैकी रिहाईस जिवराज पवार याच्याकडून सुमारे 23 किलो कॉपर वायर जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींकडून रेडमी, विवो व आयक्यू कंपनीचे एकूण 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. याशिवाय आरोपींकडे सोन्यासारखे दिसणारे “प्युअर गोल्ड 999” असा ठसा असलेले बनावट धातूचे बिस्कीट स्वरूपातील साहित्यही आढळून आले असून ते पितळ असल्याचे निष्पन्न झाले आहे. या माध्यमातून फसवणुकीचा गुन्हा झाला आहे का? याचाही तपास सुरू आहे. तपासादरम्यान आरोपींनी चोरी केलेले तांबे काही भंगार विक्रेत्यांना विक्री केल्याची माहिती समोर आली असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे. तसेच आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध व इतर गुन्ह्यांतील सहभागाबाबत सखोल तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे वाढवणा (बु.) चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकामधील तसेच तपासी अधिकारी तुकाराम बळदे, शिवप्रताप रंगवाळ,संजय दळवे , बालाजी आकेमोड, शिवाजी केंद्रे , गोरख कसबे, राजेश कंचे यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांनी दाखविलेल्या तत्परता, समन्वय व व्यावसायिकतेमुळे अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा होणे शक्य झाले.तसेच पोलिसांना आरोपी धरण्यासाठी पोलीस मित्र आकाश नागपूर्णे , सिद्धेश्वर गुद्दे यांनी सहकार्य केले आहे. सदर प्रकरणातील अटक आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपले गावात, गावाशेजारी वास्तव्यास  किंवा शेतात काम करण्याच्या बहाण्याने कोणीही अनोळखी व्यक्ती अथवा टोळी निदर्शनास येत असेल व आपणास त्यांच्याबद्दल वाजवी संशय येत असेल तर आपण नजीकच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधून तात्काळ माहिती देण्यात यावी.

More news from Maharashtra and nearby areas
  • नवनिर्वाचित राज्यसभेचे सदस्य मा.श्री. रामरावजी वडकुते आणि विधान परिषद सभापती मा.ना. राम शिंदे यांचे लातूर नगरीत भव्य स्वागत व सत्कार. शूरू ॲप, मराठी न्यूज. बुधवार दि. 01 एप्रिल 2026. विधान परिषद सभापती मा. ना. श्री. रामजी शिंदे तसेच नवनिर्वाचित राज्यसभेचे सदस्य मा. श्री. रामरावजी वडकुते यांचे लातूर नगरीत आगमन झाले याप्रसंगी भारतीय जनता पार्टी लातूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे भव्य असे स्वागत व सत्कार करण्यात आले. याप्रसंगी तडफदार औसा आमदार मा.अभिमन्यू पवार, प्रदेश उपाध्यक्ष मा.सौ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री.अजितजी पाटील कव्हेकर, विरोधी पक्ष नेते तथा सहकारी नगरसेवक माजी जिल्हाध्यक्ष नवनिर्वाचित नगरसेवक देविदासजी काळे, ओबीसी महिला मोर्चा प्रदेश उपाद्यक्ष डॉ. उज्वला हाके, रागिणीताई यादव, प्रवीणजी कस्तुरे, राहुलजी केंद्रे, संतोष अप्पा मुक्ता, दत्ताजी चेवले, प्रदीपजी मोरे, भिमाजी बेंबळकर, करूनाताई शिंदे, उद्धवजी तेलंगे, ऋषीजी राजे, दिलीप धोत्रे, संतोष तिवारी, अनिल पुजारी, श्रीधर सुरवसे तसेच भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    2
    नवनिर्वाचित राज्यसभेचे सदस्य मा.श्री. रामरावजी वडकुते आणि विधान परिषद सभापती मा.ना. राम शिंदे यांचे लातूर नगरीत भव्य स्वागत व सत्कार.
शूरू ॲप, मराठी न्यूज. बुधवार दि. 01 एप्रिल 2026.
विधान परिषद सभापती मा. ना. श्री. रामजी शिंदे तसेच नवनिर्वाचित राज्यसभेचे सदस्य मा. श्री. रामरावजी वडकुते यांचे लातूर नगरीत आगमन झाले याप्रसंगी भारतीय जनता पार्टी लातूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे भव्य असे स्वागत व सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी तडफदार औसा आमदार मा.अभिमन्यू पवार, प्रदेश उपाध्यक्ष मा.सौ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री.अजितजी पाटील कव्हेकर, विरोधी पक्ष नेते तथा सहकारी नगरसेवक माजी जिल्हाध्यक्ष नवनिर्वाचित नगरसेवक देविदासजी काळे, ओबीसी महिला मोर्चा प्रदेश उपाद्यक्ष डॉ. उज्वला हाके, रागिणीताई यादव, प्रवीणजी कस्तुरे, राहुलजी केंद्रे, संतोष अप्पा मुक्ता, दत्ताजी चेवले, प्रदीपजी मोरे, भिमाजी बेंबळकर, करूनाताई शिंदे, उद्धवजी तेलंगे, ऋषीजी राजे, दिलीप धोत्रे, संतोष तिवारी, अनिल पुजारी, श्रीधर सुरवसे तसेच भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company Latur, Maharashtra•
    27 min ago
  • लातूर जिल्ह्यातील विविध पक्षाकडून निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्कार माननीय सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत उत्सहात संपन्न आयोजक अनिल गोयकर संस्थापक अध्यक्ष लोकमाता आहिल्या प्रतिष्ठान
    1
    लातूर जिल्ह्यातील विविध पक्षाकडून निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्कार  माननीय सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत उत्सहात संपन्न आयोजक अनिल गोयकर
संस्थापक अध्यक्ष लोकमाता आहिल्या प्रतिष्ठान
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    4 hrs ago
  • लातूर -तांबाळा क्लबवर झालेल्या शस्त्रधारी दरोड्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे उघड झाले आहे. सोमवारी रात्रि घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्लबमध्ये सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींकडे स्थानिक पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “हफ्तेखोरीमुळेच अशा बेकायदेशीर धंद्यांना खतपाणी घातले जाते,” असा संतप्त सूर परिसरातून उमटत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे या क्लबला देण्यात आलेल्या परवान्याबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. क्लबला नेमकी किती टेबलसाठी परवानगी देण्यात आली होती? प्रत्यक्षात मात्र किती टेबल सुरू होते? रोज येथे येणाऱ्या लोकांची नोंद ठेवली जात होती का? त्यांच्या ओळखीची तपासणी करण्यात येत होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप धूसरच आहेत. स्थानिक रहिवाशांच्या मते, क्लबमध्ये रोज मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती, मात्र कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. बाहेरून येणाऱ्या संशयित व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. त्यामुळेच दरोडेखोरांना मोकळे रान मिळाले, अशी चर्चा रंगत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नेहमीप्रमाणे चौकशीचे आश्वासन दिले असले तरी नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. “घटना घडल्यानंतरच पोलिस जागे होतात, त्याआधी कुठे असतात?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा, अशा घटना पुन्हा घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. तांबाळा क्लब प्रकरणामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे—शहरातील कायदा सुव्यवस्था केवळ कागदावरच राहिली आहे, प्रत्यक्षात मात्र नागरिकांचा जीव धोक्यात आहे. तांबाळा क्लब वर सशस्त्र दरोडा :क्लब नियमांचा बोजवारा, नागरिकांचा संताप; जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी तीव्र महाराष्ट्र–कर्नाटक सीमेलगतच्या तांबाळा परिसरात सोमवारी रात्री सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास घडलेला सशस्त्र दरोडा हा केवळ एक गुन्हेगारी प्रकार नाही, तर तो संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा, स्थानिक नियमन व्यवस्था आणि क्लब संस्कृतीतील उणिवांचे उघडे पडलेले चित्र आहे. या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत—कायदा-सुव्यवस्था, परवानगी प्रक्रिया, देखरेख यंत्रणा, आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या मूलभूत हक्कांबाबत. सर्वप्रथम, या दरोड्याचा स्वरूप पाहिले तर तो पूर्णपणे नियोजनबद्ध असल्याचे स्पष्ट होते. दरोडेखोरांनी क्लबमध्ये प्रवेश करण्याची वेळ, उपस्थितांची संख्या, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी—या सर्वांचा अचूक अभ्यास केला होता. याचा अर्थ असा की, क्लबमध्ये सुरक्षा व्यवस्था केवळ कागदोपत्रीच होती. जर सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम असती, प्रवेश नियंत्रण काटेकोर असते आणि सुरक्षा रक्षक सतर्क असते, तर अशा प्रकारचा हल्ला करणे इतके सोपे झाले नसते. यावरून क्लबच्या नियमांचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे दिसून येते. कोणत्याही क्लबला परवाना देताना ठरावीक अटी आणि नियम घालण्यात येतात—कार्यरत वेळा, सुरक्षा व्यवस्था, ग्राहकांची नोंद, मद्यविक्रीचे नियम, स्थानिक कायद्यांचे पालन इत्यादी. मात्र तांबाळा परिसरातील या क्लबमध्ये हे सर्व नियम केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित राहिले होते का, असा प्रश्न उपस्थित होतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाची देखरेख. अशा प्रकारच्या क्लबवर नियमित तपासणी होणे अपेक्षित असते. स्थानिक पोलीस, महसूल विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात समन्वय साधून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खात्री केली पाहिजे. मात्र, प्रत्यक्षात अशी तपासणी कितपत प्रभावीपणे झाली, हा संशय निर्माण होतो. जर तपासणी नियमित आणि कठोर झाली असती, तर नियमांचे उल्लंघन इतक्या मोठ्या प्रमाणात होऊ शकले नसते. तिसरा मुद्दा म्हणजे सीमाभागातील विशेष परिस्थिती. महाराष्ट्र–कर्नाटक सीमाभाग हा नेहमीच संवेदनशील मानला जातो. या भागात दोन राज्यांच्या सीमेमुळे प्रशासकीय अधिकारांची विभागणी होते, ज्याचा गैरफायदा गुन्हेगार अनेकदा घेतात. एका राज्यात गुन्हा करून दुसऱ्या राज्यात पसार होणे, स्थानिक पातळीवर माहितीचा अभाव, आणि समन्वयातील त्रुटी—या सर्व गोष्टी गुन्हेगारीला पोषक वातावरण निर्माण करतात. तांबाळा येथील घटना याच पार्श्वभूमीवर पाहिली तर ती अधिक गंभीर वाटते. नागरिकांचा रोष हा या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. स्थानिक लोकांनी उघडपणे क्लब बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, हा क्लब केवळ मनोरंजनाचे ठिकाण नसून, तो गुन्हेगारी हालचालींचे केंद्र बनला आहे. “पोलिस आपले काम करत आहेत, पण अशा ठिकाणांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे,” ही भावना नागरिकांच्या प्रतिक्रियेत स्पष्टपणे दिसून येते. नागरिकांची ही मागणी केवळ भावनिक नाही, तर ती वास्तवावर आधारित आहे. जर एखादे आस्थापन सतत कायद्याचे उल्लंघन करत असेल आणि त्यातून समाजाला धोका निर्माण होत असेल, तर ते बंद करणे हा प्रशासनाचा कर्तव्यभाग ठरतो. जिल्हाधिकाऱ्यांकडे अशा प्रकारचे अधिकार असतात—परवाना रद्द करणे, तात्पुरते बंद करणे, किंवा कायमस्वरूपी कारवाई करणे. पोलिसांची भूमिका या प्रकरणात मिश्र स्वरूपाची दिसते. एका बाजूला त्यांनी तत्परतेने कारवाई करून एका आरोपीला अटक केली, तपास सुरू केला, आणि फरार आरोपींचा शोध घेत आहेत. हे निश्चितच सकारात्मक आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, अशी घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात काही प्रमाणात त्रुटी राहिल्या का, हा प्रश्न उपस्थित होतो. या घटनेने “प्रतिक्रियात्मक पोलीसिंग” आणि “प्रतिबंधात्मक पोलीसिंग” यातील फरक अधोरेखित केला आहे. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणे ही आवश्यक बाब आहेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे गुन्हा घडूच न देणे. त्यासाठी गुप्त माहिती, स्थानिक पातळीवरील देखरेख, आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे अत्यावश्यक असते. क्लब संस्कृतीचा व्यापक संदर्भही येथे महत्त्वाचा ठरतो. गेल्या काही वर्षांत ग्रामीण आणि सीमाभागात क्लब, बार आणि मनोरंजन केंद्रांची संख्या वाढली आहे. ही ठिकाणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली, तरी त्यांचे योग्य नियमन न झाल्यास ती गुन्हेगारीची केंद्रे बनू शकतात. तांबाळा येथील घटना ही याच प्रवृत्तीचे उदाहरण आहे. यामध्ये परवानगी देताना होणारी शिथिलता, राजकीय दबाव, आणि स्थानिक पातळीवरील संगनमत यांची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा नियमांचे उल्लंघन होत असूनही कारवाई केली जात नाही, कारण त्यामागे आर्थिक किंवा राजकीय हितसंबंध गुंतलेले असतात. जर तांबाळा येथील क्लबच्या बाबतीतही असे काही झाले असेल, तर ती बाब अत्यंत गंभीर आहे आणि त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही यंत्रणेचा मुद्दा विशेष लक्षवेधी आहे. आजच्या काळात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असणे अनिवार्य मानले जाते. मात्र, अनेकदा हे कॅमेरे केवळ नावापुरतेच असतात—ते कार्यरत नसतात, त्यांचे फुटेज जतन केले जात नाही, किंवा त्यांचा योग्य वापर केला जात नाही. तांबाळा येथील प्रकरणातही असेच काही घडले का, याचा तपास आवश्यक आहे. याशिवाय, सुरक्षा रक्षकांची भूमिका देखील तपासण्यासारखी आहे. क्लबमध्ये सुरक्षा रक्षक होते का? ते प्रशिक्षित होते का? त्यांनी दरोडेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला का? की ते फक्त औपचारिकतेसाठी ठेवले गेले होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे. कोणत्याही समाजात नागरिकांना सुरक्षिततेची भावना असणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र अशा घटना घडल्यास ती भावना डळमळीत होते. लोकांना वाटू लागते की, “आपण सुरक्षित आहोत का?” आणि हा प्रश्नच प्रशासनासाठी सर्वात मोठा इशारा असतो. यामुळेच नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट हस्तक्षेपाची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असल्याने, त्यांच्याकडे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये निर्णायक कारवाई करण्याचे अधिकार असतात. क्लबचा परवाना रद्द करणे, चौकशी समिती नेमणे, आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे—या सर्व बाबी त्यांच्या अधिकारक्षेत्रात येतात. या घटनेतून काही महत्त्वाचे धडे घेणे आवश्यक आहे. प्रथम, नियमांचे केवळ अस्तित्व पुरेसे नसते; त्यांची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे असते. दुसरे म्हणजे, प्रशासनातील विविध घटकांमध्ये समन्वय आवश्यक आहे. तिसरे म्हणजे, नागरिकांचा सहभाग आणि सतर्कता ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. शेवटी, तांबाळा येथील सशस्त्र दरोडा ही केवळ एक घटना नसून, ती एक इशारा आहे—प्रशासनासाठी, पोलिसांसाठी, आणि समाजासाठी. जर या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर भविष्यात अशा घटना अधिक वाढू शकतात. मात्र, जर या घटनेचा गांभीर्याने विचार करून ठोस पावले उचलली गेली, तर ही घटना एक सकारात्मक बदलाची सुरुवात ठरू शकते. आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. क्लबवर कारवाई होणार का? नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा होणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे—नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळणार का? या प्रश्नांची उत्तरे येत्या काळात मिळतील, आणि त्यावरच या प्रकरणाचा खरा निकाल अवलंबून असेल. आता प्रश्न एकच — जबाबदार कोण? आणि कारवाई कधी? ⚖️
    1
    लातूर -तांबाळा क्लबवर झालेल्या शस्त्रधारी दरोड्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे उघड झाले आहे. सोमवारी रात्रि घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्लबमध्ये सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींकडे स्थानिक पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “हफ्तेखोरीमुळेच अशा बेकायदेशीर धंद्यांना खतपाणी घातले जाते,” असा संतप्त सूर परिसरातून उमटत आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे या क्लबला देण्यात आलेल्या परवान्याबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. क्लबला नेमकी किती टेबलसाठी परवानगी देण्यात आली होती? प्रत्यक्षात मात्र किती टेबल सुरू होते? रोज येथे येणाऱ्या लोकांची नोंद ठेवली जात होती का? त्यांच्या ओळखीची तपासणी करण्यात येत होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप धूसरच आहेत.
स्थानिक रहिवाशांच्या मते, क्लबमध्ये रोज मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती, मात्र कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. बाहेरून येणाऱ्या संशयित व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. त्यामुळेच दरोडेखोरांना मोकळे रान मिळाले, अशी चर्चा रंगत आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी नेहमीप्रमाणे चौकशीचे आश्वासन दिले असले तरी नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. “घटना घडल्यानंतरच पोलिस जागे होतात, त्याआधी कुठे असतात?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा, अशा घटना पुन्हा घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
तांबाळा क्लब प्रकरणामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे—शहरातील कायदा सुव्यवस्था केवळ कागदावरच राहिली आहे, प्रत्यक्षात मात्र नागरिकांचा जीव धोक्यात आहे.
तांबाळा क्लब वर सशस्त्र दरोडा :क्लब नियमांचा बोजवारा, नागरिकांचा संताप; जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी तीव्र
महाराष्ट्र–कर्नाटक सीमेलगतच्या तांबाळा परिसरात सोमवारी रात्री सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास घडलेला सशस्त्र दरोडा हा केवळ एक गुन्हेगारी प्रकार नाही, तर तो संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा, स्थानिक नियमन व्यवस्था आणि क्लब संस्कृतीतील उणिवांचे उघडे पडलेले चित्र आहे. या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत—कायदा-सुव्यवस्था, परवानगी प्रक्रिया, देखरेख यंत्रणा, आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या मूलभूत हक्कांबाबत.
सर्वप्रथम, या दरोड्याचा स्वरूप पाहिले तर तो पूर्णपणे नियोजनबद्ध असल्याचे स्पष्ट होते. दरोडेखोरांनी क्लबमध्ये प्रवेश करण्याची वेळ, उपस्थितांची संख्या, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी—या सर्वांचा अचूक अभ्यास केला होता. याचा अर्थ असा की, क्लबमध्ये सुरक्षा व्यवस्था केवळ कागदोपत्रीच होती. जर सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम असती, प्रवेश नियंत्रण काटेकोर असते आणि सुरक्षा रक्षक सतर्क असते, तर अशा प्रकारचा हल्ला करणे इतके सोपे झाले नसते.
यावरून क्लबच्या नियमांचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे दिसून येते. कोणत्याही क्लबला परवाना देताना ठरावीक अटी आणि नियम घालण्यात येतात—कार्यरत वेळा, सुरक्षा व्यवस्था, ग्राहकांची नोंद, मद्यविक्रीचे नियम, स्थानिक कायद्यांचे पालन इत्यादी. मात्र तांबाळा परिसरातील या क्लबमध्ये हे सर्व नियम केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित राहिले होते का, असा प्रश्न उपस्थित होतो.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाची देखरेख. अशा प्रकारच्या क्लबवर नियमित तपासणी होणे अपेक्षित असते. स्थानिक पोलीस, महसूल विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात समन्वय साधून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खात्री केली पाहिजे. मात्र, प्रत्यक्षात अशी तपासणी कितपत प्रभावीपणे झाली, हा संशय निर्माण होतो. जर तपासणी नियमित आणि कठोर झाली असती, तर नियमांचे उल्लंघन इतक्या मोठ्या प्रमाणात होऊ शकले नसते.
तिसरा मुद्दा म्हणजे सीमाभागातील विशेष परिस्थिती. महाराष्ट्र–कर्नाटक सीमाभाग हा नेहमीच संवेदनशील मानला जातो. या भागात दोन राज्यांच्या सीमेमुळे प्रशासकीय अधिकारांची विभागणी होते, ज्याचा गैरफायदा गुन्हेगार अनेकदा घेतात. एका राज्यात गुन्हा करून दुसऱ्या राज्यात पसार होणे, स्थानिक पातळीवर माहितीचा अभाव, आणि समन्वयातील त्रुटी—या सर्व गोष्टी गुन्हेगारीला पोषक वातावरण निर्माण करतात. तांबाळा येथील घटना याच पार्श्वभूमीवर पाहिली तर ती अधिक गंभीर वाटते.
नागरिकांचा रोष हा या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. स्थानिक लोकांनी उघडपणे क्लब बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, हा क्लब केवळ मनोरंजनाचे ठिकाण नसून, तो गुन्हेगारी हालचालींचे केंद्र बनला आहे. “पोलिस आपले काम करत आहेत, पण अशा ठिकाणांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे,” ही भावना नागरिकांच्या प्रतिक्रियेत स्पष्टपणे दिसून येते.
नागरिकांची ही मागणी केवळ भावनिक नाही, तर ती वास्तवावर आधारित आहे. जर एखादे आस्थापन सतत कायद्याचे उल्लंघन करत असेल आणि त्यातून समाजाला धोका निर्माण होत असेल, तर ते बंद करणे हा प्रशासनाचा कर्तव्यभाग ठरतो. जिल्हाधिकाऱ्यांकडे अशा प्रकारचे अधिकार असतात—परवाना रद्द करणे, तात्पुरते बंद करणे, किंवा कायमस्वरूपी कारवाई करणे.
पोलिसांची भूमिका या प्रकरणात मिश्र स्वरूपाची दिसते. एका बाजूला त्यांनी तत्परतेने कारवाई करून एका आरोपीला अटक केली, तपास सुरू केला, आणि फरार आरोपींचा शोध घेत आहेत. हे निश्चितच सकारात्मक आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, अशी घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात काही प्रमाणात त्रुटी राहिल्या का, हा प्रश्न उपस्थित होतो.
या घटनेने “प्रतिक्रियात्मक पोलीसिंग” आणि “प्रतिबंधात्मक पोलीसिंग” यातील फरक अधोरेखित केला आहे. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणे ही आवश्यक बाब आहेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे गुन्हा घडूच न देणे. त्यासाठी गुप्त माहिती, स्थानिक पातळीवरील देखरेख, आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे अत्यावश्यक असते.
क्लब संस्कृतीचा व्यापक संदर्भही येथे महत्त्वाचा ठरतो. गेल्या काही वर्षांत ग्रामीण आणि सीमाभागात क्लब, बार आणि मनोरंजन केंद्रांची संख्या वाढली आहे. ही ठिकाणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली, तरी त्यांचे योग्य नियमन न झाल्यास ती गुन्हेगारीची केंद्रे बनू शकतात. तांबाळा येथील घटना ही याच प्रवृत्तीचे उदाहरण आहे.
यामध्ये परवानगी देताना होणारी शिथिलता, राजकीय दबाव, आणि स्थानिक पातळीवरील संगनमत यांची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा नियमांचे उल्लंघन होत असूनही कारवाई केली जात नाही, कारण त्यामागे आर्थिक किंवा राजकीय हितसंबंध गुंतलेले असतात. जर तांबाळा येथील क्लबच्या बाबतीतही असे काही झाले असेल, तर ती बाब अत्यंत गंभीर आहे आणि त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
सीसीटीव्ही यंत्रणेचा मुद्दा विशेष लक्षवेधी आहे. आजच्या काळात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असणे अनिवार्य मानले जाते. मात्र, अनेकदा हे कॅमेरे केवळ नावापुरतेच असतात—ते कार्यरत नसतात, त्यांचे फुटेज जतन केले जात नाही, किंवा त्यांचा योग्य वापर केला जात नाही. तांबाळा येथील प्रकरणातही असेच काही घडले का, याचा तपास आवश्यक आहे.
याशिवाय, सुरक्षा रक्षकांची भूमिका देखील तपासण्यासारखी आहे. क्लबमध्ये सुरक्षा रक्षक होते का? ते प्रशिक्षित होते का? त्यांनी दरोडेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला का? की ते फक्त औपचारिकतेसाठी ठेवले गेले होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे. कोणत्याही समाजात नागरिकांना सुरक्षिततेची भावना असणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र अशा घटना घडल्यास ती भावना डळमळीत होते. लोकांना वाटू लागते की, “आपण सुरक्षित आहोत का?” आणि हा प्रश्नच प्रशासनासाठी सर्वात मोठा इशारा असतो.
यामुळेच नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट हस्तक्षेपाची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असल्याने, त्यांच्याकडे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये निर्णायक कारवाई करण्याचे अधिकार असतात. क्लबचा परवाना रद्द करणे, चौकशी समिती नेमणे, आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे—या सर्व बाबी त्यांच्या अधिकारक्षेत्रात येतात.
या घटनेतून काही महत्त्वाचे धडे घेणे आवश्यक आहे. प्रथम, नियमांचे केवळ अस्तित्व पुरेसे नसते; त्यांची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे असते. दुसरे म्हणजे, प्रशासनातील विविध घटकांमध्ये समन्वय आवश्यक आहे. तिसरे म्हणजे, नागरिकांचा सहभाग आणि सतर्कता ही देखील तितकीच महत्त्वाची आहे.
शेवटी, तांबाळा येथील सशस्त्र दरोडा ही केवळ एक घटना नसून, ती एक इशारा आहे—प्रशासनासाठी, पोलिसांसाठी, आणि समाजासाठी. जर या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर भविष्यात अशा घटना अधिक वाढू शकतात. मात्र, जर या घटनेचा गांभीर्याने विचार करून ठोस पावले उचलली गेली, तर ही घटना एक सकारात्मक बदलाची सुरुवात ठरू शकते.
आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. क्लबवर कारवाई होणार का? नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा होणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे—नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळणार का? या प्रश्नांची उत्तरे येत्या काळात मिळतील, आणि त्यावरच या प्रकरणाचा खरा निकाल अवलंबून असेल.
आता प्रश्न एकच — जबाबदार कोण?
आणि कारवाई कधी? ⚖️
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    14 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    22 hrs ago
  • वादळी पावसाने हिमायतनगर हादरले! सोमवारी मध्यरात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हिमायतनगर शहर व तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी विजवाहिनी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित 🌳 झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बाधित 🌙 नागरिकांना रात्रभर अंधारात काढावी लागली 🌾 शेतीला मोठा फटका 🥭 आंबा, चिकू फळबागांचे नुकसान 🌾 उन्हाळी ज्वारी व वैरण जमीनदोस्त 🌾 काढणीस आलेले गहू धोक्यात उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. #हिमायतनगर #वादळीपाऊस #नांदेड #शेतकरी #नुकसान WeatherUpdate Maharashtra BreakingNews Farmers
    1
    वादळी पावसाने हिमायतनगर हादरले!
सोमवारी मध्यरात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हिमायतनगर शहर व तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. 
अनेक ठिकाणी विजवाहिनी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित
🌳 झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बाधित
🌙 नागरिकांना रात्रभर अंधारात काढावी लागली
🌾 शेतीला मोठा फटका
🥭 आंबा, चिकू फळबागांचे नुकसान
🌾 उन्हाळी ज्वारी व वैरण जमीनदोस्त
🌾 काढणीस आलेले गहू धोक्यात
उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.
#हिमायतनगर #वादळीपाऊस #नांदेड #शेतकरी #नुकसान WeatherUpdate Maharashtra BreakingNews Farmers
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • हिंगोली | प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजू इंगोले, जिल्हा सचिव सिद्धांत गायकवाड, तसेच जिल्हा समन्वयक सरपंच राहुल करवंदे यांनी हिंगोली वंचित जिल्हाध्यक्ष नियुक्तीवर आक्षेप घेत पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सादर केले होते. दरम्यान, आज पुन्हा एकदा “राजगृहातच राहण्याचा” निर्णय घेत त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे लहान बंधू तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेत अधिकृत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय युवा नेतृत्व अमनसाहेब आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे पार पडला. सदर पक्षप्रवेश कार्यक्रम युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल कुमार सुर्यवंशी, लिगल सेल महाराष्ट्र नेते ॲड. रावन धाबे, जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे, आकाश दातार, विक्की काशिदे, ॲड. धम्मरत्न कांबळे, ॲड. बालाजी खरात, ॲड. रामराव जुमडे, विजय कांबळे, केशव कदम, गोरख खिल्लारे, सूरज वाघमारे, संदीप थोरात, राजू गायकवाड, रवी खंडागळे, सचिन जोंधळे, अरविंद साळवे, भारत गडधने, भीमराव इंगोले, कामाजी खिल्लारे, संजय वाकळे, भारत वाकळे, देवा कांबळे, लखन सरतापे, यशवंत साळवे, महेंद्र घोंगडे , अक्षय खाडे, मारोती राठोड, अनिल राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचनल ॲड. रावन धाबे यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे यांनी केले. आभार भारत गडधणे यांनी मानले.
    1
    हिंगोली | प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजू इंगोले, जिल्हा सचिव सिद्धांत गायकवाड, तसेच  जिल्हा समन्वयक सरपंच राहुल करवंदे यांनी हिंगोली वंचित जिल्हाध्यक्ष नियुक्तीवर आक्षेप घेत पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सादर केले होते.
दरम्यान, आज पुन्हा एकदा “राजगृहातच राहण्याचा” निर्णय घेत त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे लहान बंधू तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेत अधिकृत प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय युवा नेतृत्व अमनसाहेब आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे पार पडला.
सदर पक्षप्रवेश कार्यक्रम युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल कुमार सुर्यवंशी, लिगल सेल महाराष्ट्र नेते ॲड. रावन धाबे,  जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे, आकाश दातार, विक्की काशिदे, ॲड. धम्मरत्न कांबळे, ॲड. बालाजी खरात, ॲड. रामराव जुमडे, विजय कांबळे, केशव कदम, गोरख खिल्लारे, सूरज वाघमारे, संदीप थोरात, राजू गायकवाड, रवी खंडागळे, सचिन जोंधळे, अरविंद साळवे, भारत गडधने, भीमराव इंगोले, कामाजी खिल्लारे, संजय वाकळे, भारत वाकळे, देवा कांबळे, लखन सरतापे, यशवंत साळवे, महेंद्र घोंगडे , अक्षय खाडे, मारोती राठोड, अनिल राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचनल ॲड. रावन धाबे यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे यांनी केले. आभार भारत गडधणे यांनी मानले.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • *तांबाळा क्लबवर शस्त्रधारी दरोडा; कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, पोलिसांच्या हफ्तेखोरीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात!* *➡️नागरिकांचा संताप; जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी तीव्र*
    1
    *तांबाळा क्लबवर शस्त्रधारी दरोडा; कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, पोलिसांच्या हफ्तेखोरीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात!*
*➡️नागरिकांचा संताप; जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी तीव्र*
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.