हिंजवडी आयटी 'फ्रेशर्स' फसवणूक प्रकरणी 'एसआयटी' स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश आरोपींची सव्वा कोटींची मालमत्ता जप्त; फसवणुकीची रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाची पावले पिंपरी ता.१० पुणे जिल्ह्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील 'फ्लायनॉट सास प्रा. लि.' (Flynaut Saas Pvt. Ltd.) या कंपनीने शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुण पदवीधरांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचे प्रकरण समोर आले होते. या गंभीर विषयावर आमदार शंकर जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत विधानसभेत (दि . 10) तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आमदार शंकर जगताप यांनी तारांकित प्रश्नाच्या (प्रश्न क्रमांक २७८६८) माध्यमातून हिंजवडी आयटी पार्कमधील 'फ्लायनॉट सास प्रा. लि. कंपनीने बेरोजगार तरुण पदवीधारकांच्या केलेल्या फसवणुकीचा मुद्दा सभागृहासमोर मांडला होता. याविषयी माहिती देताना त्यांनी की, हिंजवडी आयटी पार्क येथील 'फ्लायनॉट सास प्रा. लि. या कंपनीने ऑगस्ट २०२५ मध्ये वेगवेगळ्या कन्सल्टीच्या माध्यमातून फ्रेशर्स इंजिनीअर उमेदवारांना मोठ्या वार्षिक पगाराचे अमिष दाखवले. तसेच उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात आगऊ रक्कम स्वीकारून त्यांना कामाला लावतो, अस सांगून आणि विश्वास संपादन केला. नियुक्तीपूर्वी ट्रेनिंग आणि इतर कारणांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून १ लाख ते २.५० लाख रुपयांपर्यंतची रक्कम कंपनीच्या बँक खात्यावर भरून घेण्यात आली. त्यानंतर काही महिने ऑनलाइन काम करून घेतले. परंतु प्रत्यक्षात पगार दिला नाही. शेवटी पात्रता परीक्षा किंवा इंटरव्ह्यूमध्ये नापास झाल्याचे कारण देऊन अनेक विद्यार्थ्यांना कंपनीत रुजू करून घेण्यास नकार दिला.सोबतच फ्रेशर्स उमेदवारांची कोट्यावधी रुपयाची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणात हिंजवडी पोलीस स्टेशन येथे उपेश रंजीत पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची गांभीर्यता शासनाच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान दोषींवर काय कारवाई करण्यात आली असून, विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली रक्कम त्यांना परत मिळण्याबाबत कोणती पावले उचलली जात आहेत. असे आमदार जगताप यांनी विचारले, त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आता पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ---------------------------------------- *आरोपींची सव्वा कोटींची मालमत्ता जप्त* हिंजवडी आयटी पार्क येथील या फसवणूक प्रकरणात केवळ गुन्हे दाखल करून न थांबता, पीडित विद्यार्थ्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कठोर पवित्रा घेतला आहे असे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या आतापर्यंत ३५७ पीडितांची ६ कोटी ४९ लाख ९६ हजार ७३१ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी, 'फ्लायनॉट सास प्रा. लि.' कंपनीचे संस्थापक आणि कार्यरत कर्मचारी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करत असतानाच, त्यांची १ कोटी २७ लाख २५ हजार ७८० रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे ४८ लाख २५ हजार ७८० रुपये किमतीच्या जंगम मालमत्तेचा आणि ७९ लाख रुपये किमतीच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. फसवणुकीच्या पैशातून घेतलेल्या या मालमत्तेवर टाच आणून, कायदेशीर प्रक्रियेद्वारे ही रक्कम पुन्हा बाधित विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विशेष तपास पथकामार्फत (SIT) पुढील प्रक्रिया राबवली जात आहे. प्रतिक्रिया "आयटी क्षेत्रातील तरुणांची होणारी ही फसवणूक अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाचा तपास केवळ कागदावर राहू नये, तर प्रत्येक पीडित विद्यार्थ्याला त्याचे हक्काचे पैसे परत मिळावेत आणि अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर जरब बसवावी, हीच माझी प्रमुख मागणी आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून आता या प्रकरणाचा छडा लागेल."असा विश्वास आहे . शंकर जगताप,आमदार चिंचवड विधानसभा मतदारसंघ

- पिंपरीतून एका व्यापाऱ्याचा अपहरण 'खंडणी विरुद्ध पथक 'काळेवाडी पोलीस स्टेशन 'संगमनेर पोलीस यांच्या मदतीने व्यापाऱ्याची झाली सुटका .1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- ५० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; पोलिसांचा थरारक पाठलाग करून ५ आरोपी अटकेत पिंपरी : प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक आणि काळेवाडी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी थरारक पाठलाग करून अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका केली. ९ मार्च रोजी रहाटणी येथील शिवराजनगर परिसरातून एका व्यापाऱ्याचे स्विफ्ट कारमधून अपहरण करून आरोपींनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला. आरोपी अपहृत व्यक्तीला उत्तरप्रदेशकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर टोल नाक्यावर सापळा रचण्यात आला. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन देशी पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, रोख रक्कम व स्विफ्ट कारसह एकूण १८.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींनी अपहृत व्यक्तीला चंदनापुरी घाट परिसरात सोडून दिले होते. पोलिसांनी शोध घेऊन त्या व्यक्तीला सुखरूप ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व काळेवाडी पोलिसांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.1
- Post by Maharashtra 18 news1
- #psi #atulshete #pcmc #pune #marathinews1
- देहूरोड येथे सलामती पीर उर्स उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न.... ईदगाह मैदानातील दर्ग्यावर हजारो भाविकांची उपस्थिती; रमजाननिमित्त रोजा इफ्तार व लंगर-ए-आमची व्यवस्था... देहूरोड येथील ईदगाह मैदानात असलेल्या हजरत सलामती पीर दर्ग्यावर १४ वा उर्स उत्सव मोठ्या दिमाखात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्ग्यावर हजेरी लावून सलामती पीर साहेबांचे यांचे दर्शन घेतले. या उर्स उत्सवाचे आयोजन सलामती पीर दर्गा ट्रस्ट तसेच जामा मशीद ॲडहोक कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते. सध्या पवित्र रमजान महिना सुरू असल्याने ईदगाह मैदानात ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांसाठी रोजा इफ्तारची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच संध्याकाळी सर्वांसाठी लंगर-ए-आम चे आयोजन करण्यात आले होते. उर्स उत्सवानिमित्त दर्गा परिसरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भक्तांनी प्रार्थना करून सलामती पीर यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला विशेष करून या उर्स साठी अनेक सुफी संत, इस्लामिक गुरु त्याचप्रमाणे सर्वधर्मचे मान्यवर व सर्वसामान्य नागरिक मोठे संख्येने उपस्थित होते.1
- पिंपरी चिंचवड शहरामध्ये माळुंगे शिंदे वासुली, खालुंब्रे येथे खुलेआम अवैधरित्या गॅस भरणा केंद्राचा सुळसुळाट.......1
- नांदेड येथे उद्योजक मा.नितीन भाऊ गवळी यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे1