जाफराबाद तालुक्यातील सावंगी परिसरात अज्ञात वन्य प्राण्याचा हल्ला; म्हशीच्या पिल्लाचा मृत्यू. जाफराबाद तालुक्यातील सावंगी परिसरात अज्ञात वन्य प्राण्याचा हल्ला; म्हशीच्या पिल्लाचा मृत्यू. दहा बारा दिवसापूर्वी बघण्यात आला होता बिबट्या,नागरिकांची माहिती वनविभागाकडून पंचनामा करून पाहणी.. भोकरदन :मराठावाडा मिडीया न्युज जाफराबाद तालुक्यातील सावंगी परिसरात अज्ञात वन्य प्राण्याने हल्ला करून मधुकर भगवान आढावे यांच्या म्हशीच्या पिल्लाचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावंगी परिसरातील शेतजमिनीच्या जवळ असलेल्या गोठ्यात हे म्हशीचे पिल्लू बांधलेले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात वन्य प्राण्याने त्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात पिल्लाचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन मृत पिल्लाची पाहणी केली तसेच पंचनामा करण्यात आला. हा हल्ला नेमका कोणत्या वन्य प्राण्याने केला याचा तपास वनविभागाकडून सुरू आहे. दरम्यान, याच परिसरात सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. त्यामुळे हा हल्ला बिबट्याने केला असावा अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे सावंगी परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करून परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
जाफराबाद तालुक्यातील सावंगी परिसरात अज्ञात वन्य प्राण्याचा हल्ला; म्हशीच्या पिल्लाचा मृत्यू. जाफराबाद तालुक्यातील सावंगी परिसरात अज्ञात वन्य प्राण्याचा हल्ला; म्हशीच्या पिल्लाचा मृत्यू. दहा बारा दिवसापूर्वी बघण्यात आला होता बिबट्या,नागरिकांची माहिती वनविभागाकडून पंचनामा करून पाहणी.. भोकरदन :मराठावाडा मिडीया न्युज जाफराबाद तालुक्यातील सावंगी परिसरात अज्ञात वन्य प्राण्याने हल्ला करून मधुकर भगवान
आढावे यांच्या म्हशीच्या पिल्लाचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावंगी परिसरातील शेतजमिनीच्या जवळ असलेल्या गोठ्यात हे म्हशीचे पिल्लू बांधलेले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात वन्य प्राण्याने त्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात
पिल्लाचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन मृत पिल्लाची पाहणी केली तसेच पंचनामा करण्यात आला. हा हल्ला नेमका कोणत्या वन्य प्राण्याने केला याचा तपास वनविभागाकडून सुरू आहे. दरम्यान, याच परिसरात सुमारे दहा
ते बारा दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. त्यामुळे हा हल्ला बिबट्याने केला असावा अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे सावंगी परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करून परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
- #marathi#newsjalna#1
- लाखोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती1
- क्रांती चौकात 'पुतळा युद्ध'! आंदोलकांचा एल्गार की पोलिसांची धावपळ? सत्तेच्या रक्षणार्थ खाकी मैदानात! छत्रपती संभाजीनगर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार देशासाठी 'धोकादायक' असल्याचा गंभीर आरोप करत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांती चौकात जो 'हायव्होल्टेज ड्रामा' रंगला, त्याने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. आंदोलकांनी निषेधाचा पुतळा उगारला खरा, पण तो जाळण्यापूर्वीच पोलिसांनी जो 'मॅरेथॉन' धावण्याचा पराक्रम केला, तो पाहून उपस्थित नागरिकही अवाक झाले. सवाल: लोकशाही की दडपशाही? या घटनेनंतर आता काही ज्वलंत प्रश्न उपस्थित होत आहेत: १. जनतेचा आक्रोश पुतळ्यातच अडकलाय का? जनतेचा निषेध नोंदवण्याचा हक्क पोलिसांच्या बळावर किती काळ दाबला जाणार? २. पोलिसांची ही 'धाव' कोणासाठी? पुतळा वाचवण्यासाठी पोलिसांनी जी तत्परता दाखवली, तीच तत्परता शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी का दिसत नाही? ३. सरकार खरोखरच 'धोकादायक' वळणावर आहे का? वंचितच्या आरोपांमध्ये तथ्य आहे की हे केवळ राजकीय शक्तीप्रदर्शन? काय घडलं नेमकं? आज, ११ मार्च २०२६ रोजी क्रांती चौकात वंचितच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने पंतप्रधान मोदींचा पुतळा मैदानात आणला. "देश वाचवा, संविधान वाचवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांनी पुतळा पेटवण्याचा प्रयत्न करताच, पोलिसांनी जी झटापट केली ती एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी होती. आंदोलकांच्या हातातून पुतळा हिसकावून घेऊन पोलीस कर्मचारी अक्षरशः धावत सुटले. जणू काही एखादा जिवंत माणूस वाचवण्यासाठी ही धावपळ होती! वाहतुकीचा खोळंबा की प्रशासनाचे अपयश? तासभर जालना रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्वसामान्य नागरिक उन्हात होरपळत होते. पण प्रशासनाला मात्र आंदोलकांचे आवाज दाबण्यात आणि पुतळ्याचे रक्षण करण्यातच जास्त रस दिसला. कार्यकर्त्यांचा पवित्रा स्पष "आमचा आवाज दाबाल, पण विचारांना कसं रोखाल?" सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे आंदोलन आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रतिनिधी: गौतम हिवराळे1
- सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..1
- जालन्यात विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अंकुश कोचींग क्लासेस आझाद मैदान परिसरातील दुर्दैवी घटना1
- सोयगाव पंचायत समिती सभापतीपदी उत्तम चव्हाण; उपसभापतीपदी गयाबाई घोडे सोयगाव प्रतिनिधी : सोयगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे उत्तम महारू चव्हाण यांची तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) च्या गयाबाई गोविंदा घोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे सोयगाव पंचायत समितीवर भाजप-शिवसेना (शिंदे) युतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे. मंगळवारी (दि. १० मार्च) पंचायत समिती सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी एकनाथ बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी उत्तम चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, तर उपसभापती पदासाठी गयाबाई गोविंदा घोडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले. यावेळी ईदरीस मुलतानी, पुष्पाताई काळे नारायण कोलते, शिवाजी बुढाळ, प्रदीप चव्हाण, दारासिंग शेषमल चव्हाण, रहीम पठाण, गुलाबराव कोलते, जयप्रकाश चव्हाण, गणेश लोखंडे, युसुफ पठाण, शेख निसार, मोहम्मद नूर, अजित खान, अजीज खान, हरी भांबरे, प्रभाकर सूर्यवंशी व भाजपा तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- मां-बहन की गाली देने वालों की अब खैर नहीं! देश के भीतर इस जगह लागू हुई सख्त व्यवस्था, बच्चाें की पढ़ाई के दौरान मोबाइल-टीवी रहेंगे बंद महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले के कोलगांव गांव ने एक अनोखा नियम लागू किया है. यानी अब अगर कोई व्यक्ति मां-बहन से जुड़ी गालियां देता है तो उस पर 500 रुपये का जुर्माना लगाया जाएगा. ग्राम सभा में पास हुए इस प्रस्ताव का मकसद गांव में सम्मानजनक माहौल बनाना और महिलाओं की गरिमा की रक्षा करना है. जिसकी खूब चर्चा हो रही है.समझते हैं पूरी बात.1
- मोतीबागेत कचरा जाळण्याचा प्रकरणात मानपाने कर्मचाऱ्यांवर केली करवाई पाच हजार चा दंड ठोकला1