logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलीच्या धोपटाळा टाऊनशिपमधील वसाहतमध्ये शुक्रवारी (ता. २९) रात्री शीतल कुंभारे या महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या चंद्रपूर पथकाने आरोपी राजेश व्यंकय्या अटेल्ला याला आज, ३० मे रोजी सायंकाळी तेलंगणा राज्यातील मंचेरियाल येथून अटक केली आहे. मृतक शीतल तिच्या मुलीच्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे आपल्या आईकडे वेकोलीच्या क्वॉर्टरमध्ये राहण्यासाठी आली होती, अशी माहिती तिच्या पतीने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. घटनेच्या आदल्या दिवशी सायंकाळी पाच वाजता शीतल आणि तिच्या मुलीने फोनवर पतीसोबत बोलले होते. हत्येच्या वेळी मृतकाची आई व भाऊ त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांना कालेश्वर येथे सोडायला गेले होते, त्यामुळे मुलगी आणि मृतक शीतल घरीच होत्या. मुलीच्या सांगण्यानुसार, मुलगी आणि तिची आई रात्री एकाच बेडवर झोपल्या होत्या. सकाळी उठल्यानंतर आई न दिसल्याने मुलीने मागच्या खोलीत जाऊन पाहिले असता, शीतल रक्ताच्या थारोळ्यात खाटेवर पालथी पडलेली आढळली. या घटनेची माहिती मुलीने शेजाऱ्यांना दिली, ज्यांनी नंतर मृतकाच्या पतीला व राजुरा पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात मृतदेहाजवळ रक्ताने हात पुसलेला रुमाल आढळून आला. महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळावरून मृतकाचा मोबाईल आरोपी घेऊन पळून गेल्याचे तपासात दिसून आले. आरोपी राजेश अटेल्ला घटनेनंतर राजुरा येथे गेला आणि तिथून तेलंगणा राज्यातील मंचेरियाल येथे पळून गेला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा पोलीस निरीक्षक आसिफ रजा शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमित कचोरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद गुरले, सुनील गौरकार, सर्वेश बेलसरे, पोलीस शिपाई हिरालाल गुप्ता, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, किशोर वाकाटे, संतोष मेलपूलवार, गणेश मोहुर्ले यांनी ही कारवाई करत आरोपीला मंचेरियाल येथून पकडले.

2 hrs ago
user_Prakash deogade
Prakash deogade
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
77392b2a-5c65-4136-b380-d37b72e764d2

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चंद्रपूर महानगरपालिकेच्या विरोधात युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांनी अमृत योजनेच्या निकृष्ट कामकाजाविरुद्ध दंड थोपटले आहेत. या निषेधार्थ, १ जून रोजी सकाळी १० वाजता मनपा विरोधात ‘घागर फोडो मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. विक्रांत सहारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की, अमृत योजनेच्या निकृष्ट कामात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल.
    1
    चंद्रपूर महानगरपालिकेच्या विरोधात युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांनी अमृत योजनेच्या निकृष्ट कामकाजाविरुद्ध दंड थोपटले आहेत. या निषेधार्थ, १ जून रोजी सकाळी १० वाजता मनपा विरोधात ‘घागर फोडो मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. विक्रांत सहारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की, अमृत योजनेच्या निकृष्ट कामात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • ऑटो चालकांसोबत स्वादिष्ट दाल-रोटी आणि घरच्या जेवणाचा आस्वाद घेण्यात आला. या प्रसंगी त्यांच्यासोबत काही मनमोकळ्या गप्पा मारण्यात आल्या, ज्यामुळे एक हृदयस्पर्शी आणि आनंददायी अनुभव लाभला.
    1
    ऑटो चालकांसोबत स्वादिष्ट दाल-रोटी आणि घरच्या जेवणाचा आस्वाद घेण्यात आला. या प्रसंगी त्यांच्यासोबत काही मनमोकळ्या गप्पा मारण्यात आल्या, ज्यामुळे एक हृदयस्पर्शी आणि आनंददायी अनुभव लाभला.
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सावली आणि सिंदेवाही तालुक्यात चार पिलांसह २० हत्तींच्या कळपाने शिरकाव केला आहे. या हत्तींच्या कळपामुळे सावली तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे.
    1
    सावली आणि सिंदेवाही तालुक्यात चार पिलांसह २० हत्तींच्या कळपाने शिरकाव केला आहे. या हत्तींच्या कळपामुळे सावली तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे.
    user_Suresh Komawar
    Suresh Komawar
    Press advisory Pombhurna, Chandrapur•
    10 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत सुमारे वर्षभरापूर्वी कोसळली आहे. या भिंतीअभावी शाळेच्या आवारात मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू असतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानावर खेळणे अडचणीचे ठरत आहे. या गंभीर स्थितीमुळे शाळेची संरक्षक भिंत तात्काळ बांधण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अकोला बाजार येथील जिल्हा परिषद शाळेची दुर्दशा झाली असून, शाळा अद्याप संरक्षक भिंतीच्या प्रतीक्षेत आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत सुमारे वर्षभरापूर्वी कोसळली आहे. या भिंतीअभावी शाळेच्या आवारात मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू असतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानावर खेळणे अडचणीचे ठरत आहे.

या गंभीर स्थितीमुळे शाळेची संरक्षक भिंत तात्काळ बांधण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अकोला बाजार येथील जिल्हा परिषद शाळेची दुर्दशा झाली असून, शाळा अद्याप संरक्षक भिंतीच्या प्रतीक्षेत आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    21 hrs ago
  • नांदेड येथे काँग्रेसने इंधन प्रश्नावर सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान 'राडा' देखील झाल्याचे वृत्त आहे.
    1
    नांदेड येथे काँग्रेसने इंधन प्रश्नावर सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान 'राडा' देखील झाल्याचे वृत्त आहे.
    user_Live maharashtra digital
    Live maharashtra digital
    Video Creator वर्धा, महाराष्ट्र•
    54 min ago
  • मुंब्रा-कळव्याच्या आमदारांनी क्षेत्राच्या विकास, जनसुविधा आणि जनहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरून जनतेला भावनिक आवाहन केले. त्यांनी नागरिकांना क्षेत्रातील विकासकामांना सहकार्य करण्याचे, सामाजिक सलोखा राखण्याचे आणि जनसमस्यांच्या निराकरणासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आमदारांनी जनतेला विश्वास दिला की, ते जनतेच्या हिताचे रक्षण आणि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहतील.
    1
    मुंब्रा-कळव्याच्या आमदारांनी क्षेत्राच्या विकास, जनसुविधा आणि जनहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरून जनतेला भावनिक आवाहन केले. त्यांनी नागरिकांना क्षेत्रातील विकासकामांना सहकार्य करण्याचे, सामाजिक सलोखा राखण्याचे आणि जनसमस्यांच्या निराकरणासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आमदारांनी जनतेला विश्वास दिला की, ते जनतेच्या हिताचे रक्षण आणि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहतील.
    user_Times of reporting news
    Times of reporting news
    वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • सध्याच्या महागाईच्या काळात आयुष्य कसे चालले आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर म्हणून, 'चला, एका प्रवासाला निघूया, मी तुम्हाला सांगतो!' असे सांगण्यात आले. सोबतच, इतरांनाही या प्रवासात सहभागी होऊन ऐकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    सध्याच्या महागाईच्या काळात आयुष्य कसे चालले आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर म्हणून, 'चला, एका प्रवासाला निघूया, मी तुम्हाला सांगतो!' असे सांगण्यात आले. सोबतच, इतरांनाही या प्रवासात सहभागी होऊन ऐकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कुही तालुक्यातील वेलतूर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. या वादळामुळे काही ठिकाणी घरांची छत उडून गेल्याची माहिती मिळाली आहे. वेलतूर आणि आसपासच्या भागात गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर आणि वादळी वारे सुरू आहेत. हवामान कोणत्याही क्षणी आणखी बिघडू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली असून, नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्याच्या वेळी झाडांखाली किंवा कच्च्या घरांच्या आश्रयाला थांबू नये, तसेच वीज आणि टेलिफोनच्या खांबांपासून दूर राहावे असा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळून सुरक्षित ठिकाणी थांबावे असेही सूचित करण्यात आले आहे.
    1
    कुही तालुक्यातील वेलतूर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. या वादळामुळे काही ठिकाणी घरांची छत उडून गेल्याची माहिती मिळाली आहे.

वेलतूर आणि आसपासच्या भागात गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर आणि वादळी वारे सुरू आहेत. हवामान कोणत्याही क्षणी आणखी बिघडू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली असून, नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्याच्या वेळी झाडांखाली किंवा कच्च्या घरांच्या आश्रयाला थांबू नये, तसेच वीज आणि टेलिफोनच्या खांबांपासून दूर राहावे असा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळून सुरक्षित ठिकाणी थांबावे असेही सूचित करण्यात आले आहे.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.