उमेदवारांच्या सोशल मीडियावर पोलिसांची नजर जळगाव : महापालिका निवडणुकीचा प्रचार वेगात आला असून राजकीय वातावरणही तापू लागले आहे. प्रचाराचा जोर वाढत असताना निवडणूक आचारसंहितेचा भंग, आक्षेपार्ह मजकूर, भडकावणारी भाषणे किंवा अफवांचा प्रसार होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. उमेदवारांच्या सोशल मीडियावरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रचाराला सुरुवात झाली. यामध्ये प्रभागात घरोघर फिरण्यासह मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी उमेदवार व कार्यकर्ते सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. समाज माध्यमांवर प्रचार व्हिडीओ, पोस्ट, रील्स व संदेशांचा अनावश्यकं मारा सुरू आहे. आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास कारवाई सोशल मीडिया अकाउंटसवरून प्रसारित होणाऱ्या मजकुरावर लक्ष ठेवले जात आहे. कोणताही आक्षेपार्ह, समाजात तेढ निर्माण करणारा किंवा चुकीची माहिती पसरवणारा मजकूर आढळल्यास तत्काळ कारवाईचा इशारा दिला आहे. नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद मजकुराबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. अनेक उमेदवारांनी स्वतंत्र पेज, ग्रुप व प्रचारात्मक व्हिडीओ तयार केले आहेत.

- Post by Peoples News 241
- जाफ्राबाद भारज येथे मांस पकडले1
- धुळ्यात गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई; आरोपीच्या घरातून जिवंत काडतुसे जप्त1
- जलगांव जामोद नाला करने1
- घाटपुरी जलकुंभाच्या मुख्य व्हॉल्व्हचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर; उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता खामगाव:शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत करणाऱ्या घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम आज, १० जानेवारी २०२६ रोजी प्रशासनातर्फे अत्यंत वेगाने हाती घेण्यात आले आहे. खामगाव नगर परिषदेचे पाणी पुरवठा सुपरवायझर सुरजसिंह ठाकुर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली हे काम युद्धपातळीवर सुरू असून, उद्यापासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीचा मुख्य व्हॉल्व्ह तांत्रिक बिघाडामुळे नादुरुस्त झाला होता. परिणामी, संबंधित भागातील पाणी वितरणात अडथळा निर्माण झाला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत दुरुस्तीचे नियोजन केले. आज दिवसभर सुरू असलेल्या या दुरुस्ती कामामुळे पाणीपुरवठा बंद असला तरी, रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सर्व तांत्रिक बाबींची तपासणी झाल्यानंतर उद्या (११ जानेवारी) पासून संबंधित भागातील पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत होण्याची दाट शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. नगर परिषदेच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.2
- Post by YUVA JALNA NEWS1
- राजमाता पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज1
- Post by Peoples News 241