logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मानोरा शहराचा पाणीपुरवठा सुरू करा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल दलाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी प्रतिनिधी : मानोरा शहरातील पाणी पुरवठा ८ - ९ महिन्यापासून बंद असुन पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील नागरिकांचे हाल होत आहे. त्यामुळे पाईपलाईन सुरू करून तातडीने नळाला पाणी सोडावे, असे निवेदन दि. ४ फेब्रुवारीला मुख्याधिकारी यांना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यानी यांना दिले आहे. निवेदनानुसार मानोरा नगरपंचायत अंतर्गत एकूण १७ वॉर्ड असुन शहराला होणारा पाणीपुरवठा मागील ८ ते ९ महिन्यापासून बंद आहे. शहरातील मदिना नगर, वसंत नगर, नाईक नगर, मुंगसाजी नगर, झोपडपट्टी या भागातील नळ बंद असल्याने शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच नगरपंचायतने या भागात कोणत्याही प्रकारची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नगर पंचायतची स्वतःची मालकीची विहीर असुन संपूर्ण पाइपलाईन जुनीवस्ती, क्रिडा संकुल, तहसील कार्यालय समोरून पाईप लाईन टाकली आहे. पाईप लाईनचे संपूर्ण काम झाले असुनही पिण्याचे पाणी नळाला अजुनही सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे तातडीने पिण्याचे पाणी शहरवाशी नागरिकांना उपलब्ध करुन द्यावे, असे निवेदन मुख्याधिकारी यांना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. निवेदन देतेवेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी करण ठाकुर, राम हेडा, कृष्णा साखरकर, जय पवार, दिशांत कोकरे, तेजस राऊत, शैलेश राठोड, कृष्णा राठोड, मनोज राठोड, कुंदन चव्हाण, स्वस्तिक जाधव, आशुतोष राठोड, प्रतिक राठोड, गोपाल कुरकुटे आदी उपस्थित होते.

on 5 February
user_सारनाथ अवचार
सारनाथ अवचार
पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
on 5 February
c5255d7a-39c2-408a-bb67-644dea15491d

मानोरा शहराचा पाणीपुरवठा सुरू करा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल दलाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी प्रतिनिधी : मानोरा शहरातील पाणी पुरवठा ८ - ९ महिन्यापासून बंद असुन पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील नागरिकांचे हाल होत आहे. त्यामुळे पाईपलाईन सुरू करून तातडीने नळाला पाणी सोडावे, असे निवेदन दि. ४ फेब्रुवारीला मुख्याधिकारी यांना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यानी यांना दिले आहे. निवेदनानुसार मानोरा नगरपंचायत अंतर्गत एकूण १७ वॉर्ड असुन शहराला होणारा पाणीपुरवठा मागील ८ ते ९ महिन्यापासून बंद आहे. शहरातील मदिना नगर, वसंत नगर, नाईक नगर, मुंगसाजी नगर, झोपडपट्टी या भागातील नळ बंद असल्याने शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच नगरपंचायतने या भागात कोणत्याही प्रकारची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नगर पंचायतची स्वतःची मालकीची विहीर असुन संपूर्ण पाइपलाईन जुनीवस्ती, क्रिडा संकुल, तहसील कार्यालय समोरून पाईप लाईन टाकली आहे. पाईप लाईनचे संपूर्ण काम झाले असुनही पिण्याचे पाणी नळाला अजुनही सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे तातडीने पिण्याचे पाणी शहरवाशी नागरिकांना उपलब्ध करुन द्यावे, असे निवेदन मुख्याधिकारी यांना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. निवेदन देतेवेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी करण ठाकुर, राम हेडा, कृष्णा साखरकर, जय पवार, दिशांत कोकरे, तेजस राऊत, शैलेश राठोड, कृष्णा राठोड, मनोज राठोड, कुंदन चव्हाण, स्वस्तिक जाधव, आशुतोष राठोड, प्रतिक राठोड, गोपाल कुरकुटे आदी उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी महिलांच्या पारंपरिक श्रृंगाराबाबत केलेल्या एका विधानामुळे नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी चिखलीतील महिला आता आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी चिखलीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एक खळबळजनक विधान केले. आपण पक्ष सोडणार नाही हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी चक्क महिलांच्या कुंकू आणि मंगळसूत्राचा आधार घेतला. बोंद्रे म्हणाले की, "ज्या महिलेला मी पतिव्रता आहे असं दाखवायचं असतं, तीच महिला मोठं कुंकू लावते आणि मोठं मंगळसूत्र घालते." त्यांच्या या विधानानंतर चिखली शहरात संतापाची लाट उसळली.राहुल बोंद्रे यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होताच चिखलीतील महिलांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला. संतप्त महिलांनी राहुल बोंद्रे यांच्या फोटोला चपला मारल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली. इतकेच नाही तर, त्यांच्या फोटोवर कुंकू आणि मंगळसूत्र रेखाटून महिलांनी अनोख्या पद्धतीने आपला संताप व्यक्त केला.यावेळी स्थानिक महिला प्रतिनिधी आणि महिला बालकल्याण सभापती सुषमा चव्हाण यांनी बोंद्रे यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, "हा जिल्हा राष्ट्रमाता जिजाऊ आणि रेणुका मातेचा आहे. कुंकू आणि मंगळसूत्र हे महिलांच्या अस्मितेचे आणि सौभाग्याचे लेणे आहे. सुशिक्षित म्हणवणाऱ्या नेत्याला अशा प्रकारची विधाने करणे शोभत नाहीमहिलांनी राहुल बोंद्रे यांनी या विधानाबद्दल समस्त स्त्री शक्तीची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आता या वादग्रस्त वक्तव्याचा काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो आणि राहुल बोंद्रे यावर काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.." बिरो रिपोर्ट चिखली
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी महिलांच्या पारंपरिक श्रृंगाराबाबत केलेल्या एका विधानामुळे नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी चिखलीतील महिला आता आक्रमक झाल्या आहेत.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी चिखलीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एक खळबळजनक विधान केले. आपण पक्ष सोडणार नाही हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी चक्क महिलांच्या कुंकू आणि मंगळसूत्राचा आधार घेतला. बोंद्रे म्हणाले की, "ज्या महिलेला मी पतिव्रता आहे असं दाखवायचं असतं, तीच महिला मोठं कुंकू लावते आणि मोठं मंगळसूत्र घालते." त्यांच्या या विधानानंतर चिखली शहरात संतापाची लाट उसळली.राहुल बोंद्रे यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होताच चिखलीतील महिलांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला. संतप्त महिलांनी राहुल बोंद्रे यांच्या फोटोला चपला मारल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली. इतकेच नाही तर, त्यांच्या फोटोवर कुंकू आणि मंगळसूत्र रेखाटून महिलांनी अनोख्या पद्धतीने आपला संताप व्यक्त केला.यावेळी स्थानिक महिला प्रतिनिधी आणि महिला बालकल्याण सभापती सुषमा चव्हाण यांनी बोंद्रे यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, "हा जिल्हा राष्ट्रमाता जिजाऊ आणि रेणुका मातेचा आहे. कुंकू आणि मंगळसूत्र हे महिलांच्या अस्मितेचे आणि सौभाग्याचे लेणे आहे. सुशिक्षित म्हणवणाऱ्या नेत्याला अशा प्रकारची विधाने करणे शोभत नाहीमहिलांनी राहुल बोंद्रे यांनी या विधानाबद्दल समस्त स्त्री शक्तीची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आता या वादग्रस्त वक्तव्याचा काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो आणि राहुल बोंद्रे यावर काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.." बिरो रिपोर्ट चिखली
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Santosh Bahekar PRESS
    1
    Post by Santosh Bahekar PRESS
    user_Santosh Bahekar PRESS
    Santosh Bahekar PRESS
    Advertising Photographer बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • 🚩 नांदेडमध्ये शिवकालीन वैभव अवतरणार: 'सुवर्ण होन' आणि पुरातन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन! नांदेड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणारे 'शिवकालीन सुवर्ण होन' आणि ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन नांदेडमध्ये आयोजित करण्यात आले आहे. 'नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार' आणि 'नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था, नांदेड' यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, नांदेडकरांसाठी ही एक दुर्मिळ पर्वणी ठरणार आहे. 🔍 प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे: शिवकालीन सुवर्ण होन: श्री अशोक सिंह ठाकूरजी यांनी संग्रहित केलेला, शिवरायंच्या राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला सोन्याचा 'होन' पाहण्याची संधी पहिल्यांदाच नांदेडमध्ये उपलब्ध झाली आहे. प्राचीन नाणी: निलंगा (लातूर) येथील 'श्री चक्रधर संग्रहालय' यांच्या संग्रहातील इ.स. पूर्व ६०० वर्षांपासूनची दुर्मिळ नाणी प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. ऐतिहासिक शस्त्रास्त्रे: 'शहाजीराजे भोसले ऐतिहासिक वस्तू संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट' यांच्याकडील शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन यावेळी करण्यात येईल. 📍 प्रदर्शनाचा तपशील: दिनांक: शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ ते रविवार, ५ एप्रिल २०२६. वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत. स्थळ: नंदगिरी किल्ला, होळी परिसर, नावघाट, नांदेड. विशेष टीप: छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी सोन्याचे 'होन' चलनात आणले होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अशा दुर्मिळ ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडणार आहे. नांदेडमधील इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
    4
    🚩 नांदेडमध्ये शिवकालीन वैभव अवतरणार: 'सुवर्ण होन' आणि पुरातन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन!
नांदेड:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणारे 'शिवकालीन सुवर्ण होन' आणि ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन नांदेडमध्ये आयोजित करण्यात आले आहे. 'नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार' आणि 'नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था, नांदेड' यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, नांदेडकरांसाठी ही एक दुर्मिळ पर्वणी ठरणार आहे.
🔍 प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे:
शिवकालीन सुवर्ण होन: श्री अशोक सिंह ठाकूरजी यांनी संग्रहित केलेला, शिवरायंच्या राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला सोन्याचा 'होन' पाहण्याची संधी पहिल्यांदाच नांदेडमध्ये उपलब्ध झाली आहे.
प्राचीन नाणी: निलंगा (लातूर) येथील 'श्री चक्रधर संग्रहालय' यांच्या संग्रहातील इ.स. पूर्व ६०० वर्षांपासूनची दुर्मिळ नाणी प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
ऐतिहासिक शस्त्रास्त्रे: 'शहाजीराजे भोसले ऐतिहासिक वस्तू संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट' यांच्याकडील शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन यावेळी करण्यात येईल.
📍 प्रदर्शनाचा तपशील:
दिनांक: शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ ते रविवार, ५ एप्रिल २०२६.
वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत.
स्थळ: नंदगिरी किल्ला, होळी परिसर, नावघाट, नांदेड.
विशेष टीप: छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी सोन्याचे 'होन' चलनात आणले होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अशा दुर्मिळ ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडणार आहे.
नांदेडमधील इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • निर्भीड पत्रकार तथा दैनिक बुलंद शक्ती चे संपादक मा. रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात दरेकर हे निर्भीड, पुराव्यानिशी पत्रकारिता करणारे व जनहितासाठी सातत्याने लढणारे पत्रकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, राज्यातील शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानानंतर दरेकर यांनी संबंधितांच्या मालमत्तेबाबत सखोल व पुराव्यानिशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे प्रकरण क्रमांक 167/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला असला, तरी तो महसूलमंत्री यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या प्रभावाखाली दाखल करण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. रामेश्वर दरेकर यांनी यापूर्वीही विविध प्रकरणांमध्ये पोलिसांच्या कथित भ्रष्टाचाराचे व्हिडिओ व पुरावे समोर आणणे, लाचलुचपत प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणे तसेच अवैध धंदे व प्रशासनातील त्रुटी जनतेसमोर मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या प्रकरणाला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात असल्याचे नमूद करत, गुन्ह्याची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून तो तात्काळ रद्द करावा, संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी तसेच दरेकर यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
    1
    निर्भीड पत्रकार तथा दैनिक बुलंद शक्ती चे संपादक मा. रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात दरेकर हे निर्भीड, पुराव्यानिशी पत्रकारिता करणारे व जनहितासाठी सातत्याने लढणारे पत्रकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, राज्यातील शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानानंतर दरेकर यांनी संबंधितांच्या मालमत्तेबाबत सखोल व पुराव्यानिशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे प्रकरण क्रमांक 167/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला असला, तरी तो महसूलमंत्री यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या प्रभावाखाली दाखल करण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
रामेश्वर दरेकर यांनी यापूर्वीही विविध प्रकरणांमध्ये पोलिसांच्या कथित भ्रष्टाचाराचे व्हिडिओ व पुरावे समोर आणणे, लाचलुचपत प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणे तसेच अवैध धंदे व प्रशासनातील त्रुटी जनतेसमोर मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
या प्रकरणाला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात असल्याचे नमूद करत, गुन्ह्याची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून तो तात्काळ रद्द करावा, संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी तसेच दरेकर यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    23 hrs ago
  • Post by Akeel Chaudhari
    1
    Post by Akeel Chaudhari
    user_Akeel Chaudhari
    Akeel Chaudhari
    Grain Shop समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    54 min ago
  • खडकी रस्त्याची दयनीय अवस्था; नागरिकांचा संताप वाढला! हिमायतनगर-भोकर राष्ट्रीय महामार्गावरून खडकी बाजार गावाकडे जाणारा रस्ता सध्या अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालण्यासारखे ठरत आहे. 🚗 मागील अनेक वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. स्थानिक नागरिक व वाहनधारकांकडून प्रशासनाला तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची किंवा नवीन रस्ता तयार करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. #खडकी_रस्ता #हिमायतनगर #भोकर_महामार्ग #रस्ता_दुरुस्ती #जनतेची_मागणी RoadIssue PublicDemand SaveLives
    1
    खडकी रस्त्याची दयनीय अवस्था; नागरिकांचा संताप वाढला! 
हिमायतनगर-भोकर राष्ट्रीय महामार्गावरून खडकी बाजार गावाकडे जाणारा रस्ता सध्या अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालण्यासारखे ठरत आहे. 🚗
मागील अनेक वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. 
स्थानिक नागरिक व वाहनधारकांकडून प्रशासनाला तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची किंवा नवीन रस्ता तयार करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.
प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
#खडकी_रस्ता #हिमायतनगर #भोकर_महामार्ग #रस्ता_दुरुस्ती #जनतेची_मागणी RoadIssue PublicDemand SaveLives
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by MOHAMMAD KlRANl
    7
    Post by MOHAMMAD KlRANl
    user_MOHAMMAD KlRANl
    MOHAMMAD KlRANl
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.