logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिरवळमध्ये जबरी चोरीसह गंभीर गुन्ह्यांची वाढत चालली होती गुन्हेगारी! शिरवळ पोलिसांनी टोळीवर लगाम घालत सातारा-पुणे जिल्ह्यातून केली हद्दपारी! सातारा : शिरवळ परिसरात जबरी चोरी, चोरी, दुखापत यांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या टोळीविरुद्ध सातारा पोलिसांनी कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या टोळीतील तिघांना संपूर्ण सातारा व पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. शिरवळ, ता. खंडाळा परिसरात शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळीचा प्रमुख ओंकार दत्तात्रय क्षिरसागर (वय २५) तसेच टोळीतील वेदांत जितेंद्र जाधव (वय २०) आणि शुभम राजेंद्र भोई (वय २१), तिघेही रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा, यांच्याविरुद्ध दुखापत पोहोचवणे, जबरी चोरी करणे, चोरी करणे यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या दखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीतील सदस्यांवर यापूर्वी अटक तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्याने परिसरातील नागरिकांना या टोळीचा उपद्रव होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शिरवळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सदर टोळीला सातारा व पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक, सातारा यांच्याकडे सादर केला. सदर प्रस्तावाची चौकशी फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी केली. त्यानंतर हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासमोर टोळीप्रमुख व सदस्यांची सुनावणी झाली. सुनावणीनंतर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये तिघांना संपूर्ण सातारा व पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला. सातारा जिल्ह्यात आगामी गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए यांसारख्या कठोर कायदेशीर कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याबरोबरच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याच्या पोलिसांच्या प्रतिबंधात्मक प्रयत्नांना बळ मिळाले आहे. हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस तसेच शिरवळ पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांनी आवश्यक पुरावे सादर केले. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरवळ पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या समन्वयातून हद्दपारीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन परिसरात संशयास्पद हालचाली किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी कायदा हातात न घेता पोलिसांना सहकार्य करावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शिरवळ परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन जणांच्या टोळीवर करण्यात आलेली वर्षभराची हद्दपारी ही पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईतील महत्त्वाची पायरी ठरली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांविरुद्ध सातारा पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज सत्य • थेट • निर्भीड

58 min ago
user_पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
News Anchor सातारा, सातारा, महाराष्ट्र•
58 min ago
f417d959-849c-45e2-9dc8-98c0520fd593

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • *लोकसंवाद 2026 कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानाची माहिती* *नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध – मनुज जिंदल* *लोकसंवाद 2026 कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानाची माहिती* *नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध – मनुज जिंदल* प्रतिनिधी स्वाती हडकर *रत्नागिरी, दि. 17 (जिमाका) : स्वच्छता, आरोग्य, वृक्षारोपण आणि थेट जागेवरच शासकीय दाखल्यांचे वाटप.. जनसेवेचा हा महायज्ञ सध्या जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून पूर्ण ताकदीने सुरू आहे. लोककल्याणकारी अभियानात प्रत्येक नागरिकांने सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध आहे,” अशी ग्वाही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.* माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कुवारबाव उत्कर्ष नगर वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळ येथे लोकसंवाद 2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी सेवा संकल्प अभियानाची सविस्तर माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी आधिकारी वैदेही रानडे उपस्थित होत्या. *प्रत्येक गावात लावणार १ हजार झाडे लावण्याचा संकल्प* जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, “पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून, या अभियानांतर्गत आगामी काही दिवसांत टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावात १,००० वृक्षांची लागवड केली जाईल,” या उपक्रमात नागरिकांनीही सहभाग नोंदवावा. आजपासून 17 ऑक्टोबर पर्यंत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध विभागांच्या सेवा जनतेपर्यंत पोहचविण्याचा मुख्य उद्देश आहे. *नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण* पंतप्रधान महोदयांच्या संवैधानिक पदावरील २५ वर्षांच्या लोकसेवेनिमित्त आयोजित हे अभियान केवळ उपक्रमांपुरते मर्यादित नसून थेट लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आहे. नागरिकांना लागणारे विविध शासकीय दाखले, कागदपत्रांच्या अडचणी आणि प्रशासकीय कामे यांचे जागेवरच निराकरण केले जाणार आहे. विविध सेवा व तक्रारींचे निवारण एकाच छताखाली करण्यात येणार आहे. *प्रशासन २४ तास जनतेच्या सेवेसाठी सज्ज - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* या मोहिमेत आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व महसूल अधिकारी स्वतःहून पुढाकार घेत आहेत, याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. “पुढील महिनाभर चालणाऱ्या या लोककल्याणकारी अभियानात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले. वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळाने उत्सवाचे रूपांतर सामाजिक सेवेत केल्याचा उल्लेख करुन गणेश मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी उमेश गावधडकर, मंडळाचे अध्यक्ष सुनील वडार, उपाध्यक्ष विलास माने, खजिनदार सागर वाघ यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 000
    1
    *लोकसंवाद 2026 कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानाची माहिती*
*नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध – मनुज जिंदल*
*लोकसंवाद 2026 कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानाची माहिती*
*नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध – मनुज जिंदल*
प्रतिनिधी स्वाती हडकर
*रत्नागिरी, दि. 17 (जिमाका) : स्वच्छता, आरोग्य, वृक्षारोपण आणि थेट जागेवरच शासकीय दाखल्यांचे वाटप.. जनसेवेचा हा महायज्ञ सध्या जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून पूर्ण ताकदीने सुरू आहे. लोककल्याणकारी अभियानात प्रत्येक नागरिकांने सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध आहे,” अशी ग्वाही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.*
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कुवारबाव उत्कर्ष नगर वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळ येथे लोकसंवाद 2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी सेवा संकल्प अभियानाची सविस्तर माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी आधिकारी वैदेही रानडे उपस्थित होत्या.
*प्रत्येक गावात लावणार १ हजार झाडे लावण्याचा संकल्प*
जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, “पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून, या अभियानांतर्गत आगामी काही दिवसांत टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावात १,००० वृक्षांची लागवड केली जाईल,” या उपक्रमात नागरिकांनीही सहभाग नोंदवावा. आजपासून 17 ऑक्टोबर पर्यंत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून  विविध विभागांच्या सेवा जनतेपर्यंत पोहचविण्याचा मुख्य उद्देश आहे. 
*नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण*
पंतप्रधान महोदयांच्या संवैधानिक पदावरील २५ वर्षांच्या लोकसेवेनिमित्त आयोजित हे अभियान केवळ उपक्रमांपुरते मर्यादित नसून थेट लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आहे. नागरिकांना लागणारे विविध शासकीय दाखले, कागदपत्रांच्या अडचणी आणि प्रशासकीय कामे यांचे जागेवरच निराकरण केले जाणार आहे.
विविध सेवा व तक्रारींचे निवारण एकाच छताखाली करण्यात येणार आहे.
*प्रशासन २४ तास जनतेच्या सेवेसाठी सज्ज - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*
या मोहिमेत आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व महसूल अधिकारी स्वतःहून पुढाकार घेत आहेत, याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. “पुढील महिनाभर चालणाऱ्या या लोककल्याणकारी अभियानात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध  असल्याचे जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले.  
वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळाने उत्सवाचे रूपांतर सामाजिक सेवेत केल्याचा उल्लेख करुन गणेश मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले. 
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी उमेश गावधडकर, मंडळाचे अध्यक्ष सुनील वडार, उपाध्यक्ष विलास माने, खजिनदार सागर वाघ यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
000
    user_प्रतिनिधी : स्वाती हडकर
    प्रतिनिधी : स्वाती हडकर
    चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भोरच्या राजा रघुनाथराव विदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि. 17 भोर येथील राजा रघुनाथराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेत विविध कार्यक्रम सादर करत वाहवा मिळवली.
    1
    भोरच्या राजा रघुनाथराव विदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 
विक्रम शिंदे /भोर दि. 17
भोर येथील राजा रघुनाथराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेत विविध कार्यक्रम सादर करत वाहवा मिळवली.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव
    1
    सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.
    1
    बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर मराठा आंदोलकांनी केली घोषणाबाजी.! पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी
    1
    पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा  आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर मराठा आंदोलकांनी केली घोषणाबाजी.!
पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा  आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    5 hrs ago
  • बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! “पुण्यातील बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. चालकाचे वय १८ वर्षे असल्याचा दावा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित चालकाचे वय, वैध परवाना आणि आवश्यक नियमांचे पालन झाले आहे का, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.”
    1
    बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर!
“पुण्यातील बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. चालकाचे वय १८ वर्षे असल्याचा दावा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित चालकाचे वय, वैध परवाना आणि आवश्यक नियमांचे पालन झाले आहे का, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.”
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • कवठेमंकाळ तालुक्यातील कुची येथे अंधश्रद्धेचा कळस नागरिक झाले भयभयीत कवठेमंकाळ तालुक्यातील कुच्ची येथे एका अज्ञात इसमाने गावाच्या बाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार केला यामुळे गावातील तमाम नागरिक प्रतिष्ठित युवक यांनी एकत्र येऊन या अंधश्रद्धा आगरी कृत्याचा निषेध व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की अशा अंधश्रद्धा ला कोणीही पाणी घालू नये हे सगळं थोतांड आहे नागरिकांनी घाबरू नये
    1
    कवठेमंकाळ तालुक्यातील कुची येथे अंधश्रद्धेचा कळस नागरिक झाले भयभयीत
कवठेमंकाळ तालुक्यातील कुच्ची येथे एका अज्ञात इसमाने गावाच्या बाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार केला यामुळे गावातील तमाम नागरिक प्रतिष्ठित युवक यांनी एकत्र येऊन या अंधश्रद्धा आगरी कृत्याचा निषेध व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की अशा अंधश्रद्धा ला कोणीही पाणी घालू नये हे सगळं थोतांड आहे नागरिकांनी घाबरू नये
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • *‘सेवा संकल्प अभियान’ ठरतंय दिलासादायक; जिल्हा परिषद आरोग्य सेवेचे लाभार्थ्यांकडून कौतुक* प्रतिनिधी स्वाती हडकर *‘सेवा संकल्प अभियान’ ठरतंय दिलासादायक; जिल्हा परिषद आरोग्य सेवेचे लाभार्थ्यांकडून कौतुक* *रत्नागिरी, दि. १७ (जिमाका): सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा आणि आदरयुक्त वागणुकीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.* पुण्याहून रत्नागिरीत आलेल्या अ‍ॅडव्होकेट तहसीन इनामदार या गरोदर मातेने या अभियानादरम्यान मिळालेल्या अनुभवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तपासणीसाठी केंद्रावर आल्यानंतर येथील डॉक्टर, कर्मचारी आणि उपस्थितांकडून अत्यंत आदराची व आपुलकीची वागणूक मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, "मी सध्या सातव्या-आठव्या महिन्यात असून पुण्यावरून आल्यानंतरचा माझा हा पहिलाच अनुभव आहे. केंद्रावर प्रवेश केल्यापासून तपासणी पूर्ण होईपर्यंत सर्व डॉक्टर्स आणि सपोर्टिंग टीमने अतिशय सहकार्य केले. पुण्यातही मला सहसा न मिळालेला सन्मान आणि काळजी येथे पाहायला मिळाली. पुढील काही महिन्यांसाठी आवश्यक असणारी सर्व आरोग्य सेवा व सहकार्य येथून उत्तम प्रकारे मिळेल, असा मला पूर्ण विश्वास वाटतो." १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या ‘सेवा संकल्प अभियाना’तून आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या जात असून, प्रशासनाच्या या उपक्रमामुळे दुर्गम व शहरी भागातील नागरिकांना मोठा आधार मिळत आहे.
    1
    *‘सेवा संकल्प अभियान’ ठरतंय दिलासादायक; जिल्हा परिषद आरोग्य सेवेचे लाभार्थ्यांकडून कौतुक*

प्रतिनिधी स्वाती हडकर
*‘सेवा संकल्प अभियान’ ठरतंय दिलासादायक; जिल्हा परिषद आरोग्य सेवेचे लाभार्थ्यांकडून कौतुक*
*रत्नागिरी, दि. १७ (जिमाका): सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा आणि आदरयुक्त वागणुकीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.*
पुण्याहून रत्नागिरीत आलेल्या अ‍ॅडव्होकेट तहसीन इनामदार या गरोदर मातेने या अभियानादरम्यान मिळालेल्या अनुभवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तपासणीसाठी केंद्रावर आल्यानंतर येथील डॉक्टर, कर्मचारी आणि उपस्थितांकडून अत्यंत आदराची व आपुलकीची वागणूक मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, "मी सध्या सातव्या-आठव्या महिन्यात असून पुण्यावरून आल्यानंतरचा माझा हा पहिलाच अनुभव आहे. केंद्रावर प्रवेश केल्यापासून तपासणी पूर्ण होईपर्यंत सर्व डॉक्टर्स आणि सपोर्टिंग टीमने अतिशय सहकार्य केले. पुण्यातही मला सहसा न मिळालेला सन्मान आणि काळजी येथे पाहायला मिळाली. पुढील काही महिन्यांसाठी आवश्यक असणारी सर्व आरोग्य सेवा व सहकार्य येथून उत्तम प्रकारे मिळेल, असा मला पूर्ण विश्वास वाटतो."
१७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या ‘सेवा संकल्प अभियाना’तून आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या जात असून, प्रशासनाच्या या उपक्रमामुळे दुर्गम व शहरी भागातील नागरिकांना मोठा आधार मिळत आहे.
    user_प्रतिनिधी : स्वाती हडकर
    प्रतिनिधी : स्वाती हडकर
    चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.